कर्जत
कवडे परिवाराची कपड व्यवसायात नाबाद 25 वर्ष वाटचाल राशीन येथे राधेश्याम कलेक्शनच्या माध्यमातून भव्य दिव्य नवीन दालनाची सुरुवात
शिव तंत्र न्यूज
कवडे परिवाराची कापड व्यवसायात नाबाद 25 वर्ष वाटचाल
राशीन येथे राधेश्याम कलेक्शनच्या माध्यमातून भव्य दिव्य नवीन दालनाची सुरुवात
शिवतंत्र न्यूज

कर्जत तालुक्यातील कोळवडी येथील रहिवासी असलेले बाळासाहेब कवडे हे गेल्या 25 वर्षापासून कापड व्यवसायात कार्यरत आहेत नुकतेच त्यांनी राशीने येथे राधेश्याम कलेक्शन हे दालन भव्यदिव्य स्वरूपात सुरू दिनांक 25 जानेवारी रोजी सुरू होत आहे. मराठा समाजातील कापड व्यवसायात क्वचितच अशी भव्यता आपणास पहावयास मिळते. सुमारे चार हजार चौरस फूट जागेत हे भव्य दिव्य दालन उभारले असून त्यांच्या या दालनात खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे.
बाळासाहेब आप्पासाहेब कवडे यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. शिक्षणही पूर्ण करता आली नाही. घरच्या परिस्थितीमुळे किशोरवयातच त्यांनी कर्जत येथील एका मारवाडी कापड व्यवसायीकाकडे सहाय्यक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. बालपणापासूनच त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळावू ,प्रामाणिक होता. हातात पडेल ते काम इमानदारीने करण्यात ते पारंगत होते. अल्पावधीत दुकानाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. प्रसिद्ध व्यावसायिक पोपट बोरा यांच्या राज कलेक्शन या दुकानात त्यांनी जवळजवळ बारा वर्षे इमाने इतबारे काम केले. पोपटशेठ यांना त्यांचा स्वभाव खूप आवडला. त्यांनी बाळासाहेबांना व्यवसायात येण्याचा सल्ला दिला. मात्र बाळासाहेबांकडे भांडवल नव्हते. त्यांनी स्वतः तब्बल तीन लाख रुपये भांडवल कापडाच्या मालाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले .या आभाळा एवढ्या मदतीच्या जोरावर बाळासाहेब कवडे यांनी राधेश्याम कलेक्शन या व्यवसायाचा शुभारंभ केला. बारा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असल्यामुळे अतिशय चिकाटीने व सचोटीने व्यवसाय करत एक वर्षात पोपट शेठ यांनी दिलेले भांडवल त्यांनी प्रामाणिकपणे परत केले. मारवाडी व्यवसायीकाकडे व्यवसायाचे बाळकडू त्यांना मिळाल्यामुळे अल्पावधीत त्यांनी व्यवसायात प्रगती साधली. या ठिकाणी त्यांनी साडी ,लेडीज वेअर ,जेन्ट्स वेअर, किड्स वेअर, सुटींग, शर्टिंग ड्रेस मटेरियल आदी साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. ग्राहकांबरोबर जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे यालाच बाळासाहेबांनी प्राधान्य दिले. तसेच अध्यात्मिक क्षेत्रात काम करत होते यामुळे समाजात त्यांची चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. परिणामी सर्व क्षेत्रातील ग्राहक त्यांच्याकडे आवर्जून येत होते. आलेल्या ग्राहकाचे समाधान कसे होईल, त्याला दर्जेदार वस्तू कशा मिळतील याकडे बाळासाहेब कवडे यांनी विशेष लक्ष दिले. त्याच्यामुळे अल्पावधीतच त्यांनी कर्जत येथे दुसरी शाखा सुरु केली.. बाळासाहेबांकडे त्यांच्या दुकानावर जे नातेवाईक काम करत होते त्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करून मनाचा मोठेपणा दाखवला. आपल्या सहकाऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. ही गोष्ट अतिशय प्रशंसनीय आहे. जे आपल्या आपल्याला अभावानेच पाहावयास मिळते. फक्त पाच वर्षे पूर्ण झाली त्यानंतर बाळासाहेबांनी राशीन येथील नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला. इथे सुद्धा त्यांनी अतिशय यशस्वीपणे व्यवसाय चालवला. बरेच वर्षे त्यांनी राशीन येथे यशस्वीपणे हा व्यवसाय सुरू ठेवला. राशीन येथील व्यवसायास काही कारणांमुळे अडचणी आल्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला परंतु त्यामध्ये त्यांना यश आली नाही. मात्र हार मानतील ते बाळासाहेब कवडे कसले. त्यांनी सिद्धटेक रोड राशीन येथे नवीन जागाही शोधली. पुन्हा एकदा नावीन्यपूर्ण तीन मजली भव्य दिव्य स्वरूपात राधेश्याम कलेक्शन ग्राहकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे.

या नूतन दालना विषयी बोलताना बाळासाहेब कवडे म्हणतात की येथे नवीन फॅशन, नवीन डिझाईनच्या असंख्य व्हरायटी आपणास पहावयास मिळतील. चार हजार चौरस फूट एवढी विस्तीर्ण जागा असल्यामुळे ग्राहकांची गैरसोय होणार नाही यासाठी आम्ही विशेष काळजी घेतली आहे. लग्न बस्त्यासाठी विशेष विभाग सुसज्ज ठेवला आहे. होलसेल दरात किरकोळ खरेदी ग्राहकांना करता येणार आहे. कपड्यांचे दर सुद्धा इतर व्यवसायांच्या तुलनेत कमी असणार आहेत. ग्राहकांनी एक वेळेस भेट द्यावी असे आव्हान त्यांनी केले आहे. आपल्या यशा बद्दल विचारले असता ते म्हणतात की, प्रामाणिकपणा योग्य दर विनम्र सेवा दिल्यामुळेच वर्षानुवर्षी ग्राहक आमच्याकडे टिकून आहेत. अडीअडचणीच्या वेळी आम्ही गोरगरिब ग्राहकांना मदत केली. त्यामुळे या ग्राहकांनी आणखी ग्राहक मिळवून दिले. राधेश्याम भगवान हे आमचे श्रद्धास्थान आहे . त्यांच्या सेवेतून आम्हाला मनशांती भेटली. आम्हाला काम करण्याची ऊर्जा मिळते. श्रीराम व कृष्णा ही दोन मुले त्यांना व्यवसायात मदत करतात . संपूर्ण परिवार शाकाहारी, अध्यात्मिक मार्गावर चालत आहे. तोंडात साखर व डोक्यावर बर्फ ठेवून आम्ही काम केली. त्यामुळे जेथे जातो तिथे आम्ही यशस्वी होतो. अतिशय प्रेरणादायी असा प्रवास कवडे परिवाराचा आहे. त्यांचा आदर्श घेऊन काम करण्याची गरज आहे. पुढील प्रवासासाठी राधेश्याम कलेक्शन ला खूप खूप शुभेच्छा.


