कुर्डूवाडी

रामहरी हांडे यांनी साधली लोकसेवेतून लोकसमृद्धी  लोकसेवा उद्योग समूहाची नेत्रदीपक कामगिरी

शिवतंत्र न्यूज

रामहरी हांडे यांनी साधली लोकसेवेतून लोकसमृद्धी

 लोकसेवा उद्योग समूहाची नेत्रदीपक कामगिरी

शिवतंत्र न्यूज 

 

 

   एकेकाळी महाराष्ट्रात सहकार चळवळ जोमात होती. विविध सहकारी बँका, पतसंस्था, दूध संस्था, साखर कारखाने यांची उभारणी सहकारी तत्त्वावर झाली. लोकांच्या मालकीच्या संस्था बहुसंख्येने उभा राहिल्या मात्र काही स्वार्थी सत्तापीपासू नेत्यांमुळे या संस्था बुडाल्या. तर काही अखेरचा श्वास घेत आहेत. मात्र या सहकाराच्या मुशीत तयार झालेले ऋषितुल्य व्यक्तिमत्व देखील आहेत जे या संस्था प्रामाणिकपणे अजूनही चालवत आहेत. कुर्डू येथील लोकसेवा परिवाराचे संस्थापक रामहरी हंडे सर त्यापैकीच एक. लोकसेवा पतसंस्था, दूध संस्थांचा कारभार ते गेल्या 30 वर्षांपासून अव्याहतपणे सांभाळत आहेत. 

रामहरी अजिनाथ हंडे हे कुर्डू येथील रहिवासी. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कुर्डू येथील एका दुध संस्थेत सचिव म्हणून काम पाहण्यास सुरुवात केली. दोन वर्षे त्यांनी सहकारी दूध संस्थेत काम पाहिले त्यानंतर त्यांनी स्वतः लोकसेवा सहकारी दूध संस्थेची 1996 मध्ये स्थापना केली. स्वतःचे व सभासदांचे मिळून सुरुवातीला फक्त शंभर लिटर दूध संकलन होत होते. त्यानंतर त्यांनी सभासदांना उचल देऊन तसेच आपल्या संपर्कात असलेल्या विविध बँका पतसंस्था यामध्ये कर्ज प्रकरणे मंजूर करून दूध उत्पादकांना नवीन गाई खरेदीसाठी भांडवल उपलब्ध करून दिले दूध वाढीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले. हळूहळू दूध संकलनात वाढ होऊ लागली. बरीच वर्षे सहकारी तत्त्वावर दूध संकलन त्यांनी केले. जिल्हा दूध संघ मोडकळीस आल्यानंतर त्यांनी लोकसेवा नावानेच संकलन सुरू ठेवले. इतर ठिकाणी जेथे जास्तीत जास्त दर मिळेल अशा जागी दूध पुरवठा करण्यास त्यांनी सुरुवात केली. कालांतराने त्यांना भांडवलाची कमतरता भासू लागली. दूध उत्पादकांनादेखील उचलीवर गरजा भागवणे अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे रामहरी हांडे यांनी एखादी पतसंस्था सुरू करता येते का? या दृष्टीने विचार विनिमय सुरू केला. 2003 मध्ये त्यांनी लोकसेवा ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. 10 लाख रुपये भाग भांडवला पासून पतसंस्थेची सुरुवात झाली. रामहरी हांडे यांनी अतिशय काटेकोरपणे पतसंस्थेचे कामकाज सुरू केले. कर्ज वाटप करताना जो परतफेड करू शकतो अशाच व्यक्तींना कर्ज वाटप केले. जवळचा , लांबचा असा भेदभाव केला नाही. कारण संस्था चालवायची होती. लोकांच्या ठेवी सुरक्षित ठेवणे गरजेचे होते. पारदर्शक कामकाजामुळेच आज रोजी 75 कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे आहेत. कर्ज वाटपापेक्षा ठेवींची रक्कम खूप जास्त आहे. कुर्डू सारख्या ग्रामीण भागात एवढी मोठी पतसंस्था उभी राहणे ही खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे. रामहरी हांडे स्वतः पतसंस्थेचे कामकाज जातीने पाहतात. त्यांना विशाल व सागर अशी दोन मुले आहेत. त्यापैकी विशाल हे पतसंस्थेत लेखनिक म्हणून काम करतात. सागर हे शेती तसेच वडिलांना इतर कामात मदत करतात. लोकसेवा पतसंस्थेच्या माध्यमातून कुर्डू परिसरातून सावकार शाहीचा बंदोबस्त झाल्याची भावना हंडे यांनी व्यक्त केली. या अगोदर सावकारांच्या विळख्यात इथला कष्टकरी, शेतकरी भरडला जात होता. सावकार शाहीच्या जोखडातून बाहेर काढण्याचे काम रामहरी हांडे यांनी केले. त्यामुळेच नंतर सर्व कष्टकरी, शेतकरी समाजाच्या ठेवी पतसंस्थेकडे बहुसंख्येने आल्या. 

     युवा वर्गाला मोलाचा संदेश देताना रामहरी हांडे म्हणतात की, यशस्वी लोकांच्या यशोगाथा तरुणांनी वाचल्या तरच त्यांना नवीन दृष्टी मिळेल. काम करत असताना आपल्या माता पित्यांना समोर ठेवून वाटचाल करा. त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. नोकरीपेक्षा छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवा. ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसायाच्या खूप संधी आहेत. शहरांमध्ये दहा-पंधरा हजारासाठी आपले तरुणपण खर्ची न घालता स्वतः उद्योजक बणा. स्वावलंबी बना. 

    सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या रामहरी हंडे यांची प्रेरणा खूप सार्‍या नवोदित उद्योजक व्यावसायिकांना पथदर्शी ठरेल.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close