tembhurni
ओंकार गोल्डअँड सिल्व्हर पॅलेसने टेंभुर्णी व माढा तालुक्याच्या परिसरात मिळवला नावलौकिक उद्योजक विजय पाटील व महेश पाटील यांची गौरवशाली वाटचाल
शिवतंत्र न्यूज

ओंकार गोल्ड अँड सिल्वर पॅलेसने टेंभुर्णी व माढा तालुक्याच्या परिसरात मिळवला नावलौकिक
उद्योजक विजय पाटील व महेश पाटील यांची गौरवशाली वाटचाल
शिवतंत्र न्यूज

ग्रामीण उद्योजक नवनवीन क्षेत्रात गगन भरारी घेताना दिसत आहेत. ज्वेलरी क्षेत्रही याला अपवाद नाही. या क्षेत्रात भरपूर भांडवल ज्ञान, संघर्ष लागत असल्याने या क्षेत्रात मराठा उद्योजकांचे प्रमाण नगण्य आहे. परंतु टेंभुर्णी येथील विजय लोभे पाटील यांनी गेल्या 23 वर्षांपासून ग्राहकांना अत्युच्च सेवा देत नावलौकिक मिळवला आहे.

विजय पाटील यांची एका शेतकरी कुटुंबातील जडणघडण झाली आह. एक भाऊ, एक बहीण आई-वडील असे छोटे खानी कुटुंब. वडील अगतराव लोभे पाटील हे शासकीय सेवेत पंढरपूर येथे कार्यरत असल्यामुळे त्यांचे संपूर्ण शालेय महाविद्यालयीन शिक्षण पंढरपूर येथेच झाले. त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे, मुंबई येथे गेले. त्यांची स्वप्न खूप मोठी होती. त्यामुळे मन लावून त्यांनी अभ्यास केला. त्यांना या क्षेत्रात संमिश्र यश मिळाले .परंतु यात ते समाधानी नव्हते. आयुष्यात काहीतरी भव्य दिव्य करण्याचे त्यांचे स्वप्न होते. नोकरी करून ती साकार होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी व्यवसाय करण्याचा निर्धार केला. सोने-चांदी व्यवसायात बऱ्याच संधी असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या एक नातेवाईकांचे सराफ दुकान आहे. एक वर्षभर त्यांनी या दुकानात शिकण्याच्या उद्देशाने काम केले. टेंभुर्णी येथे 2003 मध्ये छोटेसे दुकान मार्गदर्शक जेष्ठ नेते बाळासाहेब तात्या ढवळे पाटील आणि प्रांतधिकारी अशोक जी काकडे साहेब व त्याचे आत्ते भाऊ पांडुरंग पाटील यांच्या सहकार्याने सुरू केले. ग्राहक हाताळणी, संभाषण कौशल्य तसेच सर्व तांत्रिक बाबींचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे तसा त्यांना फारसा त्रास झाला नाही. सुरुवातीला भांडवल जेमतेम होते. स्वभाव मनमिळाऊ असल्याने एक एक ग्राहक ते जोडू लागले. ग्राहकांचे समाधान यालाच त्यांनी प्राधान्य दिले. म्हणून अल्पावधीत त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला.यामध्ये त्यांचे लहान बंधू महेश पाटील आणि सर्व कुटुंबाची भक्कम साथ त्यांना होती.
या क्षेत्रात ग्राहकांची बरीच फसवणूक होते मात्र विजय पाटील यांनी, प्रामाणिकपणा, सेवा, पारदर्शकता याला प्राधान्य दिले. त्यामुळे सर्वच क्षेत्रातील ग्राहकांनी ओंकार गोल्डला प्रथम पसंती दिली. दिवसेंदिवस व्यवसाय वाढत होता. मात्र पूर्वीची जागा कमी पडत होती. त्यामुळे त्यांनी नवीन जागा घेऊन व्यवसाय विस्तार करण्याचे ठरवले.

15 मार्च 2015 रोजी कुर्डूवाडी रोडवर ओंकार गोल्ड अँड सिल्वर पॅलेस हे भव्य दिव्य दालन विजय पाटील व महेश पाटील बंधूनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार राम शिंदे, , आमदार बबनदादा शिंदे, उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार सुधाकर पंत परिचारक, आमदार नारायण आबा पाटील, आमदार संजय मामा शिंदे , सिने अभिनेत्री तेजश्री प्रधान या मान्यवरच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाले . परिसरातील नागरिकही मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

2018 मध्ये ओंकार गोल्डची दुसरी शाखा उमरगा जिल्हा लातूर येथे माजी संसदीय कार्यच मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, खासदार रवींद्र गायकवाड, जितेंद्र दादा शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच अभिनेत्री सुरभी हांडे (म्हाळसा फेम) यांच्या विशेष उपस्थित करण्यात आले.या शाखेला देखील ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. उमरगा परिसरात ओंकार गोल्ड ला विश्वास व शुद्धतेसाठी प्रथम पसंती ग्राहक देत असतात. विविध सण उत्सवानिमित्त येथे ग्राहकांना बक्षीस योजना, विविध सवलती देण्यात येतात. नवनवीन कलात्मक डिझाईन मध्ये सर्व दागिने उपलब्ध असतात. त्यामुळे सुवर्ण खरेदीसाठी सर्वच ठिकाणी ओमकार गोल्डला भरभरून प्रतिसाद मिळतो असे विजय पाटील सांगतात.

विजय पाटील यांचा हा यशाचा आलेख एवढ्यातच थांबत नाही. ओंकार गोल्ड ची तिसरी शाखा 2019मध्ये लोणी देवकर तालुका इंदापूर येथेआमदार दत्तात्रय मामा भरणे,संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, नेते आप्पासाहेब जगदाळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना विजय पाटील म्हणतात आमच्याकडे मोडीला कॅरेट प्रमाने दर दिला जातो.. आमच्याकडे सर्व दागिने एच यु आय डी हॉलमार्क मान्यता प्राप्त आहेत. आणि कोणतेही 22 कॅरेटचे दागिने शंभर टक्के एक्स्चेंज करतो म्हणजे वजनाला वजनच घेतो. आमच्याकडे फक्त नवीन दागिन्यांना जीएसटी व मजुरी देवी लागते. येथे मजुरी पिवळ्या रेगुलर दागिन्याला 12% व रेगुलर दागिन्याला 14 टक्के घेतली जाते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे येथे 22 व 24 कॅरेट चा सोन्याचा भाव इतर पेढ्यांपेक्षा कमी असतो. त्यामुळे तीनही शाखांमध्ये नेहमीच ग्राहकांची वर्दळ असते.

विजय यांचे बंधू महेश पाटील हे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक आहेत. वरदसिद्धी कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या माध्यमातून ते कार्यरत आहेत. जलसंधारण क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कामकाजाबाबत त्यांना लोकशाही न्यूज चा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला आहे.विजय व महेश या दोन बंधूंनी आपापल्या क्षेत्रात आकाशाला गवसणी घालण्याचे काम केले आहे.




