tembhurni

जाधव दातांचा दवाखाना मल्टीस्पेशालिटी डेन्टल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर उद्घाटन समारंभ व १० वा वर्धापन दिन अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर संपन्न होणार 

शिवतंत्र न्यूज

जाधव दातांचा दवाखाना मल्टीस्पेशालिटी डेन्टल क्लिनिक व इम्प्लांट सेंटर उद्घाटन समारंभ व १० वा वर्धापन दिन अक्षय तृतीया च्या मुहूर्तावर संपन्न होणार 

 

शिवतंत्र न्यूज 

   टेंभुर्णी शहरात गेल्या 10 वर्षांपासून रुग्णांना अविरत सेवा देत असलेले डेंटल सर्जन डॉ विशाल जाधव व डॉ सौ चेतना विशाल जाधव यांच्या जाधव दातांचा दवाखाना व मल्टीस्पेशलिटी डेंटल क्लिनिक चा दहावा वर्धापन दिन व स्थलांतर सोहळा रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे.

   याबाबत अधिक माहिती देताना डॉ विशाल जाधव म्हणाले की , १० वर्षांचा विश्वास, निरोगी हास्याची दशकपूर्ती तसेच अत्याधुनिक सुविधा, अद्ययावत मशिनरी व समर्पित सेवेसह नवीन वास्तूमध्ये प्रवेश करीत आहोत. या आनंदायी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी टेंभुर्णी परिसरातील नागरिकांना आग्रहाचे निमंत्रण देत आहोत.

अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावररविवार १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ०४ वाजता करण्याचे योजिले आहे.

     कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार बबनदादा शिंदे तसेच आई-वडिलांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय मामा शिंदे माजी आमदार करमाळा विधानसभा,  रणजीत भैया शिंदे चेअरमन सोलापूर , जिल्हा दूध संघ , डॉ विवेक करपे दंतवैद्य सोलापूर,  डॉ अश्विनी करपे दंतवैद्य सोलापूर,  डॉ यतीराज बिराजदार दंतवैद्य उमरगा,  डॉ अमोल भोसले दंत वैद्य टेंभुर्णी,  डॉ अमोल शिरकांडे दंतवैद्य पुणे,  डॉ लालासाहेब शेंडगे अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन टेंभुर्णी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

   या कार्यक्रमासाठी शहर व परिसरातील सर्व नामांकित डॉक्टर , विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व ग्रामपंचायत सदस्य, सर्व पक्षाचे आजी माजी पदाधिकारी, सर्व व्यापारी बंधू व सर्व ग्रामस्थ सुर्ली व टेंभुर्णी, तसेच सर्व सदस्य डॉक्टर असोसिएशन टेंभुर्णी, कॅन्सर फाउंडेशन टेंभुर्णी, सर्व सामाजिक संस्था पदाधिकारी व सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन किसन नारायण जाधव (रावसाहेब), सौ. छाया किसन जाधव, डॉ. सौ. चेतना विशाल जाधव (B.D.S. दंतवैद्य), डॉ. विशाल किसन जाधव (B.D.S. दंतवैद्य) यांनी केले आहे.

पत्ता – छत्रपती संभाजी महाराज, छावा चौक – अकलूज चौक, टेंभुर्णी.

 

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close