tembhurni

शेतकरी हितासाठी साकारले कंपनी उभारण्याचे स्वप्न टेंभुर्णी येथील उद्योजक राजाराम येवले यांच्या क्रेंटा केमिकल चा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज

शेतकरी हितासाठी साकारले कंपनी उभारण्याचे स्वप्न

टेंभुर्णी येथील उद्योजक राजाराम येवले यांच्या क्रेंटा केमिकल चा प्रेरणादायी प्रवास 

 

शिवतंत्र न्यूज 

 

     आर्थिक गरीबी माणसाला हरवू शकत नाही; कष्टांवर विश्वास आणि जिद्द असेल तर स्वतःचे विश्व उभे करता येते. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील सावडी येथील राजाराम येवले यांनी आपल्या चिकाटी आणि दूरदृष्टीच्या बळावर हे सिद्ध केले. “स्वतःच्या हिमतीवर उभे राहणे” हे ब्रीद घेऊन त्यांनी शेतकरी हितासाठी कंपनीची स्थापना केली.

 

उद्योगाची पायाभरणी

    vशेती क्षेत्रातील अनुभव घेतल्यानंतर आणि शेतकऱ्यांच्या अडचणींचा अभ्यास करून राजाराम येवले यांनी १९९३ साली क्रेंटा केमिकल्सची स्थापना केली. गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक कृषी उत्पादने तयार करून कंपनीने शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. आज कंपनीची उत्पादने महाराष्ट्रासह इतर राज्यांतही उपलब्ध आहेत

 

सृष्टी’ ब्रँड

‘सृष्टी’ या ब्रँडअंतर्गत जैविक उत्पादने, पीक संवर्धक आणि विविध शेतीपूरक उत्पादने तयार व वितरित केली जातात. आधुनिक तंत्रज्ञान आणि सातत्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून उच्च दर्जाची उत्पादने तयार केली जातात.
प्रगतीचा वाढता आलेख
सन २००४ मध्ये कंपनीने एलएसआर उत्पादनांची निर्मिती सुरू केली. या उत्पादनांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सध्या कंपनीकडे 1000 हून अधिक डीलर्सचे जाळे असून १९३ पेक्षा अधिक उत्पादने विविध पिकांसाठी उपलब्ध आहेत.

कंपनीचे ध्येय व उद्दिष्ट

    पर्यावरणपूरक आणि शेतकरीहिताचे उत्पादने तयार करणे हे कंपनीचे मुख्य ध्येय आहे. शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे, प्रात्यक्षिके आणि प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करून उत्पादन वाढीस मदत केली जाते. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवले जातात.
‘क्रेंटा केमिकल्स’च्या उत्पादनांची वैशिष्ट्ये
• प्रभावी आणि दर्जेदार उत्पादने
• शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन
• सातत्यपूर्ण संशोधन व नवकल्पना
• १९३ उत्पादने – विविध पिकांसाठी उपयुक्त

       एका रासायनिक कंपनीत नोकरी ते स्वतःच्या कंपनीचे मालक, अशी ओळख आज त्यांनी निर्माण केली आहे. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून दर्जेदार उत्पादने करणारा उद्योजक अशी त्यांची स्वतःची ओळख निर्माण झाली आहे.

      सुरुवातीला त्यांनी एका रासायनिक कंपनीत नोकरी केली. त्या काळात शेतीपूरक उत्पादने, खत, औषधे, फवारणी आदी बाबींचा सखोल अभ्यास त्यांनी केला. उद्योग क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.

       सन २००० मध्ये त्यांनी टेंभुर्णी एमआयडीसी येथे ‘क्रेंटा केमिकल्स’ची स्थापना केली. सुरुवातीला कमी भांडवल, मर्यादित साधनसामग्री आणि काही मोजक्या कामगारांच्या साहाय्याने त्यांनी उत्पादनाला सुरुवात केली. गुणवत्तेला प्राधान्य देत त्यांनी शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अशी उत्पादने तयार केली. त्यामुळे अल्पावधीतच कंपनीला चांगला प्रतिसाद मिळू लागला.

     नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब, दर्जेदार कच्चामाल, योग्य मार्गदर्शन आणि प्रामाणिकपणा या बळावर कंपनीने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत आपले जाळे विस्तारले आहे. आज कंपनीची विविध उत्पादने बाजारात उपलब्ध असून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यात कंपनी यशस्वी ठरली आहे.

     राजाराम येवले यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध संस्थांकडून सन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. ‘क्रेंटा केमिकल्स’ ही कंपनी केवळ व्यवसाय न राहता शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणारी संस्था बनली आहे.
राजाराम येवले यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close