कुर्डूवाडी

हॉटेल गंधराज ला खवय्यांची पसंती  गुणवत्तापूर्ण चवीच्या जोरावर केले सातव्या वर्षात पदार्पण

शिवतंत्र न्यूज

हॉटेल गंधराजला खवय्यांची पसंती

गुणवत्तापूर्ण चवीच्या जोरावर केले सातव्या वर्षात पदार्पण

 

 हॉटेल सोबतच डेअरी व्यवसायातही लोभे परिवाराची नेत्रदीपक कामगिरी

 शिवतंत्र न्यूज 

 

   कुर्डूवाडी हे मराठवाड्याचे प्रवेशद्वार मानले जाते. टेंभुर्णी ते कुर्डूवाडी या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. कुर्डू येथील लोभे परिवार गेल्या पंधरा वर्षापासून हॉटेल व्यवसायात कार्यरत आहे. कुर्डू येथील हॉटेल गंधराज हे गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांच्या प्रतिसादाच्या जोरावर सेवेत आहे. हॉटेलचे संचालक सुभाष लोभे यांनी हॉटेल सोबतच दुग्ध व्यवसायात देखील नावलौकिक मिळवला आहे.

    लोभे परिवाराचे जवळचे नातेवाईक असलेले रामलिंग गाडे यांचे कुर्डू येथील येथे हॉटेल गंधर्व हे 2011 पासून सुरू आहे. गाडे यांनी सुभाष लोभे यांना भागीदारीत हॉटेल चालवण्याची संधी दिली. या माध्यमातून लोभे यांनी व्यवसायात पदार्पण केले. हॉटेल व्यवसायाची बाराखडी ते गाडे यांच्या सोबत शिकले. बरीच वर्ष हा व्यवसाय केल्यानंतर त्यांनी स्वतंत्र हॉटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये त्यांनी हॉटेल गंधाराज या नावाने प्रशस्त बांधकाम करत हॉटेल व्यवसायाचा शुभारंभ केला. अनुभव पाठीशी असला तरी दोन वर्षे हा व्यवसाय स्थिर होण्यासाठी त्यांना गेले . येथे त्यांनी शुद्ध शाकाहारी व मांसाहारी रुचकर जेवण उपलब्ध केले. शाकाहारी डिशमध्ये पनीर मसाला , काजू करी तर मांसाहारी जेवणामध्ये येरमाळा स्पेशल मच्छी, चिकन, मटण ग्राहकांना उपलब्ध करून दिले. हॉटेलचे सर्वस्व म्हणजे कूक . त्याच्यावरच यश अपयश अवलंबून असते. कूक व हॉटेल मालक यांचे सूर जुळले तरच हॉटेल व्यवस्थितरित्या चालते. त्यामुळे सुभाष यांनी कूक सोबत चांगले संबंध प्रस्थापित केले. हॉटेल सुरू केल्यापासून एकच कूक आजतागायत कार्यरत आहे. पाच कामगार, एक वस्ताद आदी कर्मचारी वृंदाच्या मदतीने हॉटेल गंधराजचा गाडा सुस्थितीत चालू आहे. सुभाष यांचे बंधू सुमित लोभे हे सुभाष यांना मदत करतात. लातूर , पुणे, बार्शी तसेच या रस्त्यावरून जाणारे वाहनचालक गेल्या दहा वर्षापासून या हॉटेलला आवर्जून भेट देता. येथील स्वच्छता, गुणवत्ता यामुळे काही ग्राहक 300 ते 400 किलोमीटर अंतरावरून देखील आवर्जून येतात असे सुभाष यांनी सांगितले. 

   सुभाष आलेल्या प्रत्येक ग्राहकाची आपुलकीने चौकशी करत सेवा देतात, आदरातिथ्य ते करतात. भविष्यकाळात अधिकाधिक गुणवत्तापूर्ण सेवा देत वाटचाल करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. हॉटेल व्यवसायाबरोबरच त्यांनी 2017 मध्ये दूध संकलन क्षेत्रात देखील त्यांनी पाऊल टाकले आहे. सरस्वती दूध संकलन या नावाने त्यांची संस्था कार्यरत आहे. सुरुवातीला फक्त पन्नास लिटर दूध संकलन होत होते. ते दूध उत्पादकांच्या शेड वर जाऊन दूध संकलन करतात. दररोज पाच वाहनांच्या साह्याने 5500 लिटर दूध संकलन केले जात. सुमारे 220 शेतकरी या सरस्वती समूहाशी जोडले गेले आहेत. गवळेवाडी , पिंपरी, महादेववाडी , कव्हे, जाकले शिंगेवाडी, ढवळस परिसरातून हे दूध संकलित केले जाते. शेतकऱ्यांना गुणवत्तेनुसार जास्तीत जास्त दर मिळावा यासाठी सुभाष लोभे प्रयत्न करतात. दूध उत्पादकांना पशुखाद्य, शेंगदाणा पेंड, भुसा आदींचा दर्जेदार पुरवठा करता. दुध संकलना बाबत त्यांना चिरंजीव अविराज , पुतणे विवेक हे मदत करतात. संपूर्ण परिवार एकत्रितपणे मिळेल ती जबाबदारी पार पाडतो त्यामुळे कुर्डू परिसरात एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. भविष्यकाळात अधिकाधिक दूध उत्पादक पर्यंत पोहोचून विक्रमी दुध संकलन करण्याची त्यांचे उद्दिष्ट आहे. आपल्या या यशाचे श्रेय ते रामलिंग गाडे यांना देतात. कारण विचारले असता ते म्हणाले की, वयाच्या पंचवीसव्या वर्षी त्यांनी आम्हाला उद्योग व्यवसाय शिकवला. आमच्या बोटाला धरून व्यवसायात आणले. शेकडो बेरोजगार तरुणांना त्यांनी उद्योग व्यवसाय मार्गदर्शन केल्याचे सुभाष लोभे सांगतात. गवळीवाडी पाटी येथे त्यांनी त्यांचे पुतणे वैभव लोभे यांना देखील हॉटेल व्यवसाय सुरू करून दिला आहे. येथे देखील हॉटेल गंधराज या नावाने हा व्यवसाय सुरू आहे. वैभव येथील हॉटेलचे कामकाज व्यवस्थितपणे पार पडतात. 

    तरुण बांधवांना मार्गदर्शन करताना ते म्हणतात आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करा. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. जिद्द, सातत्य आणि महत्वकांक्षा असेल तर एखादा छोटा व्यवसाय देखील आपल्याला वेगळ्या उंचीवर येऊ शकतो. लोभे परिवारचा हा उद्योग प्रवास नक्कीच उदयोन्मुख उद्योजकांना प्रेरणा देईल.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close