tembhurni

मशिनरी व्यवसायात सिद्धिविनायक मशिनरीची वीस वर्षे पूर्ण  टेंभुर्णी येथील प्रकाश शिंदे या तरुणाची यशोगाथा

शिवतंत्र न्यूज

मशिनरी व्यवसायात सिद्धिविनायक मशिनरीची वीस वर्षे पूर्ण 

टेंभुर्णी येथील प्रकाश शिंदे या तरुणाची यशोगाथा

शिवतंत्र न्यूज 

    टेंभुर्णी हे मशिनरी व्यवसायाचे केंद्र मानले जाते. सोलापूर, पुणे जिल्ह्यातून खूप शेतकरी इलेक्ट्रिक पंप, शेती साहित्य खरेदीसाठी येथे येतात. शेकडो मशीनरी दुकाने टेंभुर्णी येथे आहेत. युवा उद्योजक प्रकाश शिंदे यांनी सुरू केलेल्या सिद्धिविनायक मशीनरी या व्यवसायाला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे.

     प्रकाश रमेश शिंदे यांचे मुळगाव जातेगाव तालुका करमाळा. त्यांचे चुलते सुभाष आबा शिंदे यांचे गणेश मशिनरी हे दुकान बऱ्याच वर्षांपासून टेंभुर्णी येथे आहे. त्यांचा प्रभाव प्रकाश यांच्या वर पूर्वी पासूनच होता. भविष्यात व्यवसाय काय करायचा याचा विचार असताना मशीनरी व्यवसायाचा पर्याय समोर आला. सन 2006 मध्ये यांनी टेंभुर्णी येथे बस स्थानका समोर सिद्धिविनायक मशीनरी या नावाने व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला भरपूर अडचणी आल्या. या ठिकाणी बरेच जुने प्रस्थापित व्यवसाय होते. साहजिकच स्पर्धा निर्माण झाली. मोटार साहित्य विकताना प्रकाश यांच्यापेक्षा कमी दराने विक्री ते करत होते. कमी दरात माल कोठे मिळतो याची माहिती प्रकाश यांना नव्हती. सुरुवातीची चार ते पाच वर्षे व्यवसाय स्थिर होण्यासाठी गेली. यादरम्यान ग्राहकांशी कसे बोलावे, कोणत्या कंपनीचे पंप, साहित्य विक्रीसाठी ठेवायचे अशा अनेक तांत्रिक बाबी ते शिकले. त्यानंतर त्यांची प्रगती होऊ लागली. दरम्यानच्या काळात कितीही अडचणी आल्या तरी ते मागे हटले नाहीत एक एका ग्राहक ग्राहकावर त्यांनी लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांचा आत्मा म्हणजे इलेक्ट्रिक पंप. आणि त्याची विक्री ठेवताना दर्जेदार पंपाला त्यांनी प्राधान्य दिले. कमीत कमी नफ्यात दर्जेदार साहित्य देण्यावर त्यांनी भर दिला. आणि इथून पुढे त्यांचा व्यवसाय झेपावला. परत त्यांनी माघारी वळून पाहिले नाही. आज रोजी त्यांच्या व्यवसायाला वीस वर्षे पूर्ण झाली. परंतु त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. अजूनही ते तेवढ्याच मायेने विश्वासाने ग्राहकांना आपलेसे करतात. एकदा त्यांच्याकडे आलेला ग्राहक त्याचा होऊन जातो. असेही काही 23 वर्षांपासून आजही त्यांच्याच दुकानाला प्राधान्य देतात. सुरुवातीला 300 चौरस फूट जागेत सुरू झालेला व्यवसाय आता 600 चौरस फूट जागेत त्यांनी वाढवला. भविष्यात अशीच सेवा निरंतर ग्राहकांना देण्याची त्यांचे स्वप्न आहे.

     वीस वर्षे व्यवसाय टिकण्याचे रहस्य काय याबद्दल ते सांगतात ग्रामीण भागातील शेतकरी गरीब आहे. त्याला तुम्ही मायेने , प्रेमाने वागणूक द्या, त्याच्याशी बोलताना मृदू पणाने बोला. तरच तो तुमच्याकडे हक्काने येईल. आलेल्या ग्राहकाचे समाधान कसे होईल याकडे लक्ष द्या. त्याला फसवू नका. ग्राहकांना उत्तम सेवा कशी देता येईल याकडे प्राधान्याने पहा. एक संतुष्टक ग्राहक तुम्हाला अनेक ग्राहक देईल. वीस वर्षाच्या काळात एकही ग्राहक सापडणार नाही जो असे म्हणेल की मी त्याची फसवणूक केली. ग्राहकांना दर्जेदार सेवा दिल्यामुळेच मी आजचा दिवस पाहू शकलो. आज टेंभुर्णी मध्ये शेकडो दुकाने आहेत. परंतु आम्हाला ग्राहकांसाठी तुटवडा कधीच जाणवला नाही.

      युवा उद्योजकांसाठी संदेश देताना म्हणतात सेवाभाव, कष्ट , संयम, सातत्य हेच गुण तुम्हाला यशस्वी बनवतात. कोणताही व्यवसाय सहा महिने ते एक वर्षात यशस्वी होत नसतो. मी पाच वर्ष संयम राखला म्हणून मी या क्षेत्रात टिकून राहिलो . अवांतर खर्चाला कात्री लावा, आणि निर्व्यसनी राहा. साधे जीवन जगा असा मोलाचा संदेश प्रकाश शिंदे यांनी दिला आहे. 

   प्रकाश शिंदे यांच्यासारख्या युवा उद्योजकांची प्रेरणा घेऊन वाटचाल केली तर प्रत्येक व्यावसायिक यशाची यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त 45 व्या वर्षी त्यांनीही यश संपादन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मराठा बिजनेस फाउंडेशन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close