माढा

घाडगे फिटनेस सेंटरची आरोग्य क्षेत्रात गरुड झेप 

शिवतंत्र न्यूज

घाडगे फिटनेस सेंटरची आरोग्य क्षेत्रात गरुड झेप 

शिवतंत्र न्यूज 

      माढा शहरातील जुन्या काळातील नामवंत व्यावसायिक अरुण घाडगे यांचे उद्योग व्यवसाय क्षेत्रात चांगले नाव आहे. आपल्या मुलांना त्यांनी व्यावसायिकतेचे धडे दिले. त्यांच्या सुनबाई सौ गीता प्रवीण घाडगे मॅडम यांनी घाडगे फिटनेस सेंटरच्या माध्यमातून परिसराला आरोग्यदायी बनवण्याचे काम करत आहेत. एक अत्याधुनिक जिम ग्रामीण भागात सुरू करून ती यशस्वी करून दाखवली आहे.

  सौ गीता या उच्चविद्या विभूषित आहेत. त्यांचे शिक्षण एम कॉम बीएड, एम ए एज्युकेशन झाले आहे. त्यांचे पहिली ते बारावी पर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. एका इंग्रजी माध्यम शाळेवर त्यांनी शिक्षिका म्हणून तब्बल पाच वर्षे काम केले. प्रवीण अरुण घाडगे यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतींनी त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. माढा येथील साई पब्लिक स्कूल वर त्यांनी मुख्याध्यापिका म्हणून आठ वर्षे काम केले. बरेच दिवस दुसरीकडे नोकरी केल्यानंतर स्वतःचा व्यवसाय असावा असे त्यांना मनोमन वाटू लागले. त्यांचे पती प्रवीण हे हॉलीबॉल खेळात राज्य पातळीवर सुवर्णपदक विजेते आहेत. तसेच ते शरीर सौष्ठव खेळाडू देखील आहेत. खूप दिवस हॉलीबॉल खेळल्यामुळे त्यांच्या स्नायूंना दुखापत झाली होती. ती भरून येण्यासाठी अद्ययावत जिम तसेच मार्गदर्शनाची गरज होती. माढ्यासारख्या ग्रामीण परिसरात ती उपलब्ध नसल्यामुळे खूप दिवसापासून प्रवीण यांना खंत वाटत होती. सौ गीता यांच्या मनात व्यवसाय संकल्पना येतात त्यांनी जिम हाच व्यवसाय सुरू करण्याचा प्रस्ताव सौ गीता यांच्यापुढे मांडला. 

    12 नोव्हेंबर 2022 रोजी अरुण यांचा 75 वा वाढदिवस असतो. या निमित्ताने सासर्‍यांच्या अमृत महोत्सव निमित्त जिम सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीलाच त्यांनी सोलापूर जिल्हा स्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. 120 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. विजेत्या स्पर्धकांना त्यांनी ट्रॉफी, पदक तसेच प्रमाणपत्र वाटप केले. आतापर्यंत घाडगे फिटनेस सेंटरच्या माध्यमातून 15 खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली आहे. घाडगे फिटनेस सेंटरला प्रवीण सर देखील मार्गदर्शन करतात. चेस्ट, बॅक, बायसेप, ट्रायसेप, लेग, शोल्डर आणि सर्व अवयवांच्या एक्सरसाइज साठी आवश्यक असणाऱ्या सर्व अध्ययवत मशिनरी येथे उपलब्ध आहेत. तसेच कार्डिओसाठी आवश्यक असणाऱ्या मशिनरी देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. महिलांसाठी स्वतंत्र वर्ग देखील चालवले जातात. सकाळी पाच ते साडेनऊ व संध्याकाळी पाच ते साडेनऊ या वेळेत परिसरातील नागरिक व्यायामासाठी सेंटरला येतात. माढा पंचक्रोशीतील शारीरिक आरोग्य जोपासणाऱ्या व्यक्तींना या जिमचा उपयोग झाला. पुणे, सोलापूर तसेच मोठ्या शहरांमधील जिम मध्ये जशा सुविधा उपलब्ध असतात तशाच प्रकारच्या मशिनरी, सुविधा माढा सारख्या ग्रामीण भागात देखील उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर झाली आहे. 

       सौ गीता यांचे पती प्रवीण घाडगे सर एका नामावंत प्रशालेत क्रीडा शिक्षक म्हणून काम करत असून या जिम मधील खेळाडूंना तेवेळोवेळी मार्गदर्शन करतात. पुढील वाटचाली बाबत सौ गीता म्हणाल्या की भविष्यकाळात घाडगे फिटनेस सेंटरच्या माध्यमातून राज्यस्तरावर तसेच विविध पातळीवर आपले स्पर्धक बाजी मारतील. शरीर सौष्ठव स्पर्धेसाठी आम्ही खेळाडूंची विशेष काळजी घेत असतो. भविष्यकाळात माढा परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांना तसेच खेळाडूंना आरोग्यदायी करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत अशी ग्वाही घाडगे फिटनेस सेंटरच्या संचालिका सौ गीता ताई घाडगे यांनी दिली.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close