कुर्डूवाडी
उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता सुरू केले इंजिनिअरिंग वर्कशॉप स्टेलको इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार केलेल्या दूध टँकरला मोठी मागणी
शिवतंत्र न्यूज

उच्चशिक्षित तरुणाने नोकरीच्या मागे न लागता सुरू केले इंजिनिअरिंग वर्कशॉप
स्टेलको इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार केलेल्या दूध टँकरला मोठी मागणी
शिवतंत्र न्यूज

सध्या तरुणांमध्ये उच्च शिक्षण घेतल्यानंतर शहरामध्ये नोकरी शोधणे असा ट्रेंड सुरू आहे. मात्र कुर्डू येथील जयवंत गाडे या तरुणाने नोकरीच्या मागे लागतात वडिलांच्या मार्गदर्शनाखाली इंजीनियरिंग वर्कशॉप सुरू करून दूध टँकर बांधणी उद्योगात प्रवेश केला आहे. स्टेलको इंजिनिअरिंगच्या माध्यमातून ते दूध उद्योगाशी संबंधित सर्व उपकरणे तयार करत आहेत.

जयवंत गाडे यांचे वडील रामलिंग गाडे हे कुर्डूवाडी परिसरात दूध डेअरी क्षेत्रात प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून ओळखले जातात. जयवंत गाडे यांनी आपले शिक्षण बीबीएपर्यंत पूर्ण केले. भविष्यात काय करायचे याचा विचार करत असताना रामलिंग यांनी जयवंत यांना दुग्ध उत्पादन क्षेत्रातील संधी विषयी मार्गदर्शन केले. गावोगावी शीतकरण केंद्र सुरू होत आहेत. यासाठी बल्क कुलर तसेच अन्य साहित्य लागत असते. जयवंत यांना जगा वेगळा उद्योग उभारण्याची प्रेरणा दिली. डेअरी उद्योगाशी निगडित उद्योग सुरू करण्याचा निर्णय जयवंत यांनी घेतला. याच वर्षी फेब्रुवारी 2026 मध्ये त्यांनी स्टेलको इंजिनिअरिंगचा शुभारंभ केला. राजकोट गुजरात येथून त्यांनी विविध प्रकारच्या मशिनरी आणल्या. या मशिनरी चालवण्यासाठी दहा वर्षांपेक्षा जास्त अनुभवी कर्मचारीवृंद शोधला. स्टेलको इंजिनिअरिंगच्या माध्यमातून 2000 लिटर पासून 35000 लिटर क्षमतेचा दूध टँकर, 250 लिटर ते दहा हजार लिटर पर्यंत बल्क कुलर, पाच हजार ते एक लाख लिटर क्षमतेचे स्टोरीज टॅंक तयार करून कार्यान्वित करून दिले जातात. तसेच डेअरी प्लांट साठी लागणारी सर्व प्रकारची पाईपलाईनची कामे देखील या फर्मच्या माध्यमातून केली जातात. तसेच बल्क कुलर साठी लागणारी डंप टॅक, काटा बाउल, कोन्वे रोलर, कॅन नितळी (कॅन ड्रीपर), कॅन वॉशर आदी साहित्याची निर्मिती देखील येथे केली जाते.

ग्राहकांच्या प्रतिसादाविषयी बोलताना जयवंत म्हणाले की माढा तालुक्यात गेल्या चार महिन्यांमध्ये बरेच बल्क कुलर आम्ही सेटअप करून दिले आहेत. पाच लहान मोठे दूध टँकर निर्मिती आम्ही केली आहे. दहा कामगाराच्या माध्यमातून सध्या आम्ही समाधानकारक काम करत आहोत. तसेच टँकर, बल्क कुलर , स्टोरेज टॅंक आधी प्लांटचे मेंटेनन्स चे काम देखील आम्ही करतो. ग्रामीण भागात हा उद्योग सुरू करण्यामागची पार्श्वभूमी विचारली असता ते म्हणाले यापूर्वी महाराष्ट्रामध्ये बारामती, नांदेड आदी ठिकाणीच टँकर, बल्क कुलर बांधणी होत होती. या उद्योगाला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत म्हणून आम्ही हा उद्योग ग्रामीण भागात देखील सुरू करण्याचा निर्णय घेतला. ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळत असून भविष्यकाळात ग्राहकांच्या गरजेनुसार आम्ही सेवा उपलब्ध करून देणार आहोत असा मनोदय त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.




