tembhurni

उच्चशिक्षित तरुणाची केळी उद्योगात गरुडभरारी

शिवतंत्र न्यूज

उच्चशिक्षित तरुणाची केळी उद्योगात गरुडभरारी

शिवतंत्र न्यूज 

  उच्चशिक्षित तरुणाची केळी उद्योगात गरुडभरारी 

 

   वैद्यकीय अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करून करिअर करण्याचे स्वप्न बहुतेक तरुणांचे असते मात्र मेकॅनिकल इंजिनिअर असणाऱ्या तरुणाने नोकरी सोडत कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून नोकरीसाठी आटापिटा करणाऱ्या तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे.

     अक्षय लोकरे या तरुण उद्योजकांने वीररत्न पॅकेजिंग व अद्विका ऍग्रो एक्सपोर्ट या उद्योगाच्या माध्यमातून केळी निर्यात व पॅकेजिंग क्षेत्रात मानाचे स्थान पटकावले आहे. 

     अक्षय लोकरे यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग 2018 मध्ये पूर्ण केले. वडील अनुरथ लोकरे हे पूर्णपणे अशिक्षित. मात्र त्यांनी आपला मुलगा चांगल्या पगाराची नोकरी करून आपल्याला सुखी ठेवेल असे स्वप्न पाहिले होते. एका नामांकित कंपनीत त्यांना मार्केटिंग हेड पदावर जॉब मिळाला. सुरुवातीला आठ हजार पगार त्यांना मिळाला होता. पॅकेजिंग मटेरियल पुरवण्याचे काम त्यांना मिळाले होते. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आपल्या कामास प्रारंभ केला. याच दरम्यान विविध केळी एक्सपोर्ट कंपन्या, शेतकरी यांच्याशी त्यांचा निकटचा संबंध आला. अक्षय अतिशय हुशार व तल्लख बुद्धिमत्ता असणारे व्यक्तिमत्त्व होते. या क्षेत्रात भरपूर वाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन वर्ष कंपनीत जॉब केल्यानंतर आपल्या स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचे ठरवले. जवळच्या व्यक्तींनी नोकरी सोडून व्यवसाय करण्यास नापसंती दर्शवली. मात्र अक्षय आपल्या निर्णयावर ठाम होते.

     2021 मध्ये वीररत्न पॅकेजिंग या नावाने केळी एक्स्पोर्ट कंपन्यांना पॅकेजिंग मटेरियल पुरवण्यास त्यांनी सुरुवात केली. कंपन्यांना पुरवठा करत असताना स्थानिक शेतकऱ्यांना केळी घडासाठी लागणाऱ्या स्कर्टिंग बॅग, क्रॉप कहर , फ्रुट कव्हर आदी साहित्यही ना नफा ना तोटा या तत्त्वावर पुरवण्यात त्यांनी सुरुवात केली. आज मीतिला आय एन आय फार्मस, वीग्रो , एस के बनाना , जीएस इंडिया, जी 5 इंडिया ,सनरीया ऍग्रो, आर्यन ग्लोबल एक्सपोर्ट , देहांत ऍग्रीकॉम, ट्रायडंट अग्रिकॉम या सर्वच केळी एक्स्पोर्ट करणाऱ्या कंपन्यांना पॅकिंग मटेरियल वीर रत्न पॅकेजिंग कंपनीकडून केली जाते. यासोबत आंध्र प्रदेश , तामिळनाडू, मध्यप्रदेशगुजरात,केरळ ,बुरहानपुर

महाराष्ट्रातील जळगाव, नांदेड,जामनेर आदी जेथे जेथे केळी पिकवली जाते व एक्स्पोर्ट केली जाते त्या ठिकाणी पॅकेजिंग मटेरियल अक्षय यांच्या कंपनीकडून पुरविले जाते. वीर रत्न पॅकेजिंग कंपनीकडून पुरविले जाणारे मटेरियल प्रीमियम क्वालिटीचे तत्पर डिलेवरी असल्यामुळे त्यांच्या मालाच सर्वत्र मागणी असते. 

    पॅकेजिंग मटेरियल सोबतच अक्षय एक्सपोर्ट क्वालिटीची केळी एक्सपोर्ट करण्याचे काम अद्विका ऍग्रो एक्स्पोर्ट कंपनीच्या माध्यमातून करतात. अक्षय यांचा मुख्य व्यवसाय पॅकेजिंग मटेरियल पुरवण्याचा आहे त्यामुळे ते शेतकरी कडून अतिशय कमी नफ्यावर केळी खरेदी करतात. स्वतः शेतकरी कुटुंबातून त्यांची जडणघडण झालेली असल्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदनांची, कष्टाची त्यांना जाण आहे म्हणूनच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने ते काम करतात. टेंभुर्णी परिसरात केळी घडांसाठी स्कर्टिंग बॅग, तसेच डाळिंब क्रॉप कव्हर मिळत नव्हते म्हणून खास शेतकऱ्यांच्या सोयीसाठी अतिशय कमी दरात हे मटेरियल ते पुरवतात. . अद्विका ऍग्रो एक्सपोर्ट या कंपनीची शासनाकडे त्यांनी रीतसर नोंदणी केली आहे.

   टेंभुर्णी परिसरात केळी प्रक्रिया उद्योग त्यांना उभारायचा आहे. त्यादृष्टीने त्यांचे नियोजन चालू आहे. नुकतीच त्यांनी दुबई येथे भरलेल्या 140 देशांच्या गल्फ फूड प्रदर्शनास भेट देऊन त्या दृष्टीने हालचाल सुरू केली आहे. या कामात त्यांना त्यांचे दाजी रवी उत्तरेश्वर खडके व संदीप धर्मराज भोसले हे मदत करतात. तसेच त्यांचे पाच चुलते हे देखील जातीने लक्ष घालतात व वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतात तसेच त्यांचे छोटे बंधू निलेश यांनी सुद्धा अतिशय खडतर परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले आहे. दोघांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले .निलेश हे नवोदय विद्यालयासाठी पात्र झाले होते .नंतर आयआयटी गुवाहाटीसाठी त्यांची निवड झाली. ते केमिकल इंजिनिअर आहेत. वडील अशिक्षित होते मात्र दोन्हीही मुलांना उच्च शिक्षण दिले .त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना विविध संस्थांकडून पुरस्कार मिळाले आहेत. २०२४ मध्ये बिज़नेस एक्सलेंट अवार्ड देखील मिळाले होते तसेच आर्यन ग्लोबल एक्सपोर्ट कंपनीकडून त्यांना बेस्ट पॅकेजर पुरस्कार मिळाला असून त्यांना हेलिकॉप्टर राईडची संधी देखील मिळाली आहे .

   

    अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करून आपल्या माता पित्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अविश्रांत परिश्रम करून यशस्वी झालेल्या तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांचा कळवळा जपणाऱ्या लोकरे बंधूंची प्रेरणा नवउद्योजकांना नक्कीच पथदर्शी ठरेल.

   

 

   

 

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close