tembhurni

रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांच्याकडे; सचिवपदी बाळासाहेब सपाटे

शिवतंत्र न्यूज

रोटरी क्लब टेंभुर्णीच्या अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांच्याकडे; सचिवपदी बाळासाहेब सपाटे

शिवतंत्र न्यूज 

प्रतिनिधी : टेंभुर्णी

 

      रोटरी क्लब ऑफ टेंभुर्णीच्या वर्ष २०२६–२७ साठी अध्यक्षपदाची धुरा पपेश पाटील यांनी, तर सचिवपदाची जबाबदारी बाळासाहेब सपाटे यांनी स्वीकारली. मावळते अध्यक्ष दीपक व्यवहारे व सचिव संतोष गावडे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला. त्यानिमित्त आयोजित पदग्रहण सोहळा साधेपणाने पार पडला.

     रोटरी क्लब टेंभुर्णीचा पदग्रहण सोहळा दरवर्षी मोठ्या दिमाखात आयोजित केला जातो. मात्र, यंदा क्लबचे क्रियाशील संस्थापक सदस्य अनिल बाबर यांच्या नुकत्याच झालेल्या निधनामुळे कार्यक्रमाच्या स्वरूपात बदल करण्यात आला. त्यांच्या निधनाचे दुःख मनात ठेवत कोणताही अनावश्यक दिखावा न करता साधेपणाने कार्यक्रम घेण्यात आला.

      पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष पाटील यांनी आगामी वर्षातील कामकाजाची दिशा स्पष्ट केली. अनिल बाबर यांनी रोटरी क्लबच्या उभारणीसाठी आणि सामाजिक कार्यासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन त्यांच्या स्मरणार्थ टेंभुर्णी शहरासाठी कायमस्वरूपी उपयुक्त ठरेल असा सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प नूतन अध्यक्षांनी व्यक्त केला.

     कार्यक्रमास रवी सुरवसे, रोटरीचे संस्थापक यशवंत हांडे, महेश कोकिळ, माजी अध्यक्ष वैभव गांधी, नागेश कल्याणी, संदीप जाधव, शब्बीर जहागीरदार, श्रीकांत लोंढे, मुकुंद अटकळे, रणजित बोत्रे, प्रशांत गांधी, अनिल मस्के उपस्थित होते.

   स्वच्छ टेंभुर्णी – सुंदर टेंभुर्णी
       रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे गव्हर्नर जयेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, ‘स्वच्छ टेंभुर्णी – सुंदर टेंभुर्णी’ उपक्रम, बेटी बचाव जनजागृती तसेच गरजू नागरिकांसाठी विविध आरोग्य व सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close