Uncategorized
ओंकार गोल्ड अँड सिल्वर पॅलेस मध्ये मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन भाग्यवान विजेत्यांना मिळणार तिरुपती दर्शन तसेच अन्य बक्षिसे
शिवतंत्र न्यूज

ओंकार गोल्ड अँड सिल्वर पॅलेस मध्ये मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन
भाग्यवान विजेत्यांना मिळणार तिरुपती दर्शन तसेच अन्य बक्षिसे
शिवतंत्र न्यूज
टेंभूर्णी प्रतिनिधी

आपल्या गुणवत्ता शुद्धतेच्या जोरावर गेल्या अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत असलेल्या ओंकार गोल्ड अँड सिल्वर पॅलेस यांनी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौभाग्य लक्ष्मी मंगळसूत्र महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्ताने एक मार्च ते एक एप्रिल 2026 पर्यंत खरेदी करणाऱ्या सभासदांमधून भाग्यवान विजेते निवडण्यात येणार आहेत. विजेत्यांना आकर्षक बक्षीस योजना सुद्धा राबविण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना ओंकार गोल्ड चे मालक विजय पाटील म्हणाले की, आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमच्या ग्राहकांसाठी सौभाग्य लक्ष्मी मंगळसूत्र महोत्सव राबवत आहोत. ही योजना एक मार्च ते एक एप्रिल 2026 पर्यंत चालेल.यात भाग्यवान सुवासिनी बक्षीस योजनेत प्रत्येक ग्राहकाला जी महिला कोणतेही 22 कॅरेटचे मंगळसूत्र व दागिने तसेच चांदीच्या दागिनेच्या खरेदीवर एक सुवासिनी कुपन दिले जाईल. यातून भाग्यवान विजेते निवडण्यात येणार आहे.पहिले बक्षीस जोडप्यासाठी तिरुपती दर्शन यामध्ये टेंभुर्णीतून येण्या जाण्याचा प्रवास, तेथील निवास खर्च, दर्शन सर्व ओंकार गोल्ड करेल. दुसरे बक्षीस माहेश्वरी साडी, तिसरे बक्षीस येवला पैठणी, चौथे बक्षीस सोन्याची नथ, पाचवे बक्षीस डायमंड सारखे दिसणारे C2 ज्वेलरी सेट अशी आकर्षक बक्षीस योजना राबविण्यात येणार आहे.. या मंगळसूत्र महोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही 22 कॅरेटचे मंगळसूत्र किंवा दागिने घडणावळ फक्त 9.9% घेतली जाईल तसेच कोणतेही जुने 22 कॅरेटचे मंगळसूत्र किंवा दागिने वजनाला वजन 100% एक्सचेंज केले जातील. यात कोणतीही घट पकडली जाणार नाही. जास्तीत जास्त महिला वर्गाने या मंगळसूत्र महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन विजय पाटील यांनी केले आहे.





