करमाळा

सव्वा एकर डाळिंबात व अंतरपिकतून प्रथम वर्षी युवा शेतकऱ्याने घेतले 23 लाखांचे उत्पादन   नुसत्या आंतरपिकाचेच सात लाख 75 हजार रुपये उत्पादन यशस्वी शेतकरी ते कृषी सेवा केंद्र चालक असा प्रेरणादायी प्रवास …

शिवतंत्र न्यूज

सव्वा एकर डाळिंबात व अंतरपिकतून प्रथम वर्षी युवा शेतकऱ्याने घेतले 23 लाखांचे उत्पादन 

 नुसत्या आंतरपिकाचेच सात लाख 75 हजार रुपये उत्पादन

यशस्वी शेतकरी ते कृषी सेवा केंद्र चालक असा प्रेरणादायी प्रवास …

शिवतंत्र न्यूज

       खूप सारे कृषी सेवा केंद्र चालक शेतकऱ्यांना भरमसाठ रासायनिक खते देऊन फक्त स्वतःच नफा कमवत असतात . मात्र अकोले खुर्द तालुका माढा येथील युवा शेतकऱ्याने अगोदर स्वतःच्या शेतीत अनोखा प्रयोग करत फक्त सव्वा एकरात तेवीस लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. स्वतःच्या शेतात यशस्वी प्रयोग केल्यानंतर ते आता कृषी सेवा केंद्रच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मालामाल करण्याचा प्रयत्न करत आहेत. 

     या हर हुन्नरी, प्रयोगशील युवा मराठा शेतकऱ्याचे नाव आहे प्रतिक अण्णासाहेब महाडिक. अवघ्या 23 वर्षांच्या या युवकाने कृषी क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. प्रतीक यांचे शिक्षण बीएससी केमिस्ट्री तसेच कृषी पदविका पर्यंत झाले आहे आहे. कुंभेज फाटा तालुका करमाळा येथे छत्रपती ऍग्रो केमिकल्स या नावाने कृषी सेवा केंद्र सुरू आहे. ते स्वतःच्या शेतात वेगवेगळे प्रयोग केल्यानंतर तसेच आलेले अनुभवाच्या तसेच अभ्यासाच्या आधारावर विविध फळ पिकांच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत मार्गदर्शन करत असून शेतकऱ्यांचे आयडॉल बनले आहेत. डाळिंब ,केळी, पपई , कलिंगड, खरबूज, तसेच सर्व प्रकारच्या फळबागांना मार्गदर्शन करत आहेत. 

    महाडिक परिवाराला फक्त तीन एकर शेती आहे. त्यांचे वडील यामध्ये केळी तसेच इतर फळ पिके घेत आहेत. 2007 पासून ते केळी पीक घेतात. यापूर्वी एका झाडाला 72 रुपये खर्च येत होता तर एका झाडापासून 35 किलोग्राम उत्पादन मिळत होते. प्रतिकचे शिक्षण झाल्यानंतर त्याने शेतीमध्ये आपल्या ज्ञानाचा व अभ्यासाचा वापर करत नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली आणि आश्चर्य म्हणजे हाच खर्च 54 रुपये वर आला तर उत्पादन 40 किलो पर्यंत मिळण्यास सुरुवात झाली . त्यानंतर प्रतीक ने शेतीमध्ये कारले ,स्वीट कॉर्न यांचेही विक्रमी उत्पादन घेतले 

     प्रतिकने 2023 मध्ये डाळिंब लागवडीचा निर्णय घेतला . सव्वा एकर क्षेत्र लागवडीसाठी तयार केले. यामध्ये बारा बाय आठ अंतरावर बेड तयार करून घेतले . एकरी 4 ट्रॉली शेण खत चांगले मिसळून घेतले .डाळिंबाची 525 झाडे त्यामध्ये बसली. शक्यतो डाळिंबामध्ये आंतरपीक सहसा कोणी घेत नाही. मात्र प्रतिकने कारल्याचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला .त्याच्या माध्यमातून मुख्य पिकाचा खर्च कमी होण्यास मदत होईल अशी अपेक्षा होती. 2015 पासून ते स्लरी व बॅक्टेरिया यांचा वापर सर्व पिकांमध्ये करत आहेत . प्रतिकने आपले कौशल्य , व्यवस्थापन पणाला लावत कारले पिकमध्ये मन लावून मेहनत घेतली .याचेच फळ म्हणून 4000 वेलांपासून आठ टन उत्पादन मिळाले .दर सर्वसाधारण 45 ते 55 रुपये किलो पर्यंत मिळाला कारल्यापासून तब्बल तीन लाख साठ हजार रुपये एवढे उत्पादन मिळाले .कारले पिकातील विक्रमी उत्पादनानंतर त्यांनी बीन्स या शेंगवर्गीय पिकाचे आंतरपीक मधून लागवड केली. हॉटेल जगतात या बेन्सला खूप मागणी आहे . दोन किलो बियाणे यासाठी लागले. खत व्यवस्थापन तसेच पाणी व्यवस्थापन काटेकोरपणे केले. बेन्स मध्येही आठ टन उत्पादन मिळाले. सरासरी 20 ते 40 पे दर मिळाला. यातूनही सुमारे दोन लाख चाळीस हजार रुपये उत्पादन मिळाले. दोन पिकांवरच समाधान म्हणतात त्यांनी फ्लॉवरचे देखील आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला यावरची सात हजार रोपांची लागवड त्यांनी केली. फ्लॉवरचे देखील त्यांना विक्रमी उत्पादन मिळाले . एक लाख 75 हजार रुपये उत्पादन त्यांना फ्लावर पासून मिळाले. आंतरपिका मधूनच त्यांना सात लाख 75 हजार रुपये मिळाले . मुख्य पीक असलेल्या डाळींबाची देखील त्यांनी विशेष काळजी घेतली डाळिंबाच्या पाचशे पंचवीस झाडांपासून त्यांना दहा टन उत्पादन मिळाले व दर हा155 रुपये प्रति किलो असा मिळाला . 15 लाख 50 हजार रुपये उत्पादन त्यांना डाळिंबापासून मिळाले .मुख्य पीक व आंतरपीका मधून त्यांना सव्वा एकरात 23 लाख रुपये मिळून उत्पादन मिळाले.

     प्रतिक महाडिक हे नेहमीच वेगवेगळे संशोधन ,मार्गदर्शन ,प्रयोग यामध्ये व्यस्त असतात. एवढ्या कमी वयात त्यांनी उत्पन्नाचे उच्चांक प्रस्थापित केले. पपई या पिकांमध्ये देखील भरघोस उत्पादन घेतले आहे. पपई 15 नंबर या वाणाच्या दीड हजार झाडांपासून 63 टन उत्पादन घेतली तर पपई तैवांन 786 या वाणापासून देखील 68 टन उत्पादन घेतले आहे. शेतीमध्ये विक्रमी उत्पादन घेतल्यानंतर प्रतिक यांनी कृषी सेवा केंद्र व्यवसायात पदार्पण केले आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा तसेच जास्तीत जास्त उत्पादन मिळून त्यांचे जीवनमान उंचवावे अशी त्यांची मनापासून इच्छा आहे. सहा महिन्यापासून त्यांचे कृषी सेवा केंद्र सुरू आहे. त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ झाली आह. ते आपल्या शेतात पंधरा दिवसातून एकदा ऑक्साईडचा वापर करतात.त्यामुळे जमिनीची गुणवत्ता सुधारते असा अनुभव त्यांना आला आहे. 

     शेती व्यवसाय व शेतकरी यांना केंद्रस्थानी म्हणून या पुढील वाटचाल करणार असल्याचे प्रतिक महाडिक सांगतात . खरोखरच 23 – 24 वर्षाचा युवक शेती ,कृषी सेवा केंद्र व्यवसाय यशस्वीपणे चालवतो .ही गोष्टच प्रेरणादायक आहे. या पुढील काळात शेतकऱ्याला करोडपती करण्यासाठीच आपण काम करणार आहोत. भविष्यकाळात शेतीला चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे युवकांनी संयम राखून कठोर परिश्रम करून शेती व्यवसाय जिवंत ठेवावा .आगामी काळात शेतकरीच राजा असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला . मराठा समाजातील युवकांनी प्रतिक महाडिक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्याची गरज आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close