tembhurni

दहा वर्षे 24 तास सेवा देणारे महाडिक बंधूंचे हॉटेल माऊली चहा शटर नसलेल्या या अनोख्या हॉटेल ला मिळतोय ग्राहकांचा उत्तुंग प्रतिसाद

शिवतंत्र न्यूज

दहा वर्षे 24 तास सेवा देणारे महाडिक बंधूंचे हॉटेल माऊली चहा

शटर नसलेल्या या अनोख्या हॉटेल ला मिळतोय ग्राहकांचा उत्तुंग प्रतिसाद

शिवतंत्र न्यूज 

f

     अहिल्यानगर सोलापूर राज्य मार्गावर टेंभुर्णी टोलनाक्याजवळ अकोले खुर्द येथील माऊली चहा नावाचे एक हॉटेल गेल्या दहा वर्षांपासून ग्राहकांच्या सेवेत 24 तास कार्यरत आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे या हॉटेलला शटर नाही. गेल्या दहा वर्षापासून एकही दिवस सुट्टी न घेता ग्राहकांना सेवा देण्याचे काम महाडिक परिवार करत आहे.

     हॉटेलचे संचालक पोपट  व कुबेर सुखदेव महाडिक आपल्या या प्रवासाबद्दल बोलताना म्हणतात आम्हाला जमीन फक्त दीड एकर होती. उपजीविकेसाठी आम्ही 26 वर्षांपूर्वी करमाळा चौक टेंभुर्णी येथे छोटीशी टपरी टाकली होती. पूर्वी टेंभुर्णी बायपास नव्हता त्यावेळी सर्व वाहने टेंभुर्णी शहरातून जात होती. या छोट्याशा टपरीमध्ये वाहन चालकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू जसे की लुंगी, टॉवेल, ब्रश , टूथ पेस्ट, साबण, तेल, रुमाल, किचेन, गॉगल, बॉडी स्प्रे तसेच अन्य अत्यावश्यक वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. सुमारे 16 वर्ष अतिशय जिद्दीने, संघर्षातून हा व्यवसाय सुरू ठेवला सर्व काही सुरळीत सुरू असताना सोलापूर पुणे राज्य मार्ग चौपदरी झाला. टेंभुर्णी येथे बायपास झाला आणि सर्व वाहने गावाबाहेरून जाऊ लागली. आमच्या या व्यवसायावर प्रचंड संकट आले .ट्रक चालकांवर आमचा व्यवसाय अवलंबून असल्याने रोजी रोटी साठी काय करायचे असा मोठा प्रश्न निर्माण झाला. याच विवंचनेत असताना अहिल्यानगर सोलापूर हायवेवर टेंभुर्णी टोलनाक्याजवळ 800 स्क्वेअर फुट एवढी जागा भाड्याने घेऊन येथे शेड उभारून माऊली चहा या नावाने चहा नाश्त्याचे हॉटेल आम्ही सुरू केले. सुरुवातीला येथे चहा, कॉफी , भजी, वडा पाव एवढेच पदार्थ उपलब्ध होते. पाणी वाटली फक्त दहा रुपयांना देण्यास आम्ही सुरुवात केली. ती आजतागायत 10 रुपयांनाच आम्ही विक्री करतो.त्यानंतर महाडिक यांनी मिसळ, पुरी भाजी, समोसा, कोल्ड्रिंक्स सर्व प्रकारची मिठाई, ड्रायव्हर बांधवांना लागणारे अत्यावश्यक साहित्य, सोलापूर कडक भाकरी, सोलापूर शेंगा चटणी, सर्व प्रकारचे बेकरी प्रॉडक्ट, दूध, दही आणि इतर पदार्थ उपलब्ध केले. त्यांचे वडील स्व सुखदेव देवू महाडिक यांच्या पुण्यतिथीचा दिवस वगळता वर्षातील 364 दिवस हॉटेल 24 तास सुरू असते. पोपट महाडिक यांचे बंधू कुबेर, पुतणे नितीन , ज्ञानेश्वर हे चार जण तसेच दोन कामगार ग्राहकांच्या सेवेत कार्यरत असतात. तिसरे बंधू बिभीषण हे स्कार्पिओ गाडी भाड्याने देण्याचा व्यवसाय करतात. घरातील लहान थोर, स्त्रि पुरुष सर्वजन कार्यमग्न असतात. महाडिक परिवाराचे एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण परिवाराच्या गळ्यात तुळशीची माळ आहे. घरातील वातावरण अध्यात्मिक आहे. विशेष म्हणजे सर्व परिवाराने अजूनही एकत्र कुटुंब पद्धती जतन केली आहे. सर्व परिवार गुण्यागोविंदाने राहतो. यामुळेच फक्त दीड एकर शेती असताना खूप काही प्रगती एकत्र कुटुंबामुळे साधली गेली आहे. पोपट यांची दोन्हीही मुले आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेत अध्यात्मक शिक्षण घेतात. व्यवसायामुळे आर्थिक परिस्थिती बरोबरच सामाजिक प्रतिष्ठाही मिळाल्याचे पोपट शेठ सांगतात. कुबेर हे ग्रामपंचायतचे उपसरपंच पद भूषवत आहेत.

      या सर्व प्रवासात सिंहाचा वाटा उचलला तो  ज्ञानेश्वर (माऊली) विठ्ठल सावंत व पुतणे दिग्विजय बिभीषण महाडिक यांनी. दोघेही शिक्षण घेत असताना मोकळे वेळामध्ये हॉटेल व्यवस्थापन पाहतात. त्यांच्यामुळेच महाडिक बंधू निश्चिंत असतात. हे दोघेही नसते तर आम्हाला हा प्रवास खूप अडचणीचा ठरला असता असे महाडिक बंधू म्हणाले. आपल्या विनम्र सेवेच्या जोरावर माऊली व दिग्विजय यांनी ग्राहकांची मने जिंकली आहेत असेही ते म्हणतात.नातेवाईकच असलेले  हॉटेल जागा मालक डॉक्टर अमोल चिंतामण यांनी देखील अनमोल असे मार्गदर्शन महाडिक परिवाराला केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग महाडिक परिवाराला व्यवसायिक प्रवासामध्ये झाला.

    आपल्या या यशाचे गुपित सांगताना ते म्हणतात आम्ही तीन बंधू मधला सुसंवाद, आध्यात्मिक वातावरण व उद्योगशीलता यामुळे संपूर्ण परिवार आज पर्यंत एकसंध राहिला आहे. भविष्यात महाडिक परिवार एक छानसे शुद्ध शाकाहारी हॉटेल उभारायचे आहे.यामागचे कारण ते सांगतात, आमचा सर्व परिवार अध्यात्मिक आहे. या मार्गावरून हजारो वारकरी जातात .या वारकऱ्यांना शुद्ध सात्विक जेवण दिले तर आमच्या दृष्टीने ती पांडुरंगाची सेवाच ठरेल. महाडिक बंधू येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची आस्थेने चौकशी करतात. त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पंढरपूर शिर्डी नाशिकला जाणारा प्रत्येक भावीक, पर्यटक येथे चहा नाश्त्यासाठी थांबतो.

      अकोले ते टेंभुर्णी बायपास चौक परिसरात बरीच हॉटेल आहेत मात्र माऊली हॉटेल येथे ग्राहकांची गर्दी जास्त असते. चहा , कॉफी व सर्व पदार्थ बनवताना आम्ही शुद्धता व दर्जा सांभाळतो, त्यामुळेच इथलां प्रत्येक पदार्थ ग्राहकांना आवडतो. असे महाडिक बंधू सांगतात.

     महाडिक परिवाराची जवळजवळ 26 वर्ष व्यवसायात गेली आहेत. बायपास मुळे एक व्यवसाय बंद पडला तरी हार न मानता जिद्द चिकाटी व संघर्षाच्या जोरावर नवीन पर्याय ऊभारत पुन्हा यशस्वी झालेल्या या परिवाराची वाटचाल अतिशय प्रेरणादायी आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close