करमाळासांस्कृतिक

करमाळ्यातील युवा गीतकाराच्या गाण्याला प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर कोंबडा ग गाण्याने मिळवल्या 1 मिलियन पेक्षा जास्त views

उच्च पदस्थ अधिकारी असताना नवनाथ भानवसे यांनी जोपासला गाण्याचा छंद

करमाळ्यातील युवा गीतकाराच्या गाण्याला प्रेक्षकांनी घेतले डोक्यावर

कोंबडा ग गाण्याने मिळवल्या 1 मिलियन पेक्षा जास्त views

 

उच्च पदस्थ अधिकारी असताना नवनाथ भानवसे यांनी जोपासला गाण्याचा छंद

 

 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क 

 

मी काल दिवसभर कोंबडी माग पळून झालतो बेजार… येरवाळी घावली तुझी कोंबडी….
हे “कोंबडा गं ” या नावाने युट्युब वर असलेलं गाणं सध्या सोशल मीडियावरती सर्वत्र प्रचंड वायरल होत आहे. युट्युब वर एक मिलियन पेक्षा अधिक views प्राप्त करून लोकप्रिय झालेले हे गाणं आनंद शिंदे यांनी गायलेलं असून करमाळा तालुक्यातील छोट्याशा खेडेगावातील तरुण नवनाथ भानवसे यांनी हे गाणं लिहिलं आहे तसेच त्यांनी स्वतः अभिनय देखील केलेला असून त्याचे दिग्दर्शनही केलेले आहे. 

कोंबडा ग या गाण्याची लिंक

नवनाथ भानवसे यांना लहानपणापासूनच कविता, कथा व गाणी लिहिण्याची आवड होती, त्यातच आपलंही गाणं युट्युब वर यावं /असावं असं त्यांना मनोमन नेहमी वाटत असायाचं. मग त्यांनी पुणे येथील Dawn Studio ला भेट दिली आणि गाणं संगीतबद्ध करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि तेथून त्यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरू झाला. 
त्यांनी त्यांचे प्रथम गीत “चिंब भिजू दे” हे गाणं सौरभ साळुंखे (माझा आनंद हरपला या गाण्याचे फेमस गायक) यांच्या आवाजात संगीतबद्ध केलं त्यानंतरही त्यांनी
“कोंबडा गं” हे आनंद शिंदे यांच्या आवाजात गाणं संगीतबद्ध केलं. आणि “Chaitali Production” नावाचा यूट्यूब चैनल सुरू झाला.
याशिवाय त्यांनी “सारेगम मराठी” या यूट्यूब चैनल साठी तीन गाणी सुद्धा लिहिली आहे. त्यामध्ये 
१.शिवबाची तलवार– गायक अवधूत गांधी 
२.सण गुढी पाडव्याचा — गायक वैशाली सामंत व रवींद्र खोमणे 
३.शिव मल्हारी– गायक रोहित राऊत 
यातील “सण गुढी पाडव्याचा” हे गाणं तर youtube वर तीन दिवस ट्रेडिंग नंबर एकला होतं. येत्या काही दिवसात “नटलीया खास” हे हर्षवर्धन वावरे आणि सोनाली सोनवणे यांनी गायलेलं तर “सुंदरा तू” हे जगदीप वैद्य यांनी गायलेलं गाणं लवकरच रसिक श्रोत्यांच्या भेटीला येणार आहे.
Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close