tembhurniबिझनेस

सेंट्रींग कामगार ते टाइल्स शोरूमचा मालक ;  टेंभुर्णीच्या पिंटू पाटलांचा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज

सेंट्रींग कामगार ते टाइल्स शोरूमचा मालक ; 

टेंभुर्णीच्या पिंटू पाटलांचा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज 

   मराठी उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा उमटवत असून परप्रांतीयांचे वर्चस्व असलेल्या टाइल्स व मार्बल क्षेत्रात देखील आपले बांधव पाठीमागे नाहीत. टेंभुर्णी येथील पिंटू शेठ पाटील यांचा प्रवास देखील अतिशय प्रेरणादायी आहे एक सेंट्रिंग कामगार ते टाइल्स शोरूम हा प्रवास नवउद्योजकांना दिशा देणारा असाच आहे. पिंटू ज्योतीराम (पिंटू) शंकर पाटील हे गेल्या 25 वर्षापासून बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत.लहानपणी घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे बालवयातच काम करण्यास त्यांनी सुरुवात केली. काही दिवस त्यांनी गवंड्याच्या हाताखाली मदतनीस म्हणून काम करण्यास सुरुवात केली. मात्र वय लहान असल्यामुळे वाळू – सिमेंट असलेल्या पाट्या उचलण्यास त्यांना त्रास होत असे. त्यांचे चुलते हे बांधकाम कंत्राटदार होते . त्यांच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर त्यांनी बांधकामावर पाणी मारण्याचे काम त्यांना दिले. हळूहळू त्यांनी गवंडीकाम, सेंट्रिंग ही कामे शिकून घेतली. हसण्या खेळण्याच्या वयात ते सेटिंग कामगार म्हणून काम करू लागले. सुमारे सात वर्षे त्यांनी हे काम केले .

   दुसऱ्याची बांधकामे करत असताना पिंटू पाटील यांच्या मनात मात्र परिस्थिती उलथवून टाकण्याची स्वप्न येत होती. इमारत बांधकाम करत असताना सर्व बाबींची माहिती पिंटू शेठ यांनी करून घेतली. विशेषता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फरशी, मार्बल रंगरंगोटी, किचन या कामात परप्रांतीय कामगार आघाडीवर असतात. या सामानाची खरेदी ते त्यांच्याच दुकानदारांकडून करतात. ही गोष्ट पिंटू शेठ यांच्या लक्षात आली आणि त्यांनी फरशी टाइल्स दुकान सुरू करण्याचा निर्धार केला. या व्यवसायासाठी भांडवल बरेच लागणार होते जवळ थोडीफार पुंजी होती. मित्रमंडळी नातेवाईक यांच्याकडून काही रक्कम ऊसनवारीने घेऊन टेंभुर्णी करमाळा रोडवर दोन गुंठे जागा भाड्याने घेऊन दिव्या मार्बल अँड टाइल्स या व्यवसायाचा शुभारंभ केला. सुरुवातीला अडचणी आल्या. मात्र त्यांनी आपल्या कौशल्यावर त्यावर मात केली. सुमारे साडेचार लाख एवढी रक्कम त्यांनी जमा केली होती . हे भांडवल सुद्धा अपुरे पडत होते सेंट्रिंग काम करत असताना कंत्राटदार, कामगार तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांशी त्यांचा संबंध आलेला होता. या संबंधांचा फायदा व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना झाला. सात वर्ष पिंटू पाटील यांनी अतिशय दर्जेदार काम, कमीत कमी व माफक दरात केले होते. हा व्यवसाय सुरू केल्या नंतर त्यांनी सर्व मित्रमंडळी, व कॉन्ट्रॅक्टर यांना विश्वासात घेऊन सर्व बांधकाम साहित्य दर्जेदार व योग्य दरात पुरण्याचा शब्द दिला होता .त्यामुळे टेंभुर्णी परिसरातून त्यांना बांधकाम साहित्याच्या ऑर्डर मिळू लागल्या .बोलल्याप्रमाणे मटेरियल गुणवत्तापूर्ण व किफायतशीर दरात दिल्यामुळे त्यांच्यावरील विश्वास अधिक वृद्धिंगत झाला. कॉन्ट्रॅक्टर कामगार यांच्याबरोबरच बांधकाम करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना मध्यस्थी करून त्यांनी दर्जेदार काम करणारे कॉन्ट्रॅक्टर , गवंडी, सेंट्रिंग कामगार मिळवून दिले. बरेचसे कामगार, कॉन्ट्रॅक्टर काम अपूर्ण ठेवतात , ठरल्या पेक्षा जास्त दराने काम करतात, दर्जाहीन काम करतात . परंतु पिंटू पाटील यांनी विश्वासू लोकांना प्राधान्य दिल्यामुळे नागरिकांची या त्रासातून मुक्तता झाली.लोकांचे पैसे, वेळ वाचला. तसेच त्यांच्या विक्रीतही वाढ झाली. 

 
 
 

      पिंटू पाटील यांची व्यवसायाच्या माध्यमातून एक नवीन ओळख टेंभुर्णी परिसरात झाली. त्यांच्या दुकानात दर्जेदार साहित्य , किफायतशीर दरात मिळत आल्यामुळे दूरवरून ग्राहक येऊ लागले. दोन गुंठे जागा सुद्धा त्यांना कमी पडू लागली त्यामुळे त्यांनी करमाळा रोड वरच 21 गुंठे जागा विकत घेतली. 2021 मध्ये सुमारे 6000 चौरस फूट एवढ्या भव्य दिव्य जागेत सुसज्ज शोरूम बांधकाम करत व्यवसायाचे स्थलांतर त्यांनी केले. गेली सतरा वर्षे अविरतपणे पिंटू पाटील दिव्या मार्बल अँड टाइल्स या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना सेवा देण्याचे काम करत आहेत. दरम्यानच्या काळात अनेक अडचणी आल्या मात्र न डगमगता ठामपणे पिंटू पाटील उभे राहिले. सध्या त्यांच्याकडे ग्रेनाईट , तंदूर, शहाबाद , मार्बल, ढोलपूर, डेकोरेटिव्ह मार्बल आर्टिकल्स, सिरॅमिक टाइल्स , सॅनिटरी वेअर आदी साहित्य होलसेल दरात मिळते .

 
 

     आपल्या या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना पिंटू शेठ म्हणतात की , मी आजही ग्राहकांना दैवत मानून ग सेवा देण्याचा प्रयत्न करतो. ग्राहकांचे दोन पैसे कसे वाचतील याचा विचार करतो. माझ्या माध्यमातून ग्राहकांचे लाखो रुपये वाचले आहेत. त्यामुळे ग्राहक दूरदूरवरून आपल्या दुकानात खरेदीसाठी येतात. नवउद्योजकांना काय मंत्र द्याल असे विचारले असता ते म्हणाले की, तरुणांनी व्यवसाय सुरू केल्यानंतर सुरुवातीचे पाच वर्षे व्यवसायातील भाग भांडवल कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे. गाडी – बंगला आदी बाबी व्यवसाय पूर्णपणे स्थिरावल्या नंतर कराव्यात. जो व्यवसायिक निर्व्यसनी राहील तोच लवकर यशस्वी होतो. त्यामुळे युवा उद्योजकांनी व्यसनापासून दूर राहावे . आणखी एक महत्त्वाची गोष्ट शक्यतो व्यवसाय सुरू केल्यानंतर लवकरात लवकर स्वतःची जागा घेण्यास प्राधान्य द्यावे .व्यवसाय स्थिर होईपर्यंत काटकसरीने व्यवस्थापन केल्यास अवांतर खर्च कमी केल्यास व्यवसाय यशस्वी होऊ शकेल. .

   अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नव्या उमेदीने जिद्द चिकाटीच्या जोरावर आपले विश्व उभारणाऱ्या पिंटू शेठ पाटील यांची प्रेरणा घेऊन नव उद्योजकांनी वाटचाल करण्याची गरज आहे

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close