Uncategorized

पत्राच्या प्रवासात दंग झाले कराडचे ज्येष्ठ नागरिक

शिव तंत्र न्यूज

पत्राच्या प्रवासात दंग झाले कराडचे ज्येष्ठ नागरिक

शिवतंत्र न्यूज 

कराड प्रतिनिधी

     भारतीय डाक विभाग व ज्येष्ठ नागरिक संघ कराड यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल कृष्णा पॅलेस येथे पत्राचा प्रवास व डाक विभागाच्या विविध योजना या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

कराड डाक विभागाच्या अधीक्षिका स्वाती दळवी व उपविभागीय डाक निरीक्षक अमित देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते

ज्येष्ठ नागरिक संघ कराड यांच्या मासिक सभेमध्ये या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक संघ कराड चे विद्यमान अध्यक्ष प्रकाश खोचीकर हे होते. डॉ.सुधीर कुंभार यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. सयाजीराव पाटील यांनी सूत्रसंचालन केले. तर आभार अध्यक्ष प्रकाश खोचीकर यांनी मानले.

यावेळेस स्वाती दळवी यांनी डाक विभागाच्या विविध योजना पत्राचा प्रवास, पिनकोड, आधार, जीवन प्रमाणपत्र, ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक प्राप्ती योजना, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पत्राचे प्रकार, माय स्टॅम्प, तिकीट संग्रह आदी विषयांची माहिती ज्येष्ठ नागरिकांना दिली.

मामाच हलवलेल पत्र लाडक्या बहिणीला सापडलय, पत्र हे कागदाचा तुकडा नसून काळजाचा तुकडा आहे म्हणून पत्राचा प्रवास सुखकर,आनंदी प्रवास आहे, डाक सेवा ही जनसेवा असून, काही दिवसातच भारत हा डाक प्रधान देश बनेल असे मत यावेळी अमित देशमुख यांनी व्यक्त केले.

पत्रलेखन, पोस्टमन, टपालपेटी, पोस्टकार्ड व पोस्टमनची चातका प्रमाणे वाट पाहणे इत्यादी आठवणीत सर्व रमले. पत्राचा प्रवास ऐकताना, अनेक ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्याचे सांगितले

यावेळी डाक विभागातील हनुमंत वेदपाठक श्रीनिवास सोनवणे प्रवीण माने, यासह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close