
संभाजी ब्रिगेड पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी सचिन जगताप यांची निवड
शिवतंत्र न्यूज

महाराष्ट्रातील एक आक्रमक संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी ब्रिगेड च्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष पदी संभाजी ब्रिगेड चे सोलापूर जिल्हा माजी अध्यक्ष सचिन जगताप यांची निवड एकमताने निवड करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले आहे. त्यांच्या निवडीनंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. सचिन जगताप यांची ओळख एक आक्रमक नेतृत्व म्हणून आहे. जिल्ह्याबरोबरच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध प्रश्न त्यांच्या नेतृत्वाखाली सोडवले गेले आहेत. लढाऊ कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्या पाठीशी आहे. मराठा सेवा संघाच्या मुशीतून त्यांची जडणघडण झाली आहे. एक केडर बेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख संपूर्ण राज्यभर असून त्यांच्या निवडीमुळे पश्चिम महाराष्ट्र संभाजी ब्रिगेड मध्ये नव चैतन्य निर्माण झाले आहे.




