करमाळा

जमिनीच्या वादातून शेटफळ येथे अपंग महिलेचा विनयभंग करत करत पतीला अमानुष मारहाण, पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवतंत्र न्यूज

जमिनीच्या वादातून शेटफळ येथे अपंग महिलेचा विनयभंग करत करत पतीला अमानुष मारहाण,
पाच जणांवर गुन्हा दाखल

शिवतंत्र न्यूज

 

   शेटफळ येथे जमिनीच्या वादातून पत्नीचा विनयभंग करत मारहाण करण्यात आली आहे. तर पतीला देखील जबर मारहाण करण्यात आली असून पतीवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून. पाच जणांवर  विविध कलमा खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तक्रारीत म्हटले आहे की,
वरील ठिकाणी पती व मुले असे एकत्र राहत असून मी व माझे पती शेती करून त्यावर आम्ही आमचे कुटुंबाची उपजीविका भागविते आहे. मौजे. शेटफळ (ना) ता. करमाळा येथे शेती गट नं. 21 मध्ये 06 एकर शेती असून त्या सहा एकरापैकी 04 एकर शेती ही राजेंद्र लक्ष्मण पवार यांचे नावाने असून ती शेती आम्ही खरेदी करण्याकरिता बोलत आलो आहोत. आमच्या कुटुंबाची कोर्टात वाद चालू आहे. ते क्षेत्र घोडीराम नामदेव मासाळ यांनी आमचे परस्पर खरेदी केली आहे परंतु त्याची नोंद झालेली नाही. त्या शेतामध्ये आम्ही उसाची पिके केलेली आहेत.

दिनांक 17/10/2026 रोजी आमचे शेती गट नं. 21 मधील उसाची तोडणी चालू असल्याने आमचे दिवसभर मी व माझे पती असे शेतात होतो. आम्ही शेतात असताना दुपारी 04.00 वाजेचे सुमारास आमचे ओळखीचे तुकाराम नामदेव मासाळ, घोडीराम नामदेव मासाळ, राजेश पोपट नरटे हे रा. शेटफळ ता. करमाळा, दादा विठ्ठल गुटाळ, गणेश गोरख डिगे दोघे रा. शेटफळ (ना) ता. करमाळा जि. सोलापूर हे आमचे शेताचे जवळ असलेल्या रस्त्यावर आले. त्यावेळी मी तेथेच असताना ते मला म्हणाले की, हे शेत आमचे आहे तुम्ही आमचे शेतातील उसाचे पिक काढता असे म्हणून ते सर्व जण शिवीगाळ करत असताना तुकाराम नामदेव मासाळ याने मी दिव्यांग असल्याचे माहित असताना त्याने मला लाथ मारली त्यामुळे मी खाली पडले. त्यानंतर त्याने माझे अंगावर बसून माझी छाती दाबली व माझा ब्लाऊज फाडून मला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले व मला उसात ओढत नेऊ लागला. त्यावेळी माझे.
गळ्यातील मंगळसूत्र दूरून कोठे तरी पडले. त्यानंतर त्याने मला हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. मी मोठ्याने ओरडा आरडा केला लागले त्यावेळी जवळ असलेले माझे पती व इतर माझ्याकडे आले. त्यावेळी घोडीराम नामदेव मासाळ याने त्याचे हातातील लाकडूची कु-हाड उचलून काढून तिने माझे पती यांचे पायावर, हातावर मारून जखमी केले तसेच हाताने लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यावेळी राजेश पोपट नरटे याने माझे पती यांचे परिवार मारहाण करून जखमी केले तसेच दादा विठ्ठल गुटाळ व गणेश गोरख डिगे यांनी त्यांचे हातातील लाकडी काठीने व लाथाबुक्क्याने मला व माझे पती यांना मारहाण केली. त्यामुळे आम्ही मोठ्याने ओरडू लागल्याने ते सर्वजण पळून निघून गेले.
तुकाराम नामदेव मासाळ, घोडीराम नामदेव मासाळ, राजेश पोपट नरटे तिघे रा. शेटफळ (ना) ता. करमाळा, दादा विठ्ठल गुटाळ, गणेश गोरख डिगे दोघे रा. शेटफळ (ना) ता. करमाळा जि. सोलापूर यांचे विरुद्ध तक्रार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास सुरू आहे.

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close