माढा
मित्रांच्या मदतीने उभारला उद्योग अपार संघर्षातून महेश गुंड यांना मिळाली आर ओ फिल्टर व्यवसायातून नवीन ओळख
शिवतंत्र न्यूज

मित्रांच्या मदतीने उभारला उद्योग
अपार संघर्षातून महेश गुंड यांना मिळाली आर ओ फिल्टर व्यवसायातून नवीन ओळख
शिवतंत्र न्यूज

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…. हे गाणे सर्वांच्याच ओठावर आहे. मैत्रीची थोरवी यामध्ये वर्णन केली आहे. माढा जिल्हा सोलापूर येथे मित्रत्वाची एक न्यारी गाथा पाहण्यास मिळाली आहे. एका बेरोजगार मित्राला काही मित्रांनी एकत्र येत आर ओ फिल्टर उद्योग उभारण्यास मदत केली. यातून उभारी घेत या मित्राने उंच झेप घेतली आहे. संपूर्ण माढा शहराच्या घराघरात ती व्यक्ती पोहोचली आहे. प्रियदर्शनी अमृत जल च्या माध्यमातून महेश रामचंद्र गुंड यांनी गरुड झेप घेतली आहे.







