राशीन

साई ऑप्टिकल्स माध्यमातून चंद्रकांत धांडेंनी दिली हजारो रुग्णांना नेत्रसेवा 

शिव तंत्र न्यूज

साई ऑप्टिकल्स माध्यमातून चंद्रकांत धांडेंनी दिली हजारो रुग्णांना नेत्रसेवा 

शिवतंत्र न्यूज 

कर्जत प्रतिनिधी

 

 

 

 

    कर्जत तालुक्यामध्ये बाजारपेठ प्रचंड वेगाने विस्तारत आहे. तरुण उद्योजक वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नशीब आजमावताना दिसत आहेत. राशीन येथील तरुण मराठा उद्योजक चंद्रकांत धांडे यांच्या साई नेत्रालयाच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून दृष्टिदानाचे काम सुरू असून त्यांनी जनमानसात विश्वासार्हता मिळवली आहे. 

 

    चंद्रकांत धांडे यांचे मुळगाव धांडेवाडी तालुका कर्जत. बारावी शास्त्र उत्तीर्ण झाल्यानंतर नेत्रचिकित्सा क्षेत्रात करियर करण्याचे त्यांनी ठरवले. त्यानुसार Optometrist (नेत्रचिकित्सक) मध्ये डिप्लोमा केला. वास्तविक कर्जत ही जवळची बाजारपेठ असताना सुद्धा तिथे बरेच व्यवसाय असल्यामुळे स्पर्धा न वाढवता राशीन येथे व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. 6 एप्रिल 2019 रोजी त्यांनी युनियन बँके शेजारी भिगवण रोड राशीन येथे व्यवसायाचा शुभारंभ केला. प्रशिक्षित असल्यामुळे तसेच जपान तंत्रज्ञानावर आधारित मशीनच्या माध्यमातून नेत्रचिकित्सा करत असल्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांना उत्तम प्रतिसाद मिळत होता. नंबरचे अचूक निदान व त्यावर आधारित वाजवी दरामध्ये चष्मे मिळत असल्यामुळे अल्पावधीत साई नेत्रालयाचा बोलबाला झाला. त्याबरोबर दर मंगळवारी डॉक्टर विमल राजपूत नेत्र बालरोग तज्ञ अहमदनगर व शुक्रवारी डॉक्टर विजय साबळे नेत्ररोग तज्ञ हे तज्ञ डॉक्टर साई नेत्रालय येथे भेटीस येत होते. तसेच डॉ सचिन पांढरे नेत्ररोग तज्ज्ञ हेही साई नेत्रालय येथे दर मंगळवारी येत होते.त्यामुळे परिसरातील रुग्णांना बारामती, पुणे येथे जाण्याची गरज राहिली नाही रुग्णांच्या हेलपाटा वाचला. चंद्रकांत धांडे यांनी नेहमीच परिसरातील रुग्णांच्या सेवेला प्राधान्य दिले. रुग्णांचे पैसे वाचले पाहिजेत याकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळेच परिसरातील गरजू रुग्ण त्यांच्याकडे नियमितपणे विश्वासाने येत असतात. गेल्या काही दिवसापासून बारामती येथील सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ व सर्जन असलेले डॉक्टर महेश काटे व डॉक्टर अपर्णा काटे हे दर मंगळवारी रुग्ण तपासणी व उपचार मार्गदर्शन करण्यासाठी राशीन येथे साई नेत्रालय येथे येत आहेत. याचा खूप फायदा रुग्णांना झाला आहे. कारण परिसरातील शेकडो रुग्ण तपासणीसाठी बारामती येथे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये जातात. रुग्णांचा वेळ व पैसा या माध्यमातून वाचला आहे. साई नेत्रालय अँड ऑप्टिकल्स मध्ये रेबन, फास्टट्रॅक फास्ट्रॅक गॉगल तसेच नामांकित कंपनीचे गॉगल्स , ग्लासमध्ये प्राईम, क्रिझॉल , एसीलार,02, ब्लूकट,अल्ट्राव्हायोलेट ग्लासमध्ये चष्मे बनवून मिळतात 

    चंद्रकांत धांडे यांची कर्जत तालुक्यात   रुग्णवाहिका सेवा ही उपलब्ध आहे.

तसेच अहिल्यानगर इथे कार्डियाक रुग्णवाहिका सेवेत आहे. भविष्यात तज्ञ डॉक्टर सोबत गावोगावी नेत्र रोग निदान शिबिर घेण्याचा त्यांचा मानस आहे. तसेच जगातील नवनवीन तंत्रज्ञान राशीन सारखे ग्रामीण भागात उपलब्ध करून देण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे . या कामी त्यांच्या पत्नी सौ वैष्णवी त्यांच्या खांद्याला खांदा लावून नेत्रचिकत्सेचे काम करतात. त्या सुद्धा नेत्रचिकित्सक आहेत. अतिशय हरहुन्नरी मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले चंद्रकांत धांडे हे आपलल्या व्यवसायाच्या माध्यमातून राशीन परिसरात सर्व दूर पोहोचले आहेत. त्यांचीच प्रेरणा घेऊन मराठा युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटचाल करण्याची गरज आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close