tembhurni
मिल्किंग मशीन मुळे मिळाली नवी ओळख टेंभुर्णीच्या प्रमोद जगताप यांचे उद्योग क्षेत्रात दमदार पदार्पण
शिवतंत्र न्यूज

मिल्किंग मशीन मुळे मिळाली नवी ओळख
टेंभुर्णीच्या प्रमोद जगताप यांचे उद्योग क्षेत्रात दमदार पदार्पण
शिवतंत्र न्यूज


टेंभुर्णी परिसरात कृषी आधारित उद्योग व्यवसाय वेगाने वाढत आहेत. यामध्ये ठिबक सिंचन, पाईप निर्मिती, फळ आच्छादन आदी उद्योग सुरू करण्यात तरुणाई आघाडीवर आहे. येथील उद्योजक प्रमोद जगताप यांनी विठाई मिल्किंग मशीन निर्मिती उद्योग गेल्या पाच वर्षापासून करत आहेत. त्यांनी सुरू केलेल्या इवल्याशा रोपट्याचा आज वटवृक्ष झाला आहे. हजारो दूध उत्पादकांना त्यांनी उत्पादित केलेल्या या मशीनचा उपयोग होत आहे. आपल्या विठाई इंटरपाईजेस या फर्मच्या माध्यमातून प्रमोद जगताप विविध सेवा देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या पत्नी सौ चैताली जगताप यांनी सुद्धा त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत टेंभुर्णी येथे रेवा ब्युटी पार्लर ने टेंभुर्णी रेंटल हाऊस या नावाने व्यवसाय सुरू केला आहे

प्रमोद हनुमंत जगताप यांचे गाव सुरली तालुका माढा आहे. त्यांचे शिक्षण एचएससी पर्यंत झाले. त्यांची कौटुंब कौटुंबिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे पुढील शिक्षणाला खिळ वसली. काही दिवस त्यांनी विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यात नोकरी केली. नोकरी करत असताना आयुष्यात काहीतरी आव्हानात्मक काम करून यशस्वी होण्याची स्वप्ने त्यांना पडत होती. नोकरी करत असताना फक्त गरजा पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसायच आवश्यक असतो याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी नोकरीला राम राम ठोकला. विविध प्रकारच्या मार्केटिंग कंपन्यांमध्ये त्यांनी काही दिवस काम केले. अशातच कोरोना महामारीचे आगमन झाले आणि जग जागेवरच थांबले गेले.प्रमोद यांनी आज पर्यंत छोटे मोठे व्यवसाय करत थोडीफार पुंजी जमा केली होती.त्यामुळे लॉकडाऊन मध्ये व्यवसाय बंद असल्याने फारशी आर्थिक चणचण जाणवली नाही. मात्र भविष्यात आर्थिक दृष्ट्या संपन्नता यावी यासाठी काय करता येईल याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. अभ्यासांती मिल्किंग मशीन निर्मिती व्यवसायाकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. कारण टेंभुर्णी परिसरातील हजारो शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. काही शेतकऱ्यांकडे जास्त गाई असतात. दूध काढण्यासाठी दर्जेदार मिल्किंग मशीन असेल तर शेतकऱ्यांचा फायदा होईल व आपल्यालाही सक्षम पर्याय मिळेल. याच धारणेतून टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांनी विठाई मिल्किंग मशीन चे उत्पादन 2021 मध्ये सुरू केले. सात गुंठे जागा घेऊन त्या ठिकाणी चार गुंठ्यामध्ये शेड उभारत त्यांनी या ठिकाणी उत्पादन सुरू केले. उत्पादन करत असताना दर्जा बाबत त्यांनी अजिबात तडजोड केली नाही. बाजारात असलेल्या मिल्किंग मशीन पेक्षा दर्जेदार मशीन असेल याची पुरेपूर काळजी त्यांनी घेतली. प्रमोद यांना मार्केटिंग क्षेत्राचा बराच अनुभव असल्याने वितरणाची फारशी अडचण त्यांना आली नाही. विविध तालुक्यांमध्ये त्यांनी वितरकांची नेमणूक केली. या मशीनचे वैशिष्ट्य सांगताना ते म्हणाले की आपल्या विठाई मिल्किंग दूध यंत्रामुळे मनुष्यबळ कमी लागते. दूध काढणी सोपे जाते. वासरू जसे दूध पिते त्याप्रमाणे हे मशीन काम करते. जनावरांचे सड अत्यंत हळुवारपणे हाताळले गेल्याने कोणतीही इजा होत नाही. दूध यंत्राच्या वापराने दूध उत्पादनामध्ये बरीच वाढ होते.

मिल्किंग मशीन वापरताना राखलेला स्वच्छतेमुळे कासेच्या आजाराचे प्रमाण कमी होते. दूध काढणी यंत्रामुळे गाई व म्हशींचे दूध काढणी सोपे जाते. एक गायीपासून ते 25 गायींचे दूध काढण्यासाठी हे मशीन वापरली जाते. आजपर्यंत 9500 मशीनची विक्री झाली आहे. विक्री पश्चात सेवा सुद्धा विठाई इंटरप्राईजेस च्या माध्यमातून दिली जाते. सर्व मशीन व्यवस्थित रित्या कार्यरत आहेत. मिल्किंग मशीन उत्पादनाबरोबरच प्रमोद यांनी टेंभुर्णी येथे ज्योतिर्लिंग इंटरप्राईजेस नावाने विविध सेवा देणारा व्यवसाय सुरू केला आहे. यामध्ये सोलर सिस्टिम पिठाची गिरणी सीसीटीव्ही कॅमेरा , आरो फिल्टर, वॉटर हीटर आदी सेवा देण्याचे काम प्रमोद करतात.
प्रमोद हे सुरुवातीपासून व्यावसायिक दृष्टिकोन बाळगणारे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या पत्नी सौ चैताली यांना देखील उद्योग प्रेरणा त्यांनी दिली. यातून सौ चैताली यांनी रेवा ब्युटी पार्लर सुरू केले. बरेच दिवस त्यांनी हे पार्लर छोट्या स्वरूपात चालू होते. त्यानंतर सौ चैताली यांनी ब्युटी पार्लर व्यवसायाचे अत्याधुनिक प्रशिक्षण पुणे येथे प्रतीक्षा साळुंखे अकॅडमी, सॅम अँड जॅस अकॅडमी येथे सर्व प्रशिक्षण घेतले. त्यानंतर टेंभुर्णी येथे पुष्पक मंगल कार्यालय शेजारी, करमाळा रोड येथे रेवा ब्युटी पार्लर या नावाने भव्यदिव्य स्वरूपात ब्युटी स्टुडिओ चा शुभारंभ त्यांनी केला. यामध्ये थ्रेडिंग, वॅक्सिंग, हेअर कट, हेअर स्टाईल, हेअर स्पा, फेशियल, फेशियल इलेक्ट्रिक ट्रीटमेंट, ब्रायडल मेकअप, मॅनिक्युअर, पेडिक्युअर आदी सेवा दिल्या जातात. तसेच एचडी मेकअप च्या ऑर्डर देखील स्वीकारल्या जातात. तसेच टेंभुर्णी रेंटल हाऊस च्या माध्यमातून इमिटेशन ज्वेलरी, मॅटरनिटी गाऊन, प्री-वेडिंग ड्रेस, वन पीस गाऊन, ब्रायडल लेहंगा, नऊवारी काष्टा साडी, शॉर्ट वन पीस देखील विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच येथे भाडेतत्त्वावर ज्वेलरी व ड्रेस देखील मिळतात.

जगताप दांपत्याने अतिशय प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. त्यांची प्रेरणा घेऊन आपल्या तरुणांनी व्यवसायात पदार्पण करण्याची गरज आहे.





