Uncategorized

शिक्षण क्षेत्रात सक्सेस क्लासेस चा डंका राशीन परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मिळविले विविध क्षेत्रात प्राविण्य

शिवतंत्र न्यूज

शिक्षण क्षेत्रात सक्सेस क्लासेस चा डंका

राशीन परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मिळविले विविध क्षेत्रात प्राविण्य

शिवतंत्र न्यूज 

कर्जत (प्रतिनिधी)

         दिवसेंदिवस शासकीय शाळा महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता कमी होताना दिसून येत असून विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी क्लासेस चा मार्ग अवलंबावा लागत आहे .राशीन परिसरातील प्रा पंकज लांगोरे यांनी सुरू केलेल्या सक्सेस क्लासेसने तब्बल 28 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शेकडो विद्यार्थी या क्लासेसच्या माध्यमातून घडले आहेत. तसेच विविध क्षेत्रांमध्ये या क्लासेसचे विद्यार्थी कार्यरत आहेत. राशीन परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सक्सेस क्लासेसने आपला ठसा उमटवला आहे.

     प्रा पंकज लागोरे यांचे शिक्षण एम ए बी एड (इंग्लिश( झाले. 1997 मध्ये त्यांनी राशीन येथे सक्सेस क्लासेस ची सुरुवात केली.. सुरुवातीला पाचवी ते नववी पर्यंत 100 विद्यार्थ्यांनी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला. स्वतःची जागा नव्हती. भाड्याच्या जागेत काम त्यांनी सुरुवात केली होती. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांनी पालकांचा विश्वास संपादन केला. 2000 मध्ये त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग वाढवले.गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे साडेसातशे ते आठशे पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली. भाड्याची जागा अपुरी पडू लागल्यामुळे त्यांनी 2008 मध्ये एक गुंठा जागा विकत घेऊन तेथे बांधकाम केले. नवीन जागेत त्यांनी क्लासेसचे स्थलांतर केले. याकामी त्यांना मदत लागली ती प्रा अमित टेके यांची .प्रा लांगोरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. बघता बघता राशीन परिसरात सक्सेस क्लासेसचा बोलबाला झाला. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत शिकवण्याची कला प्रा लागोरे व प्रा टेके यांनी आत्मसात केल्यामुळे राशीन परिसरातील हजारो विद्यार्थी सक्सेस क्लासेस मध्ये प्रवेश घेऊ लागले. 2001 मध्ये शालेय शिक्षणाबरोबर संगणक शिक्षण सुरू करण्याचे प्राध्यापक पंकज लागोरे यांनी ठरवले .महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था असलेल्या MKCL या संस्थेबरोबर संलग्नता करत त्यांनी कॉम्प्युटरचे सर्व बेसिक ॲडव्हान्स कोर्सेस सुरू केले हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. दरवर्षी शेकडो विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात. सक्सेस क्लासेस च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पोलीस, वैद्यकीय ,अभियांत्रिकी तसेच प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात भारतात तसे देश विदेशात सेवा देत आहेत. 1997 पासून राशीन केंद्रामध्ये एसएससी परीक्षेत इंग्रजी गणित विज्ञान या विषयात प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी सक्सेस क्लासेस असतो. वैष्णवी सुरवसे या विद्यार्थिनीने पुणे बोर्डात विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून इतिहास रचला आहे. शिक्षण क्षेत्रात सक्सेस क्लासेस चा डंका राशीन परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी मिळविले विविध क्षेत्रात प्राविण्य दिवसेंदिवस शासकीय शाळा महाविद्यालयातील शैक्षणिक गुणवत्ता कमी होताना दिसून येत असून विद्यार्थ्यांना खाजगी शिकवणी क्लासेस चा मार्ग अवलंबावा लागत आहे .राशीन परिसरातील प्रा पंकज लांगोरे यांनी सुरू केलेल्या सक्सेस क्लासेसने तब्बल 28 व्या वर्षात पदार्पण केले आहे. शेकडो विद्यार्थी या क्लासेसच्या माध्यमातून घडले आहेत. तसेच विविध क्षेत्रांमध्ये या क्लासेसचे विद्यार्थी कार्यरत आहेत. राशीन परिसरामध्ये शैक्षणिक क्षेत्रात सक्सेस क्लासेसने आपला ठसा उमटवला आहे. प्रा पंकज लागोरे यांचे शिक्षण एम ए बी एड (इंग्लिश( झाले. 1997 मध्ये त्यांनी राशीन येथे सक्सेस क्लासेस ची सुरुवात केली.. सुरुवातीला पाचवी ते नववी पर्यंत 100 विद्यार्थ्यांनी क्लासेस मध्ये प्रवेश घेतला. स्वतःची जागा नव्हती. भाड्याच्या जागेत काम त्यांनी सुरुवात केली होती. या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन त्यांनी पालकांचा विश्वास संपादन केला. 2000 मध्ये त्यांनी पाचवी ते बारावीपर्यंत वर्ग वाढवले.गुणवत्तापूर्ण शिक्षण दिल्यामुळे साडेसातशे ते आठशे पर्यंत विद्यार्थ्यांमध्ये वाढ झाली. भाड्याची जागा अपुरी पडू लागल्यामुळे त्यांनी 2008 मध्ये एक गुंठा जागा विकत घेऊन तेथे बांधकाम केले. नवीन जागेत त्यांनी क्लासेसचे स्थलांतर केले. याकामी त्यांना मदत लागली ती प्रा अमित टेके यांची .प्रा लांगोरे यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ज्ञानदानाचे काम केले. बघता बघता राशीन परिसरात सक्सेस क्लासेसचा बोलबाला झाला. विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना समजेल अशा भाषेत शिकवण्याची कला प्रा लागोरे व प्रा टेके यांनी आत्मसात केल्यामुळे राशीन परिसरातील हजारो विद्यार्थी सक्सेस क्लासेस मध्ये प्रवेश घेऊ लागले. 2001 मध्ये शालेय शिक्षणाबरोबर संगणक शिक्षण सुरू करण्याचे प्राध्यापक पंकज लागोरे यांनी ठरवले .महाराष्ट्रातील एक नामवंत संस्था असलेल्या MKCL या संस्थेबरोबर संलग्नता करत त्यांनी कॉम्प्युटरचे सर्व बेसिक ॲडव्हान्स कोर्सेस सुरू केले हजारो विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा झाला. दरवर्षी शेकडो विद्यार्थी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतात.

    सक्सेस क्लासेस च्या माध्यमातून हजारो विद्यार्थी पोलीस, वैद्यकीय ,अभियांत्रिकी तसेच प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात भारतात तसे देश विदेशात सेवा देत आहेत. 1997 पासून राशीन केंद्रामध्ये एसएससी परीक्षेत इंग्रजी गणित विज्ञान या विषयात प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी सक्सेस क्लासेस असतो. वैष्णवी सुरवसे या विद्यार्थिनीने पुणे बोर्डात विज्ञान विषयात 100 पैकी 100 गुण मिळवून इतिहास रचला आहे. सक्सेस क्लासेसच्या यशाबद्दल प्राध्यापक पंकज लांगोरे म्हणतात की आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले त्यामुळेच आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकू शकले आहेत. येथून पुढेही असेच दर्जेदार शिक्षण देऊन राशीन चे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा मानस आहे . भविष्यात अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी सारखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी बारामती पुणे येथे जावे लागते. विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे लवकरात लवकर राशीन मध्ये निवासी वर्ग सुरू करणार आहोत कोणतेही आर्थिक सामाजिक पाठबळ नसताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या प्राध्यापक लांगोरे आणि सर यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मराठा बिजनेस फाउंडेशन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा. सक्सेस क्लासेसच्या यशाबद्दल प्राध्यापक पंकज लांगोरे म्हणतात की आम्ही नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष दिले त्यामुळेच आमचे विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये चमकू शकले आहेत. येथून पुढेही असेच दर्जेदार शिक्षण देऊन राशीन चे नाव राष्ट्रीय पातळीवर नेण्याचा आमचा मानस आहे . भविष्यात अकरावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अकॅडमी सारखी सुविधा उपलब्ध करून देण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शिक्षणासाठी बारामती पुणे येथे जावे लागते. विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत असल्यामुळे लवकरात लवकर राशीन मध्ये निवासी वर्ग सुरू करणार आहोत कोणतेही आर्थिक सामाजिक पाठबळ नसताना केवळ गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळवलेल्या प्राध्यापक लांगोरे आणि सर यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी मराठा बिजनेस फाउंडेशन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close