ऐतिहासिक

किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

शिवतंत्र न्यूज

किल्ले पुरंदर येथे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन

शिवतंत्र न्यूज

 

    स्वराज्याचे धाकले धनी, शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन किल्ले पुरंदर याठिकाणी करण्यात आले असून शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट (पुणे) यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी १० वा. हा सोहळा पार पडणार असून या सोहळ्यासाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, पुण्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय झुरंगे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष अमित झेंडे आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष सूरज देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

या सोहळ्याच्या निमित्ताने सामाजिक, उद्योजकता व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना शंभुगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. कर्जत (जि. अहिल्यानगर) येथील सर्व सामाजिक संघटनांचा सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल संयुक्तपणे सन्मान करण्यात येणार आहे. एसव्ही ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे प्रमुख डॉ. मनोज कदम यांना उद्योजकता क्षेत्रातील कामगिरीबद्दल, तर पत्रकार हर्षल बागल यांना पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरवण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा जागर करून आजच्या पिढीसमोर त्यांचा वास्तववादी इतिहास आणि विचार मांडण्यासाठी शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सोहळ्याचे १३वे वर्ष आहे. या सोहळ्यासाठी जास्तीत जास्त शिवशंभुप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अमोल काटे, प्रदीप कणसे, अनिल माने, हर्षवर्धन मगदूम, वैभव शिंदे, कैलास कणसे, संतोष हगवणे, अशोक काकडे, आदींनी केले आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close