भांडी व सायकल क्षेत्रात 42 वर्षांची सातत्यपूर्ण सेवा
माढ्यातील सचिन स्टीलची गौरवशाली परंपरा
शिवतंत्र न्यूज
माढा शहरांमध्ये असे काही व्यावसायिक आहेत जे अनेक दशके उद्योग व्यवसायात टिकून आहेत. सुरुवातीच्या काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये व्यवसाय सुरू करून तो टिकवल्यामुळे व्यावसायिक परिपक्वता आली. काळानुरूप व्यवसायामध्ये ते बदल करत आहेत. त्यामुळे त्यांचा जनाधार कधीच कमी झाला नाही. भांडी व सायकल क्षेत्रात नागनाथ घाडगे हे गेल्या 42 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांच्या सचिन स्टील या व्यवसायाने तालुक्यातच नाही तर सोलापूर जिल्हा तसेच शेजारी जिल्ह्यात देखील नावलौकिक मिळवला आहे.
नागनाथ कृष्णा घाडगे यांनी 1984 मध्ये सचिन सायकल या नावाने व्यवसाय सुरू केला. त्यावेळी माढ्यात सायकल विक्रीची दुकाने नव्हती जी होती ती फारशी सेवा सुविधा देत नव्हती. त्यामुळे नागनाथ यांनी घेतलेला हा निर्णय सार्थ ठरला. त्यांनी विविध प्रकारात सायकल सुटे भाग उपलब्ध केल्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांची चांगली सोय झाली. त्यांच्या या सायकल दुकानात चांगला प्रतिसाद मिळू लागला. या व्यवसायाबरोबरच आणखी एकदा व्यवसाय सुरू करण्याचा विचार नागनाथ यांच्या मनात आला. त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास सुरू केला. अभ्यासाअंती भांडी दुकान सुरू करण्याची संकल्पना त्यांच्या सौभाग्यवती सौ प्रभावती यांनी मांडली. या कामी जबाबदारी घेण्याची तयारी देखील त्यांनी दाखवली. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून 25 हजार रुपयांचे कर्ज त्यांनी घेऊन सचिन स्टील या नावाने व्यवसायास प्रारंभ केला. स्टील, पितळ , अल्युमिनियम ची सर्व प्रकारची भांडी, संसारोपयोगी साहित्य आदी उपलब्ध केले. तसेच मिक्सर व भांडी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, गॅस शेगडी दुरुस्तीचे काम देखील त्यांनी सुरू केले. या माध्यमातून ज्यावेळी भांड्यांना ग्राहक नसायचे अशा वेळी रिपेरिंग साठी ग्राहक आल्यामुळे फायदा होऊ लागला. कालांतराने त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, टीव्ही, फ्रिज, कुलर, एसी आदी साहित्य देखील विक्रीसाठी सुरुवात केली. याला सुद्धा माढा शहर व परिसरातील ग्राहकनी चांगला प्रतिसाद दिला. अत्यंत माफक दरात इलेक्ट्रिकल वस्तू मिळत असल्यामुळे ग्राहक सचिन स्टील येथेच गर्दी करू लागले. त्याबरोबरच इथे सीजनेबल वस्तू जसे की गौरी गणपती मध्ये सजावटीचे साहित्य, गौरी मूर्ती देखील मिळतात. सौ प्रभावती या महिला ग्राहकांशी सुसंवाद साधत असल्यामुळे महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली. ग्राहकांच्या मागणीनुसार घाडगे परिवार विविध वस्तू उपलब्ध करत. कालांतराने सो प्रभावती यांनी पितळेच्या वस्तू,व विविध प्रकारच्या मूर्ती,व तांब्याच्या वस्तू यावर लक्ष केंद्रित केले. एक विशेष विभागच तांब्या पितळेच्या वस्तूंचाही उपलब्ध केला. देवी देवतांच्या छोट्या-मोठ्या आकारातील मूर्ती, कलश, समई, निरंजनी तसेच तांब्याच्या असंख्य व्हरायटी येथे उपलब्ध केल्या. विविध सणवार तसेच लग्न कार्यात छोट्या-मोठ्या तांब्या पितळी पितळेच्या वस्तू लागतात. त्या माढा परिसरात मिळत नसल्याने नुकतेच त्यांनी अशा अनोख्या वस्तूंचे विशेष दालन सुरू केले आहे. त्यांचे चिरंजीव रितेश व सुनबाई हे या दालनाची जबाबदारी सांभाळतात. त्यामुळे सर्व परिसरातील महिलांची खूप सोय झाली. याची प्रसिद्धी खूप दुर दूरवर इतकी झाली की इंदापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर, मोहोळ तसेच जिल्हा बाहेरूनही ग्राहक प्रचंड गर्दी करू लागले. छत्रपती शिवाजी महाराज तसेच विविध महापुरुषांच्या तब्बल पन्नास हजार रुपयांपर्यंतच्या मूर्ती येथे उपलब्ध आहे. ग्राहक देखील एवढ्या किमतीच्या वस्तू आवर्जून खरेदी करतात.
नवोदित व्यवसायांना सल्ला देताना ते म्हणतात ग्राहकांचा विश्वास संपादन करता आला पाहिजे. तसेच ग्राहकांबरोबर संभाषण कौशल्य देखील आपल्याला आले पाहिजे. सौजन्यशील व्यवहार व वाजवी दर दर्जेदार माल आदी गोष्टींची खबरदारी घेतली तर शेकडो वर्ष तुम्ही बाजारपेठेवर राज्य करू शकता. घाडगे परिवाराची ही वाटचाल खरोखर प्रेरणादायी अशीच आहे.
शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.