tembhurni

ऑटोमोबाईल्स क्षेत्रात इंगळे बंधूंची गरुडभरारी  लक्ष्मी ऑटोमोबाइल्स च्या माध्यमातून साधली प्रगती 

शिव तंत्र न्यूज

ऑटोमोबाईल्स क्षेत्रात इंगळे बंधूंची गरुडभरारी 

लक्ष्मी ऑटोमोबाइल्स च्या माध्यमातून साधली प्रगती 

 

शिवतंत्र न्यूज

 

    टेंभुर्णी येथील रवींद्र इंगळे व मंगेश इंगळे या बंधूंनी गेल्या चार वर्षांपासून अविरत परिश्रम घेत ऑटोमोबाईल्स क्षेत्रात प्रेरणास्पद काम केले आहे. लक्ष्मी ऑटोमोबाइल्स या त्यांच्या व्यवसायाने उंची गाठली आहे. होलसेल व रिटेल स्पेअर पार्ट्स, गॅरेज, ऑटोमोबाईल्स असे विविध आघाड्यांवर काम केल्यामुळे इंगळे बंधूंचा नावलौकिक निर्माण झाला आहे.

     रवींद्र मोहन इंगळे व मंगेश मोहन इंगळे हे दोन बंधू .गरीब शेतकरी कुटुंबातील त्यांची जडणघडण. लहानपणापासून जिद्द, धडाडी हे उपजत गुण होते. बालपणातच गरिबीवर विजय मिळवण्याचा निर्धार केला व त्यानुसार कामास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी टू व्हीलर रिपेरिंग काम शिकून घेतले. कुर्डूवाडी रोड येथे 30 बाय 20 एवढे शेड त्यांनी भाड्याने घेतले आणि लक्ष्मी ऑटोमोबाईल्स या नावाने त्यांनी टू व्हीलर रिपेरिंग दुकान सुरू केले. त्यासोबत त्यांनी स्पेअर पार्ट देखील ठेवण्यास सुरुवात केली. टू व्हीलर गाड्यांची सर्विसिंग, इंजिन काम यामध्ये इंगळे बंधूंचा हातखंडा होता. अतिशय काळजीपूर्वक त्यांनी गाड्यांची कामे करण्यास सुरुवात केली. आपोआपच त्यांची प्रसिद्धी होऊ लागली. अगदी काही कालावधीत त्यांचा व्यवसाय नावारूपाला आला. ऑटोमोबाईल्स बरोबरच त्यांनी आपला मोर्चा स्पेअर पार्ट्स होलसेल क्षेत्राकडे वळवला. सुरुवातीला सर्व गाड्यांचे स्पेअर्स गावातील गॅरेज व्यवसायिकांना देण्यास सुरुवात केली. कमीत कमी नफ्यावर हे स्पेअर पार्ट दिल्यामुळे शहरातील बहुतेक गॅरेज व्यावसायिक इंगळे बंधूं कडून साहित्य घेऊ लागले. टेंभुर्णी शहरात जम बसवल्यानंतर त्यांनी शेजारील गाव, शहर, तालुका येथील व्यवसायिकांना देखील साहित्य पुरवण्यास सुरुवात केली. आरडीएल ऑटो पार्टस , आर एन ऑटो पार्टस, केके ऑटो पार्टस या नामांकित नामांकित कंपन्यांची एजन्सी त्यांनी घेतली होती. या कंपन्यांबरोबर इंगळे बंधूंनी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे व्यवसाय वाढीसाठी बराच फायदा झाला. आज मीतिला स्पेअर पार्ट्स होलसेल व्यवसाय करमाळा, कर्जत, राशीन, पंढरपूर, बारामती, दौंड आदी तालुक्यांमध्ये इंगळे बंधूंचे ग्राहक आहेत. पुणे, अहमदनगर, लातूर या जिल्ह्यांमध्ये देखील त्यांचा व्यवसाय विस्तारत आहे

     विविध कंपनीची एजन्सी घेत त्यांनी उत्पादन क्षेत्रात देखील पाऊल टाकले आहे. आरएम ऑटो पार्टस या नावाने एमआयडीसी टेंभुर्णी येथे त्यांची उद्योग सुरू केला आहे. या ठिकाणी साईट स्टॅन्ड, मधले स्टॅन्ड हे टू व्हीलर चे स्पेअर पार्ट्स त्याचबरोबर विविध प्रकारचे हार्डवेअर मटेरियल चे उत्पादन होत आहे. लक्ष्मी मोबाईलची सुरुवात झाली तेव्हा फक्त एक लाख रुपये भांडवल होते. ते सुद्धा मोठ्या अट्टाहासाने त्यांनी उपलब्ध केले होते. सध्या महिन्याकाठी ३० लाख रुपये उलाढाल होत आहे. 2024 मध्ये पूर्वीच्या छोट्या जागेत सुरू झालेल्या व्यवसाय 30 बाय 100 एवढ्या प्रशस्त जागेत स्थलांतरित केला आहे . बॉश या नामांकित कंपनीच्या ऑइलची एजन्सी देखील त्यांनी घेतली आहे. त्याचे सुद्धा वितरण इंगळे बंधू करतात. नवीन जागेत ते सर्व दुचाकी गाड्यांची सर्विसिंग, स्पेअर पार्ट्स तसेच सर्व प्रकारचे कामे ते प्रामाणिकपणे करतात.

    या यशासाठी काय केले असे विचारल्यास ता ते म्हणाले ग्राहकांच्या गाडीची काळजी घेतली. तसेच काही ठिकाणी एखादा स्पेअर्स व्यवस्थित असताना देखील तो बदलायला लावतात. आम्ही नेहमीच प्रामाणिकपणे व्यवसायाला प्राधान्य दिले. ग्राहकांना त्याची दर्जेदार सेवा किफायतशीर दरात दिल्यामुळेच चार वर्षे पूर्ण झाली. दिवसागणिक आमच्या ग्राहक संख्येत वाढ होत आहे.

      उठ सूठ एकच व्यवसाय सर्वांनी करण्यापेक्षा बाजारपेठेचा अभ्यास करून ज्या क्षेत्रात संधी आहेत अशा क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. इंगळे बंधू यामुळेच यशस्वी झाली आहेत. त्यांचा धडा गिरवून आणखी वेगवेगळ्या क्षेत्रात आपले बांधव उतरतील हीच अपेक्षा.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close