बिझनेस

टेंभुर्णीतील गोरख बाप्पा देशमुख बनले बिजनेस आयकॉन  सदगुरू क्लॉथ सेंटरला झाली 22 वर्षे पूर्ण 

शिव तंत्र न्यूज

टेंभुर्णीतील गोरख बप्पा देशमुख बनले बिजनेस आयकॉन 

सदगुरू क्लॉथ सेंटरला झाली 22 वर्षे पूर्ण 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क 

 

     मराठा युवकांना व्यवसाय व्यापार जमत नाही, सुरू केला तर टिकवता येत नाही अशा टिपण्या कानावर येतात, मात्र टेंभुर्णी तालुका माढा येथील गोरख बाप्पा देशमुख यांनी आपल्या सदगुरू क्लॉथ सेंटर या व्यवसायास तब्बल 22 वर्ष पूर्ण केली आहेत. व्यवसायाबरोबरच सामाजिक राजकीय क्षेत्रात भरीव योगदान देत ते उद्योग क्षेत्रातील आयकॉन बनले आहेत सदगुरू क्लॉथ सेंटर, सदगुरू जीन्स गॅलरी या व्यवसायाच्या माध्यमातून हजारो ग्राहकांना सेवा देण्याचे काम ते करत आहेत.

 

   2004 मध्ये एका दहा बाय दहा अशा छोट्याशा जागेत त्यांनी सदगुरू क्लॉथ सेटर या नावाने व्यवसायाचा श्रीगणेशा केला. येथे त्यांनी शूटिंग , शर्टींग , साडी, ड्रेस मटेरियल, किड्स वेअर, लेडीज वेअर, जेन्ट्स वेअर आदी विक्रीसाठी ठेवले होते. हा व्यवसाय सुरू करण्याच्या अगोदर त्यांनी टेंभुर्णी येथेच एका नामांकित कापड दुकानात तब्बल पाच वर्षे नोकरी केली कापड व्यवसायातील खाचा खोचा, कापडाची पारख ,व्यापाऱ्यांसोबत कसे संबंध प्रस्थापित करायचे, विक्री कौशल्य या सर्व बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास केला होता. याचा उपयोग स्वतःचा व्यवसाय सुरू करताना झाला. बप्पांकडे सुरुवातीला भांडवल नव्हते .व्यापाऱ्यांबरोबर झालेल्या संबंधांच्या जोरावर त्यांनी भांडवल उभारणी केली. व्यापाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच बप्पा आपला व्यवसाय सुरू करू शकले. सुरुवात तर झाली मात्र खेळते भांडवलग कसे उभे करायचे असा प्रश्न निर्माण झाला. बप्पांनी पैशाला पैसा लावत भांडवलत वाढ केली. एक रुपया सुद्धा तर अवांतर खर्च केला नाही. त्यांचा स्वभाव पूर्वीपासून मृदू , मन मिळावू असल्याने ग्राहकावर अल्पावधीतच त्यांचा प्रभाव पडला. दूर दूरवरून ग्राहक त्यांच्या दुकानाकडे खेचले गेले. सुरुवातीचे तीन वर्षे असे तसेच गेले. नंतर मात्र बप्पांनी नंतर चांगलाच बसवला.. भांडवल बऱ्यापैकी तयार झाले होते .2010 नंतर सदगुरू क्लॉथ सेंटरच्या ग्राहक संख्येत लक्षणीय वाढ झाली भांडवलात वाढ झाल्याने कापडाच्या व्हरायटीत तसेच नवीन फॅशन, ट्रेंड नुसार माल ठेवण्यास सुरुवात केली. प्रगतीचा हा आलेख वरचेवर वृद्धिंगत होत गेला.

     2018 मध्ये त्यांचा हा व्यवसाय यशशीखरावर पोहोचला होता. गोरख बप्पा यांनी पुणे सोलापूर हायवे टच १८ बाय २५ एवढ्या आकाराचे सुसज्ज दोन मजली शोरूम भाड्याने घेतले .या जागेत त्यांनी व्यवसायाचे स्थलांतर केले. टेंभुर्णी शहरात मध्यवर्ती ठिकाणी व्यवसाय सुरू झाल्यामुळे गोरख बप्पा यांनी प्रचंड झेप घेतली. या ठिकाणी शेवरे, शिराळ, सुरली, चांदे, भांडगाव, लगूर्ली, वडवली, टाकळी, फूट जवळगाव, कनेरगाव, दहिवली, बेंबळे, तांबूत , माळेगाव, मिटकलवाडी, हरीनग,र भुईंज भिमानगर, राजुरी, टेंभुर्णी शहर आदी गावातील शेकडो नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लाग ले .दर्जेदार माल , भरपूर व्हरायटी , किफायतशीर वर यामुळे सदगुरू क्लॉथ सेंटरने ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. आपल्या यशाचे रहस्य काय याबाबत ते म्हणतात की, ग्राहकाचा माझ्यावरील विश्वास, नीतिमत्ता , नफेखोरीला थारा न दिल्याने तसेच ग्राहकांशी आपुलकीने संवाद साधने आदी बाबींमुळे मी कापडासारख्या बे भरवशाच्या क्षेत्रात 22 वर्षे पूर्ण केले आहेत. या पुढील काळात सुद्धा असाच प्रामाणिकपणे व्यवसाय करत ग्राहकांचे समाधान हेच ब्रीद घेऊन आपण मार्गक्रमण करणार आहोत. असे त्यांनी सांगितले. गोरख बप्पा देशमुख यांना दोन मुले आहेत. विकास नाना देशमुख हे बप्पा सोबत असतात, तर दुसरे चिरंजीव आकाश हे सिव्हिल इंजिनिअर असून लवकरच ते व्यवसायात पदार्पण करणार आहेत.

    टेंभुर्णी परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्राशी बप्पांचा सक्रिय सहभाग असतो . विविध सामाजिक प्रश्न संदर्भात पप्पांनी आंदोलने केले आहेत. महापुरुषांच्या सन्मानात बाप्पा नेहमीच रस्त्यावरची लढाई करतात. व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत बप्पा कार्यरत असतात टेंभुर्णी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीत बाप्पाचा सिंहाचा वाटा आहे . नव उद्योजकांना व्यवसायाचा मूलमंत्र देताना ते म्हणतात, व्यापारामध्ये भरपूर संधी आहेत. फक्त कष्ट करण्याची तयारी, नीतिमत्ता ठेवली तर कोणत्याही व्यवसाय तुम्ही यशस्वी होऊ शकतात. 

    चतुरस्र व्यक्तिमत्व असलेल्या गोरख बप्पा देशमुख यांच्या प्रेरणेतून बोध घेत तरुणांनी विविध व्यवसायात वाटचाल करण्याची गरज आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close