कुर्डूवाडी

प्रस्थापितांची स्पर्धा असतानाही इलेक्ट्रिकल क्षेत्रात संकेत डांगे यांनी अल्पावधीत मारली बाजी  दहा वर्षांच्या पूर्वानुभवतून चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण

शिवतंत्र न्यूज

प्रस्थापितांची स्पर्धा असतानाही इलेक्ट्रिकल क्षेत्रात संकेत डांगे यांनी अल्पावधीत मारली बाजी 

दहा वर्षांच्या पूर्वानुभवतून चौथ्या वर्षात यशस्वी पदार्पण

 शिवतंत्र न्यूज

 

     कोणताही व्यवसाय उभा करताना ज्वलंत इच्छाशक्ती अनुभव व कौशल्य असेल तर कोणत्याही व्यवसायात क्रांती साधता येऊ शकते हे दाखवले आहे कुर्डूवाडी येथील युवा व्यावसायिक संकेत डांगे यांनी. त्यांच्या माऊली लाइट्स या व्यवसायाने चौथ्या वर्षात पदार्पण केले आहे. विशेष म्हणजे कुर्डूवाडी शहरात खूप मोठी स्पर्धा असताना तसेच खूप मोठे भांडवलदार या व्यवसायात असताना संकेत यांनी या क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले आहे.

    संकेत भैरू डांगे हे कुर्डूवाडी येथील युवा व्यवसाय. बीकॉम पर्यंत त्यांनी शिक्षण घेतले. शिक्षण घेत असताना त्यांनी शहरातील एका दुकानात तब्बल चार वर्षे काम केले. त्यानंतर त्यांनी क्रॉम्प्टन, पॉलिकॅब आदी कंपन्यांमध्ये मार्केटिंगचे काम केले. सोलापूर तसेच धाराशिव जिल्ह्यात त्यांनी तब्बल सहा वर्षे काम केले. याच क्षेत्रात कार्य करण्याची त्यांनी मनात खुणगाठ बांधली होती. बार्शी कुर्डूवाडी बायपास रोड लगत त्यांची जागा आहे. स्वतःच्या जागेत व्यवसाय सुरू करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 10 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांनी माऊली लाइट्स या नावाने व्यवसायाचा शुभारंभ केला. सुरुवातीला भांडवल अतिशय तुटपुंजे होते. या व्यवसायात मोठे भांडवल लागते. फक्त पाच लाखात त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. विविध नामांकित कंपन्यात त्यांनी काम केले होते. हा अनुभव व ओळख कामाला आली. पॉलीकॅब कंपनीच्या वायरची डीलरशिप त्यांना मिळाली. तसेच क्रांती कंपनीचे देखील ते अधिकृत वितरक आहेत. त्याच्या सोबतच लिशा, वंडर, जीनिक्स, आदी कंपनीचे साहित्य त्यांच्याकडे मिळत. लिगार्ड कंपनीचे स्वीचेस देखील त्यांच्याकडे मिळतात. बजाज, फिलिप्स , क्रॉम्प्टन तसेच इतर नामांकित कंपन्यांचे पंखे येथे मिळतात. जग्वार कंपनीच्या लाईटचे अधिकृत वितरक देखील संकेत आहेत. या कंपनीच्या साहित्याची ते होलसेल व किरकोळ दरात विक्री करतात. येथे सर्व दर्जेदार कंपन्यांचे साहित्य मिळत असल्याने कुर्डूवाडी शहर व तालुक्यातील किरकोळ विक्रेते त्यांच्याकडे आवर्जून खरेदीसाठी येतात. कुर्डूवाडी परिसरातील सुमारे 30 गावातील छोटे मोठे व्यावसायिक विश्वासाने येथे येतात. गुणवत्तापूर्ण नामांकित ब्रँडची डीलरशिप त्यांच्याकडे असल्याने दर्जेदार साहित्य उपलब्ध होते. त्यामुळेच ग्राहकांची गर्दी येथे पहावयास मिळते.

    आपल्याला मिळालेल्या उदंड प्रतिसादाचे गमक काय असे विचारले असता ते म्हणाले की मी प्रत्येक ग्राहकांच्या साईटवर जातो तेथे काही कमतरता असेल किंवा काम गुणवत्ता पूर्ण व आकर्षक होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करतो. ग्राहक नाराज होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतो. ग्राहकांचे समाधान होईपर्यंत त्यांना सेवा घेतो. त्यामुळे शहरातील इतर नामांकित व जुने व्यवसाय असतानाही ग्राहकांनी माऊली लाइट्सवर विश्वास ठेवून भरभरून प्रतिसाद दिला. मार्केटमध्ये एखादी नवीन वस्तू आली की मी येथे उपलब्ध करतो. डेकोरेटिव्ह फॅन, आकर्षक रंग संगती मधील लाईट्स तसेच इतर वस्तू बाजार नवे आले की अगोदर आपल्याकडे येतात. त्यामुळे ग्राहकांना नित्य नवीन मिळत असते. स्व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून दहा लाख रुपयांची मला कर्ज मिळाले. यातून बराच फायदा झाल्याचे ते सांगतात. सुरुवातीच्या वर्षी वार्षिक उलाढाल 25 लाखापर्यंत होती आता 55 लाखापर्यंत पोहोचली असल्याचे ते सांगतात. ग्राहकांच्या विश्वासावर ही वाटचाल अशीच वृद्धिंगत होईल असेही ते म्हणतात.

 

    उदयोन्मुख व्यवसायिकांना ते म्हणतात की तुम्ही कोणताही व्यवसाय करा त्याचे परिपूर्ण ज्ञान आपल्याला असले पाहिजे. व्यवसाय सुरू करताना कमीत कमी एक वर्ष तरी हा व्यवसाय सुरू असणाऱ्या कडे आपण काम केले पाहिजे. ग्राहकांशी बोलताना सौजन्य पूर्वक बोलले पाहिजे तरच आपण यशस्वी होऊ शकतो. आपल्या क्षेत्रात येणाऱ्या नवीन ट्रेंडकडे डोळसपणे पाहून ग्राहकांना सेवा दिली तर नक्कीच फायदा होतो. 

     प्रतिकूल परिस्थितीवर मात करत इलेक्ट्रिकल क्षेत्रात यशस्वी झालेल्या संकेत यांचा हा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close