Uncategorizedकरमाळा

अकाउंटंट ते कापड दुकान जिद्द व संघर्षाच्या चोरावर साधली प्रगती  कुंभेज येथील किरण शिंदे यांची यशोगाथा 

शिवतंत्र न्यूज 

अकाउंटंट ते कापड दुकान

जिद्द व संघर्षाच्या चोरावर साधली प्रगती 

कुंभेज येथील किरण शिंदे यांची यशोगाथा 

शिवतंत्र न्यूज 

     घरामध्ये कोणताही व्यवसायिक वारसा नसताना फक्त यशस्वी होण्याची जिद्द मनात ठेवून वाटचाल करत यशस्वीरित्या कापड दुकान चालवण्याची किमया साधली आहे कुंभेज तालुका करमाळा येथील किरण शिंदे. यांनी जेऊर शहर फक्त तीन किलोमीटर असताना ग्राहकाचा प्रचंड प्रतिसाद किरण शिंदे यांच्या विठू माऊली कलेक्शन या व्यवसायास मिळत आहे.

     किरण भारत शिंदे कुंभेज तालुका करमाळा येथील उच्च शिक्षित तरुण शिक्षण एम कॉम पर्यंत झाले. शेतकरी कुटुंब असल्यामुळे परिस्थिती बेताचीच होती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुणे येथे धनस्मृती टेक्स्टाईल कंपनीत अकाउंटंट म्हणून काम मिळाले.3 महिने पुणे येथे काम केल्यानंतर कुंभेज येथेच नव्याने सुरू झालेल्या धनस्मृती टेक्स्टाईल कंपनीत ते काम करू लागले.नोकरीमध्ये स्थिर झाल्यानंतर त्यांचा विवाह सौ क्रांती यांच्याशी झाला. सर्व काही सुरळीत असताना कोरोना महामारीने जगावर आक्रमण केले . नाईलाजाने किरण यांना नोकरी सोडावी लागली .गावाकडे आल्यानंतर पोटापाण्यासाठी काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला. विचारांती एखादा व्यवसाय सुरू करावा असा निर्णय झाल्यावर कोणता व्यवसाय आणि कोठे सुरू करायचा याबाबत विचारमंथन सुरू झाले . कुंभेज परिसरात कुंभेज फाटा येथे बरेच उद्योग सुरू होते. त्यामध्ये हॉटेल , कृषी सेवा केंद्र, चहा- नाष्टा, इलेक्ट्रॉनिक्स अशी दुकाने होती.परंतु या ठिकाणी कापड दुकान मात्र नव्हते. कापड दुकान सुरू करण्याचा विचार किरण शिंदे यांच्या डोक्यात आला.किरण शिंदे हे शेतकरी कुटुंबातून होते. भांडवल फारसे शिल्लक नव्हते. कारण कापड दुकानासाठी कितीही भांडवल असले तरी कमीच पडते. जवळचे काही , बंधू गणेश शिंदे यांच्याकडून असे दहा लाख रुपये भांडवल जमवले. कुंभेज फाटा येथे जागा भाड्याने घेतली. 25 × 70 एवढी जागा भाड्याने घेऊन 05 ऑक्टोबर 2022 रोजी विठू माऊली कलेक्शन या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला. 

   

       किरण शिंदे यांनी या व्यवसायाचा बिलकुल अनुभव नव्हता . त्यामुळे सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या. खरेदी कोठे करायची, कापडातील विविध प्रकार कसे ओळखायचे , ग्राहकाला कोणत्या नंबरचे कपडे दाखवायचे असे एक ना अनेक अडचणी यायच्या. नवीन व्यवसाय असल्याने हाताखाली कामगार ठेवता येत नव्हते. किंबहुना ते परवडण्यासारखेही नव्हते. स्वतः किरण यांना सर्व आघाड्या सांभाळाव्या लागत होत्या. सुरुवातीला त्यांनी सुटींग, शर्टींग, साड्या, ड्रेस मटेरियल, चिल्ड्रन वेअर, लेडीज वेअर, जेन्ट्स वेअर, होजिअरि असे सर्व प्रकारचे कपडे ठेवले होते. अनुभव नव्हता मात्र तोंड गोड होते.कष्टाची तयारी होती. सुरुवातीला एक वर्ष व्यवसाय शिकण्यातच गेले व्यवसायातील खाचाखोचा ते अनुभवाने शिकले. जेऊर ही परिसरातील मोठी बाजारपेठ फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे .परंतु किरण शिंदे यांच्या स्वभावामुळे तसेच गुणवत्ता पूर्ण मालामुळे ही अडचण त्यांना कधीच निर्माण झाली नाही. पारेवाडी, पोफळज,उंदरगाव मांजरगाव, जेऊर, कुंभेज तसेच परिसरातून बहुसंख्येने ग्राहक त्यांच्याकडे येऊ लागले .आणि बघता बघता विठू माऊली कलेक्शन हा व्यवसाय नावावर रूपाला आला . दोन कामगार त्यांनी मदतीला घेतले .भांडवलामध्ये लक्षणीय वाढ झाली.दहा लाखाचे भांडवल ८० ९० लाखांवर गेले . जेऊर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेने त्यांना भांडवलासाठी मदत केली. विठू माऊली कलेक्शनला तीन वर्षे पूर्ण झाली असून चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे.

      त्यांच्या या वाटचालीबाबत बोलताना किरण सांगतात याकामी माझे बंधू गणेश शिंदे, पत्नी सौ कांती शिंदे यांनी अतिशय मोलाची मदत केली आहे . आम्ही नेहमी बाजारात ज्या मालाला जास्त मागणी आहे असा ट्रेंडिंग माल खरेदी करतो त्यामुळे ग्राहकाला नवीन व्हरायटी पाहण्यास मिळते. ग्राहकाला देव मानून आम्ही वाटचाल केली. ग्राहकाला कधीही फसवले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात हा व्यवसाय असूनही आम्हाला येथे ग्राहकांचा तुटवडा भासला नाही. सध्या आहे ही जागा कमी पडत असून लवकरच आम्ही स्वतःची जागा घेऊन भव्य दिव्य स्वरूपात व्यवसायाच्या उभारणीसाठी प्रयत्न करत आहोत. कुटुंबातील तसेच जवळच्या नातेवाईकांना वाटत होते की,b हे व्यवसाय करू शकणार नाहीत परंतु ग्राहकांना उत्तम सेवा दिल्यामुळे आम्ही हा समज खोडून काढू शकलो.

     कोणतीही पार्श्वभूमी नसताना फक्त जिद्द व महत्त्वकांक्षेच्या चोरावर कापड उद्योगात ग्रामीण भागात यशस्वी झालेल्या किरण शिंदेंची ही जीवनगाथा ग्रामीण भागातील कापड व्यवसायात करणाऱ्या व्यावसायिकांना प्रेरणा देणारी आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close