tembhurniबिझनेस

टेंभुर्णीतील पाटील हार्डवेअरची अल्पावधीत गरुड भरारी 

शिवतंत्र न्यूज

टेंभुर्णीतील पाटील हार्डवेअरची अल्पावधीत गरुड भरारी 

शिवतंत्र न्यूज 

      पाटील म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहते गावचे राजकारण, रगेल व रंगेल स्वभावाचा खलनायक. मात्र टेंभुर्णी एका पाटलांनी फक्त पाच महिन्यात बाजारपेठ काबीज करत नेत्रदीपक यश मिळवले आहे. सुशांत पाटील या तरुण व्यवसायिकांनी हार्डवेअर क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

     सुशांत बाळासाहेब पाटील यांचे मुळगाव करमाळा तालुक्यातील आहे. व्यवसाय परंपरागत शेती. त्यासोबतच आजोबांपासून पाटीलकी घरात आहे. सुशांत हे उच्चशिक्षित आहेत. ते एमपीएससी परीक्षेची देखील तयारी करत होते. आर्थिक सुबत्ता पूर्वीपासूनच त्यांच्याकडे होती. परंतु बाळासाहेब पाटील हे कडक शिस्तीचे. तसेच गावा सोबतच परिसरातील सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य व्यक्तिमत्व म्हणून ओळखले ते जातात. त्यांनी सुशांत यांना व्यवसायात उतरण्याचा सल्ला दिला. कारण पूर्वापार चालत आलेला शेती व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असल्यामुळे जोडधंदा शिवाय पर्याय नाही असे सुशांत यांना सांगितले. यानंतर सुशांतही कोणता व्यवसाय करावा याचा अभ्यास करू लागले. ग्रामीण भागात व्यवसाय करायचा असेल तर शेतीपूरक असला पाहिजे तरच तो यशस्वी होऊ शकतो असे सुशांत यांच्या लक्षात आले , म्हणूनच त्यांनी हा हार्डवेअर व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हार्डवेअर व्यवसायाची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. 2 ऑक्टोबर 2025 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर टेंभुर्णी येथे करमाळा रोडवर त्यांनी पाटील हार्डवेअरचा शुभारंभ केला. 

 

   टेंभुर्णी हे मध्यवर्ती ठिकाण , माढा इंदापूर परिसरात ही महत्त्वाची बाजारपेठ असल्यामुळे पाटील यांनी टेंभुर्णी या ठिकाणालाच पसंती दिली. सुरुवातीला त्यांनी आयएसआय व नॉन आयएसआय ठिबक , बायडिंग तार, खिळे ,गार्डन पाईप , नट, बोल्ट , यूपीवीसी , सीपीव्हीची, पीव्हीसी पाईप, फिटिंग, प्लंबिंग मटेरियल, केळी बागेसाठी लागणारे सर्व साहित्य, सेंट्रींग साहित्य, टीकाव, कुदळ , झाडू, स्प्रे पंप, ड्रिल मशीन, हॅमर मशीन, चपसा मशीन, पाने , ट्रॅक्टर ट्रॉली साठी लागणारे सर्व साहित्य , तसेच सर्व प्रकारचे शेती उपयोगी साहित्य या ठिकाणी मिळते. 600 चौरस फूट जागेत सुरू केलेला हा व्यवसाय अवघ्या पाच महिन्यात सुशांत यांनी नावारूपाला आणला आहे. ही जागा सुद्धा त्यांना आता कमी पडत असून भविष्यात आणखी मोठी जागा त्यांना शोधावी लागणार आहे असे ते म्हणतात. फक्त आठ लाख रुपये भांडवलावर सुरू केलेला या व्यवसायातील भाग भांडवल तिपटीपर्यंत गेले आहे . मराठा समाजातील तरुण व्यवसाय करू शकत नाही तशी धारणा असणाऱ्यांसाठी ही एक चपराकच म्हणावी लागेल. सुशांत यांचे शेतकरी वर्गासोबत अतिशय जवळचे संबंध आहेत. शेतकऱ्यांना दर्जेदार साहित्य बाजार भाव पेक्षा कमी दराने कसे देता येईल यासाठी ते कसोशीने प्रयत्न करतात. दिवसातील दोन तास ते आपल्या व्यवसायाच्या अभ्यासासाठी देतात. ज्यामुळे ग्राहकांना अधिकाधिक सेवा कशा देतील याचा ते प्रयत्न करतात. सुरुवातीला दुकानात आकार असे 150 लहान मोठ्या वस्तू होत्या ज्या आज 1400 पर्यंत गेल्या आहेत. दुकानातील बऱ्याच वस्तूंची नावे सुरुवातीला त्यांना माहित नव्हती. शेडनेट, ताडपत्री देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीवरून ठेवण्यास सुरुवात केली. जननी केळी रोपे देखील पाटील हार्डवेअर मध्ये उपलब्ध आहेत. भविष्यात सुशांत पाटील यांना आपला व्यवसाय प्रशस्त जागीच न्यायचा आहे. 

    आपल्या या यशाबद्दल बोलताना ते म्हणतात उत्तम शेती या विचाराचा पगडा मराठा समाजावर बसला आहे. या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं. मराठा समाजातील खूप लोक विविध क्षेत्रात यशस्वी होत आहेत. आपल्या समाजात आर्थिक तसेच व्यावसायिक साक्षरता येणे गरजेचे आहे. ग्राहकांना उत्तम सेवा दिल्यामुळेच फक्त पाच महिन्यात आपला व्यवसाय नावारूपाला आला असे ते सांगतात शेतीमध्ये गरजा पूर्ण होतात, आपले स्वप्न साकार करायचे असेल तर तरुणांनी उद्योग व्यापारात उतरायला हवं असे आवाहन सुशांत पाटील यांनी केले आहे. ग्राहकांना सोबत सुसंवाद राखला गेला पाहिजे . त्यांच्यासोबत योग्य भाषेत संभाषण केले तर ग्राहक वारंवार आपल्याकडे येणार आहेत असा मोलाच संदेश त्यांनी लोकांना दिला आहे.

   तीन पिढ्यांची पाटीलकी घरात असताना सुद्धा व्यवसायात पदार्पण करून यशस्वी वाटचाल करणाऱ्या सुशांत पाटील यांनी नुकत्याच सुरू केलेल्या पाटील हार्डवेअर या व्यवसायासाठी खूप खूप शुभेच्छा..

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close