करमाळा

केळी,  ऊस,  तरकारी व सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी; तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानंतर तात्काळ कार्यवाही करण्याचे तहसीलदारांचेआदेश 

शिवतंत्र न्यूज

केळी,  ऊस,  तरकारी व सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी 

 

शिवतंत्र न्यूज

करमाळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे . सर्व पिके पाण्या अभावी जळून जात आहेत विहीर व बोअर यांसारखे जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. केळी ऊस तरकारी पिके यांसारख्या पिकांचे प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे पंचनामे केलेले नाहीत प्रशासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करा करावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे  यांना निवेदन देण्यात आले.

 

    तसेच तहसीलदार मॅडम यांनी लगेच खालील यंत्रणेला पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे  जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा सचिव गणेश सव्वाशे, मराठा सेवा संघाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य नागेश माने , मराठा सेवा संघाचे अतुल  वारे,  संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे, ता सचिव शहाजी डोके, उदय वारे, राजेश ननवरे, प्राध्यापक मस्कर सर, प्रकाश लावंड, दीपक बोराडे, इ .उपस्थित होते

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close