कुर्डूवाडी

पान शॉप व्यवसायातून कैलास जाधव यांनी साधली प्रगती.. 

शिवतंत्र न्यूज

पान शॉप व्यवसायातून कैलास जाधव यांनी साधली प्रगती.. 

 

शिवतंत्र न्यूज 

    कोणत्याही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेब सांगतात त्याप्रमाणे नेल पॉलिश ते केस मालिश पर्यंत कोणताही व्यवसाय मराठा बहुजन समाजातील तरुणांनी केला पाहिजे. कुर्डू तालुका माढा येथील कैलास जाधव या तरुणाने पान व्यवसाय सुरू करत केल्या पाच वर्षांपासून अविरतपणे संघर्ष करत यशस्वीपणे हा व्यवसाय सांभाळत एक आदर्श निर्माण केला आहे. 

     कैलास लक्ष्मण जाधव कुर्डू तालुका माढा येथील एक तरुण होतकरू लघू व्यावसायिक. शिक्षण झाल्यानंतर पंधरा वर्षे त्यांनी गावातच ड्रायव्हर म्हणून काम केले. या कालावधीत विविध क्षेत्रातील व्यवसायिकांशी त्यांचा निकटचा संपर्क आला. त्यांना पण वाटायचे आपण स्वतः छोटा मोठा व्यवसाय करावा. परंतु भांडवल जवळ नव्हते म्हणून मनात आलेला विचार तसाच दाबून पुन्हा कामावर जावे लागायचे. शेवटी दृढ निर्धार करून त्यांनी नोकरीला रामराम केला. कमी भांडवलात कोणता व्यवसाय सुरू करता येईल याचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोधाशोध केल्यानंतर पान व्यवसायावर येऊन ते ठेपले. हा व्यवसाय निवडन्यामागचे कारण ते म्हणतात एक तर भांडवल कमी लागते आणि दररोज लागणारी वस्तू म्हणजे पान , सुपारी. त्यामुळे त्यांनी हाच व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

   या व्यवसायासाठी लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे टपरी उभा करणे.यासाठी समरी 50 हजार रुपये खर्च आला. त्यांच्याकडे भांडवल एक रुपयाही नव्हते. त्यांच्या मित्र मंडळींनी त्यांना सहकार्य करत टपरी उभारून दिली. माल भरण्यासाठी अडीच हजार रुपये खर्च आला. एवढ्या 52 हजार पाचशे रुपये खर्चात स्टार्टअप सुरू झाला. कैलास जाधव यांनी या ठिकाणी साधे पान , मसाला पान, चॉकलेट पान विक्रीसाठी ठेवले. पान तयार करण्याची त्यांची पद्धत अतिशय स्वच्छ व शुद्ध असल्यामुळे अल्पावधीतच त्यांचा व्यवसाय लोकप्रिय झाला. गावातील सर्वच सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिक कैलास यांचे पान खाण्यासाठी आज स्वतः आवर्जून येतात. जाधव पान शॉप ने कुर्डू करांना आपल्या वैशिष्ट्ये पूर्ण चवीमुळे आपलेसे केले. कुर्डूवाडी ते टेंभुर्णी या रस्त्यावर दररोज हजारो वाहने ये जा करत असतात. बाहेरील 

वाहने सुद्धा आवर्जून या पान स्टॉलला आवर्जून भेट देतात रात्री अकरा वाजेपर्यंत शॉप उघडे असते. त्यांचे पुतणे नाना रमेश जाधव हे कैलास यांना मदत करतात. जाधव यांच संपूर्ण परिवार या व्यवसायावर उदरनिर्वाह करतो. अतिशय खडतर परिस्थिती वर मात करून कैलास जाधव यांनी हा व्यवसाय उभा केला टिकवला.

    कैलास या गावातील तसेच परिसरातील विविध सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होतात. मराठा क्रांती मोर्चामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विविध ठिकाणी झालेल्या समाजाच्या कार्यक्रमात त्यांनी मदत देखील केली. व्यवसायात काय भविष्य आहे याबाबत ते म्हणतात कमीत कमी भांडवलात आपल्या गावात, शहरात आपण हा व्यवसाय सुरू होऊ शकतो. नोकरी पेक्षा कितीतरी पटीने व्यवसाय केव्हाही श्रेष्ठच असतो. भविष्यकाळात आपण करत असलेल्या व्यवसायाचे नूतनीकरण करून ग्राहकांना विविध प्रकारचे पान उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. पानासारख्या छोट्या व्यवसायात जिद्दीने पुढे येत पाच वर्षांच्या सातत्यातून यशस्वी ठरलेल्या कैलास जाधव यांची प्रेरणा घेऊन कमीत कमी भांडवलात या सुरू होऊ शकणाऱ्या ये व्यवसायात तरुण पदार्पण करतील अशी अपेक्षा

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close