tembhurni
रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांच्याकडे; सचिवपदी बाळासाहेब सपाटे
शिवतंत्र न्यूज

रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांच्याकडे; सचिवपदी बाळासाहेब सपाटे
शिवतंत्र न्यूज
प्रतिनिधी : टेंभुर्णी

रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीच्या वर्ष २०२६–२७ साठी अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांनी, तर सचिवपदाची जबाबदारी बाळासाहेब सपाटे यांनी स्वीकारली. मावळते अध्यक्ष दीपक व्यवहारे व सचिव संतोष गावडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला. त्यानिमित्त आयोजित पदग्रहण सोहळा साधेपणाने पार पडला.

रोटरी क्लब टेंभुर्णीचा पदग्रहण सोहळा दरवर्षी मोठ्या दिमाखात आयोजित केला जातो. मात्र, यंदा क्लबचे क्रियाशील संस्थापक सदस्य अनिल बाबर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल करण्यात आला. त्यांच्या निधनाचे दुःख मनात ठेवत कोणताही अनावश्यक दिखावा न करता साधेपणाने कार्यक्रम घेण्यात आला.




