बिझनेस

श्रेया फर्निचरच्या माध्यमातून फर्निचर क्षेत्रात झाकणे बंधूंची दमदार एन्ट्री सर्वसामान्य कुटुंबातील युवकांची प्रेरणादायी यशोगाथा

शिव तंत्र न्यूज

श्रेया फर्निचरच्या माध्यमातून फर्निचर क्षेत्रात झाकणे बंधूंची दमदार एन्ट्री

सर्वसामान्य कुटुंबातील युवकांची प्रेरणादायी यशोगाथा

शिवतंत्र न्यूज 

 

   व्यवसायिक पार्श्वभूमी , भांडवल सर्व गोष्टी असताना नवीन उद्योग उभारणारे असतीलही मात्र अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून फर्निचर सारख्या व्यवसायात कोर्टी येथील झाकणे बंधूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सचिन व गणेश या दोन बंधूंनी कोर्टी येथे तब्बल वीस गुंठ्यात उभारलेल्या श्रेया फर्निचर या व्यवसायाने परिसरात नावलौकिक मिळवला आहे .

 

सचिन झाकणे यांनी आठवीत असताना 2006 मध्ये घरच्या हालाखीच्या परिस्थितीमुळे शाळेला राम राम ठोकला. त्यांचे चुलत बंधू सुनील झाकणे यांचे निगडी पुणे येथे फर्निचर तयार करण्याचे मोठे वर्कशॉप आहे. त्यांनी थेट पुणे गाठले .व त्यांच्याकडे फर्निचर निर्मितीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर १२ डिसेंबर २०१२ रोजी पार्टनरशिप मध्ये फर्निचर शोरूम सुरू केले . त्यांच्यासोबत गणेश हेही होते. गावाकडे अत्यंत गरिबीचे परिस्थिती असल्यामुळे त्यांनी मन लावून व्यवसाय करण्यास सुरुवात केली . गुणवत्तेकडे विशेष लक्ष दिले. हा व्यवसाय अल्पावधीत नावारुपाला आला. त्यांची एक नवी ओळख या व्यवसायाच्या रूपाने झाली मुलगा कमी वेळात कमावता झाल्यामुळे आई-वडिलांना देखील अत्यंत आनंद झाला . बराच काळ उलटून गेला सचिन व गणेश यांची घोडदौड सुरूच होती. मात्र हा आनंद फारकाळ टिकला नाही. 2019 साल उजाडले. पूर्ण जग कोरोनाच्या महामारीने थांबले. सर्व व्यवसाय उद्योग यांचे अपरिमित नुकसान झाले. शहरातील सर्व लोकांचा ओढा गावाकडे वळू लागला. जगा किंवा मरा अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे झाकणे बंधूंनी गावाकडे येण्याचा निर्णय घेतला. सर्व परिवारासहित त्यांनी गावाकडे कुच केले. कोरोनाचा कहर वाढत असल्यामुळे दोन वर्षे त्यांनी थांबलेच पसंत केले. मात्र याच दरम्यान कमलादेवी औद्योगिक वसाहत करमाळा येथे 5000 चौरस फूट जागा त्यांना भाडेतत्त्वावर मिळाली.

  21 जानेवारी 2021 रोजी श्रेया फर्निचर या नावाने त्यांनी फर्निचर व्यवसायाचा करमाळा येथे शुभारंभ केला. पुणे येथे व्यवसाय करत असताना शिल्लक असलेले सर्वच्या सर्व 20 लाख रुपये भांडवल त्यांनी या व्यवसायात लावले. 15 कामगार या ठिकाणी कार्यरत होते . सर्व प्रकारचे फर्निचर जसे की कपाट, दिवाण, खुर्ची ,स्टेबल, सोफासेट आदी त्यांनी होलसेल स्वरूपात तयार करून विकण्यास सुरुवात केली. करमाळा, माढा, इंदापूर ,पुणे, बार्शी कळंब, मिरजगाव आदी परिसरात त्यांच्या मालाला मागणी होती. चार वर्षे त्यांनी या ठिकाणी व्यवसाय केला. परिसरातील सर्व व्यवसायिकांबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले. झाकणी बंधू राहण्यासाठी कोर्टी येथे होते . त्यांना दररोज कोर्टी ते करमाळा असा प्रवास करावा लागे. दरम्यान कोर्टी येथे हायवे लगत वीस गुंठे जागा त्यांना विकत मिळाली. सुमारे 70 लाख रुपये खर्चून ही जागा त्यांनी विकत घेतली. कोर्टी परिसरात मोठी बाजारपेठ विकसित होत होती. तसेच करमाळा येथे भाडेही भरमसाठ होते. त्यामुळे कोर्टी येथेच जागा बांधून शोरूम सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दहा हजार चौरस फूट बांधकाम त्यांनी 50 लाख रुपये खर्चून केले. आतापर्यंत जमा झालेली सर्व पुंजी मिळून जवळजवळ दोन कोटी रुपये त्यांनी हा प्रकल्प उभारणीसाठी खर्च केले. यावर्षी दिवाळीपासून त्यांनी व्यवसाय भव्य दिव्यस्वरूपात सुरू केला.

   या ठिकाणी सर्व प्रकारची फर्निचर , इलेक्ट्रॉनिक्स वस्तू भांडी, होलसेल दरात मिळतात. लग्नबस्त्यासाठी साठी विशेष सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आहे. भांडी बस्ता होलसेल दरात या ठिकाणी मिळतो. फर्निचर उत्पादनासाठी सुमारे 22 कामगार येथे कार्यरत आहेत. त्यांच्या फर्निचर ची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे पुणे तसेच इतर शहरांमध्ये प्रचंड मागणी आहे. कोर्टी परिसरातील नागरिकांना एकाच छताखाली सर्व फर्निचर सामग्री मिळावी यासाठी आपण हे दालन सुरू केले असून भविष्यकाळात परिसरातील तसेच तालुक्यातील नागरिक यांच्या आपण विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.

2006 पासून सचिन झाकणे या व्यवसायात आहेत. प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ही झेप ते घेऊ शकले. आपल्या याच्याबद्दल बोलताना ते म्हणतात की, मी नेहमी कष्ट व सेवेला प्राधान्य दिले. निर्व्यसनी राहिल्यामुळे बंधू , परिवार सर्वांची साथ मिळाली . ग्राहकांच्या प्रति नेहमीच सेवाभाव जपला. म्हणूनच ग्राहकांचा आपल्यावरील विश्वास वाढत गेला. त्यांना अशोक हे तिसरे बंधू असून ते शेतीचे कामकाज बघतात. झाकणे बंधूना 11 एकर शेती आहे तीन भाऊ ,त्यांच्या पत्नी, आई-वडील असा मोठा परिवार त्यांच्याकडे आहे. जवळ काही नसताना जिद्द , चिकाटी व संघर्षातून श्रेया फर्निचरचे साम्राज्य उभे राहिले. त्यांच्या या नव्या प्रवासास मराठा बिजनेस फाउंडेशन परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा..

 

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close