करमाळा
केळी, ऊस, तरकारी व सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी; तहसीलदारांना दिलेल्या निवेदनानंतर तात्काळ कार्यवाही करण्याचे तहसीलदारांचेआदेश
शिवतंत्र न्यूज

केळी, ऊस, तरकारी व सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी
शिवतंत्र न्यूज
करमाळा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे . सर्व पिके पाण्या अभावी जळून जात आहेत विहीर व बोअर यांसारखे जलस्रोत पूर्णपणे कोरडे पडले आहेत. केळी ऊस तरकारी पिके यांसारख्या पिकांचे प्रशासनाने कुठल्याही प्रकारचे पंचनामे केलेले नाहीत प्रशासनाने सरसकट पिकांचे पंचनामे करा करावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना निवेदन देण्यात आले.





