माढा
इलेक्ट्रिक क्षेत्रात माढ्याच्या भोसले बंधूंनी मिळवला नावलौकिक श्रीमंत राजे इलेक्ट्रिकने केली 19 वर्ष पूर्ण
शिवतंत्र न्यूज

इलेक्ट्रिक क्षेत्रात माढ्याच्या भोसले बंधूंनी मिळवला नावलौकिक
श्रीमंत राजे इलेक्ट्रिकने केली 19 वर्ष पूर्ण
शिवतंत्र न्यूज
आपल्या माता पित्यांनी केलेल्या कष्टाची जाणीव ठेवून जर वाटचाल केली तर यशस्वी होण्यापासून जगातील कोणतीच शक्ती रोखू शकत नाही. माढा येथील भोसले बंधूंचे श्रीमंतराजे इलेक्ट्रिकल हा व्यवसाय केल्या 19 वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत आहे. त्यांच्या वडिलांनी सुमारे 40 वर्षे मजूर म्हणून काम केले. आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्याची खुणगाठ मनात बांधून गणेश, दिनेश व विनोद या भोसले बंधुंनी इलेक्ट्रिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.

भोसले परिवाराचे मूळ गाव उत्तर सोलापूर तालुक्यातील पडसाळी हे आहे. सततच्या दुष्काळामुळे तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने बिभीषण भोसले हे कामाच्या शोधात माढा परिसरात आले. येथे प्रगतशील शेतकरी व मा जी प सदस्य झुंजार नाना भांगे यांच्याकडे त्यांना काम मिळाले.


खूप काळ त्यांनी येथे सालगडी म्हणून काम केले. वडिलांच्या कामात तिघेही बंधू शाळा सुटल्यानंतर मदत करत होते. माढा महाविद्यालयात शिकत असताना थोरले चिरंजीव गणेश हे कमवा आणि शिका या योजनेद्वारे काम करत स्वतःच्या शिक्षणाचा भार उचलत कुटुंबाला देखील हातभार लावला. या ठिकाणी त्यांनी शिपाई म्हणून देखील काही काळ काम केले 2007 मध्ये त्यांनी शिपाई म्हणून काम करत असताना सोलापूर रोडवर एक छोटीशी टपरी सुरू केली. यामध्ये इलेक्ट्रिक रिपेरिंग चे काम सुरू केले या अगोदर त्यांनी मोटार रिवायडींग चे काम शिवाजी शंकर कन्हेरे रणदिवेवाडी यांच्याकडे शिकून घेतले होते. लोकांची किरकोळ दुरुस्तीची कामे काळजीपूर्वक करत ग्राहकांचा विश्वास आत्मसात केला. ग्राहक संख्या विशेषण दिवस वाढत गेली टपरीमध्ये सुरू असलेला हा व्यवसाय एखाद्या छोट्या दुकानात सुरू करण्याची ग्राहकांनी त्यांना प्रेरणा दिली. एका बचत गटातून त्यांनी पाच हजार रुपये कर्ज घेतले व वैराग रोडवर गाळा भाड्याने घेऊन 2011 साली श्रीमंतराजे इलेक्ट्रिकल्स या व्यवसायाचा विस्तार त्यांनी केला. सुरुवातीला या तुटपुंज्या भांडवलावर त्यांनी छोट्या इलेक्ट्रिक वस्तू रिपेरिंग विक्री सुरुवात केला .दहा बाय पंधरा फूट एवढ्याशा छोट्याशा जागी त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. सुरुवातीपासूनच त्यांनी व्यवसायात प्रामाणिकपणा जपला .ग्राहकांना अनावश्यक खर्चात टाकण्याचे त्यांनी काटाक्षाने टाळले. त्यामुळे माढा शहर व परिसरात ग्राहकांनी या व्यवसायाला भरभरून प्रतिसाद दिला. दिवसा गणिक व्यवसायात वाढ होऊ लागली. 2022 मध्ये त्यांनी या दुकानाच्या शेजारीच एक गाळा भाड्याने घेतला . तेथे भोसले ऍग्रो अँड प्लंबिंग या नावाने प्लंबिंग साहित्य विक्री दुकान सुरू केले. सर्व प्रकारचे प्लंबिंग साहित्य योग्य दरात येथे मिळते. परिसरातील प्लंबिंग कारागीर येथे आवर्जून येतात. दिनेश तसेच वडील बिभीषण हे प्लंबिंग व्यवसायाची जबाबदारी पार पाडतात. 2025 साली त्यांनी देसाई प्लॉट, सोलापूर रोड, मार्केट यार्ड पाठीमागे श्रीमंतराजे इलेक्ट्रॉनिक्स मॉल हे भव्य दिव्य दालन सुरू केले. येथे सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वस्तू , टीव्ही फ्रिज, एसी, वॉशिंग मशीन, इन्वर्टर, बॅटरी, वॉटर प्युरिफायर, आटा चक्की, मिक्सर आदी वस्तू होलसेल दरात मिळतात. या ठिकाणी गणेश हे जातीने उपस्थित राहतात . तीन हजार पाचशे चौरस फुटाची जागा त्यांनी विकत घेऊन या ठिकाणी दोन इमारतींचे बांधकाम केले आहे. एका इमारतीमध्ये दुकान तर दुसरी इमारत राहण्यासाठी वापरली जाते. सुमारे वीस वर्षांच्या संघर्षातून भोसले बंधूंनी ही दौलत उभा केली आहे.
श्रीमंतराजे इलेक्ट्रिकल्स- देसाई प्लॉट येथील इलेक्ट्रॉनिक्स मॉल
या कामी वडील बिभीषण भोसले यांचे मार्गदर्शन लाभल्याचे ते सांगतात. वडील सुद्धा या बांधवांना व्यवसायात मदत करतात. भोसले बंधूंच्या या प्रेरणादायी प्रवासाबद्दल त्यांना रोटरी क्लब माढा यांच्याकडून 2025 – 26 या वर्षीचा यशस्वी मराठा उद्योजक हा पुरस्कार रोटरी क्लब चे अध्यक्ष डॉक्टर सुभाष पाटील सर यांच्या माध्यमातून प्रदान करण्यात आला. या सर्व प्रवासाबद्दल बोलताना ते म्हणतात की, मित्रमंडळी, हितचिंत, ग्राहक यांनी आम्हाला सदैव पाठबळ दिले. रिपेरिंग च्या माध्यमातून आम्ही घरोघरी पोहोचलो. लोकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. गुणवत्तापूर्ण साहित्यचीच विक्री केली. वीस वर्षात एकही ग्राहक असा सापडणार नाही तो असा म्हणेल की आम्ही त्याची फसवणूक केली. त्यामुळेच इलेक्ट्रिक साहित्य व श्रीमंतराजे असे समीकरण तयार झाले. माढा येथील मनकर्ण पतसंस्थेने आम्हाला भरपूर मदत केली. सर्व काम आम्ही तीन भावंडे व वडील असे चार जण करत असल्याने फक्त दोन कामगारांच्या जोरावर चार दुकाने आम्ही व्यवस्थितपणे चालवू शकलो.
वैराग रोडवरील श्रीमंत राजे इलेक्ट्रिकल्स





