tembhurni

दत्त  इरिगेटर्सची कृषी सेवेची 20 वर्षे 

शिवतंत्र न्यूज

दत्त  इरिगेटर्सची कृषी सेवेची 20 वर्षे 

शिवतंत्र न्यूज 

 

   टेंभुर्णी बाजारपेठ ही प्रामुख्याने मशिनरी, ठिबक तसेच कृषी आधारित सेवा देणारी सोलापूर जिल्हा तसेच शेजारी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका धाराशिव जिल्हा आदी परिसरातील नामांकित बाजारपेठ आहे. या ठिकाणी स्थानिक व्यापाऱ्यासोबतच इतर भागातील व्यवसायिक देखील व्यवसाय करतात . करमाळा तालुक्यातील अण्णा वसंतराव वीर पाटील हे दत्त इरिगेटर्स या नावाने मशिनरी व्यवसाय गेल्या वीस वर्षांपासून करत आहेत श्री दत्त इरिगेटर्सने शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासाचे नाते निर्माण केले आहे. 

    अण्णा वसंतराव वीर पाटील मुळगाव पांडे तालुका करमाळा. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने काहीतरी उद्योग व्यवसाय करावा या दृष्टीने चाचपणी करत होते. 2006 मध्ये पुणे सोलापूर हायवे लगत पेट्रोल पंपा शेजारी दहा बाय दहा चा छोटासा गाळा भाड्याने घेऊन त्यांनी छोट्या स्वरूपात श्री दत्त इरिगेटर्स या नावाने व्यवसाय सुरू केला. या क्षेत्रात त्यांचे जवळचे कोणीही व्यवसायात नव्हते तसेच व्यवसायाचे परिपूर्ण असे ज्ञानही त्यांना नव्हते.त्यामुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. खरेदी कोठे करायची, ग्राहकांना योग्य दरात वस्तू कशा द्यायच्या. खरेदीच्या जादा दराने झाल्यामुळे बाजारभावापेक्षा जास्त दराने माल विकावा लागायचा. नुकसान देखील बरेच होत होते. सुरुवातीची दोन-तीन वर्षे ना नफा , ना तोटा या तत्त्वावर त्यांनी व्यवसाय सुरू ठेवला. सुरुवातीच्या काळात ठिबक सिंचन, पाईप, इलेक्ट्रिक मोटर, केबल, स्टार्टर आदी साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी संयम दाखवल्यामुळे हळूहळू त्यांची मशिनरी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली. हळूहळू ग्राहक संख्येत देखील वाढ झाली. जागा कमी पडू लागल्याने त्यांनी शेजारीच असलेले असलेल्या लक्ष्मी आनंद कॉम्प्लेक्स मध्ये तब्बल चार गाळे घेऊन व्यवसाय विस्तार केला. जैन, फिनोलेक्स या कंपन्यांची डिलरशिप घेतली. नवीन जागी त्यांनी पीव्हीसी पाई, ठिबक, सिंचन, तुषार, सिंचन, फिटिंग, हस्ती पाईप , फिनोलेक्स प्लंबिंग साहित्य, टेक्समो, मोटर, केबल, मल्चिंग पेपर आदी साहित्य होलसेल रेट मध्ये देण्यास सुरुवात केली. तसेच जैन केळीची व डाळींबाची रोपे उपलब्ध करून देण्यास सुरुवात केली. एवढी वर्ष व्यवसाय केल्यामुळे ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण झाला होता. अण्णांचा स्वभाव पूर्वीपासून मनमिळावू होता. आलेल्या ग्राहकाचे समाधान होईल अशीच सेवा अण्णा देत होते. पाईपलाईन करताना शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, इलेक्ट्रिक पंपाची योग्य निवड, स्टार्टर, केबल आणि दर्जेदार साहित्य ग्राहकांना देणे आदी बाबींमुळे अण्णा वीर पाटील यांची वेगळीच प्रतिमा ग्राहकांमध्ये निर्माण झाली होती, दर्जेदार कामामुळे संतुष्ट ग्राहक इतर ग्राहकांना रेफरन्स देत होते. परिणामी नवनवीन ग्राहक वेगवेगळ्या भागातून खरेदीसाठी येत होते. गुणवत्तापूर्ण सामान योग्य दरात मिळाल्यामुळे ग्राहक वर्ग देखील समाधानी झाला.आज मीतिला हजारो ग्राहक श्री दत्त एरिगेटर्स च्या व्यवसायाशी जोडले गेले आहेत. या कमी त्यांना महत्त्वपूर्ण साथ मिळाली की त्यांच्या सौभाग्यवती सौ विद्या, मुलगा ओंकार यांची. दोघेही अण्णांना व्यवसायात मदत करतात. 

   जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर त्यांनी घरापासून दूर राहून अनोळखी ठिकाणी नेटाने वीस वर्षे व्यवसाय केला. बांधवांना संदेश देताना ते म्हणतात डोक्यावर बर्फ , तोंडात साखर ठेवली की नवख्या ठिकाणी देखील व्यवसाय करता येतो. व्यवसाया व्यतिरिक्त इतर बाबींकडे मी दुर्लक्ष केले. गुणवत्तेला प्राधान्य दिले म्हणूनच वीस वर्षे एवढा दीर्घकाळ व्यवसाय मी करू शकलो. माझ्यासारखीच आपण ही जर प्रतिकूल परिस्थिती वर मात करत व्यवसाय केला तर कोणत्याही क्षेत्रात आपली प्रगती होऊ शकते.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close