कुर्डूवाडी

स्वीट्स आणि बेकर्स क्षेत्रात हॉटेल अरुणची 81 वर्षांची यशस्वी वाटचाल 

शिव तंत्र न्यूज

स्वीट्स आणि बेकर्स क्षेत्रात हॉटेल अरुणची 81 वर्षांची यशस्वी वाटचाल 

शिवतंत्र न्यूज

 

   हॉटेल व्यवसाय व घाडगे परिवार हे समीकरण माढा परिसरात सर्वश्रुत आहे. आज रोजी घाडगे परिवाराची दोन हॉटेल्स माढा शहरात प्रसिद्ध आहेत. तब्बल 81 वर्षांची उज्वल परंपरा लाभलेला हा व्यवसाय एका मोठ्या उंचीवर नेण्यात घाडगे परिवार यशस्वी झालेला आहे मुख्य बाजारपेठेत असलेले हॉटेल अरुण अँड घाडगे बेकर्स हे हॉटेल ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे. नितीन अरुण घाडगे यांनी आजोबा व वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून यशस्वी वाटचाल करत असून ते बेकरी क्षेत्रात देखील पदार्पण करत आहेत. आपल्या रुचकर व स्वादिष्ट पदार्थांनी माढावासियांना मोहिनी घातली आहे. 

   1945 मध्ये नितीन यांचे आजोबा कृष्णा यांनी या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीला भेळ, पुरीभाजी, भजी , वडा पाव हे पदार्थ हॉटेलमध्ये असत. कालांतराने त्यामध्ये वाढ झाली. 1986 मध्ये तालुक्यात तसेच जिल्ह्यात नुकतीच डीपफ्रीजला सुरुवात झाली होती. व्यवसायाच्या गरजेतून त्यांनी डीप फ्रिज खरेदी केला माढा शहर व तालुक्यात हा पहिलाच डीप फ्रीज असेल. त्यामुळे कोल्ड्रिंक्स तसेच इतर दुग्धजन्य पदार्थ नागरिकांना उपलब्ध झाले. नितीन यांचे वडील अरुण यांनी स्वतः आईस्क्रीम उत्पादन सुरू केले. लोकांना हा ब्रँड खूप आवडू लागला. त्यावेळी कोठेही श्रीखंड उपलब्ध नव्हते. अरुण यांनी बल्क मध्ये श्रीखंड आणून लोकांना श्रीखंड खाण्यासाठी प्रवृत्त केले. आता सारखे श्रीखंडाचे छोटे पॅकेट्स उपलब्ध नव्हते. यानंतर श्रीखंड एवढे प्रसिद्ध झाले की एका रक्षाबंधन सणाला तब्बल 150 किलो श्रीखंड विकले गेले. मिल्क शेक, मसाला दूध, लस्सी यांचे उत्पादन स्वतः करण्यास त्यांनी सुरुवात केली. इसवी सन 2000 मध्ये नितीन यांनी फास्ट फूड प्रथमच माढ्यामध्ये सुरू केले.

पिझ्झा, बर्गर येथे उपलब्ध केला मलई पेढा, नमकिन, कुंदा, विविध प्रकारची बंगाली मिठाई बनवून विक्री देखील त्यांनी सुरू केली. शिवामृत, वारणा, अमूल आदि नावांकित ब्रँडची डीलरशिप घेऊन पॅकेजिंग दूध उपलब्ध केले. तसेच त्यासोबत दुग्धजन्य पदार्थ जसे की ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड हे देखील विविध नामांकित ब्रँडचे त्यांनी उपलब्ध केले. चॉकलेट गॅलरी देखील त्यांनी सुरू केली. कॅडबरी तसेच विविध कंपन्यांचे विविध आकारात येथे उपलब्ध असतात. विविध सण वार प्रसंगी विविध प्रकारचे पदार्थ , मिठाई येथे उपलब्ध असते. विविध नामांकित कंपन्यांचे बेकरी पदार्थ देखील येथे उपलब्ध असतात. त्यांच्या सौभाग्यवती त्यांना व्यवसाय मदत करतात. मुलगा एमबीए करत असून तो सुद्धा व्यवसायामध्ये पदार्पण करणार आहे. 

   गेल्या 81 वर्षापूर्वी सुरु झालेला हा रुचकर व स्वादिष्ट प्रवास आज तिसऱ्या पिढीच्या माध्यमातून सुरू आहे. परंपरेला नाविन्याची जोड दिल्यामुळे तसेच काळाच्या सोबत राहून लोकांना काय पाहिजे हे उपलब्ध करून दिल्यामुळेच या क्षेत्रात टिकल्याची भावना नितीन घाडगे व्यक्त करतात. त्यांचे वडील अरुण अजूनही त्यांना व्यवसायाच्या संदर्भात मार्गदर्शन करतात. सध्या देशातील विविध भागातील व्यवसायिकांचे अतिक्रमण हॉटेल व्यवसायावर होत असताना माढ्यातील घाडगे परिवाराने परप्रांतीयांनाच आपल्या उद्योगात कामाला ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. व्यवसायातील शतक पूर्तीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा. घाडगे परिवाराचा हा व्यवसाय प्रवास असंख्य नवोदित, उद्योजक व्यावसायिक यांना प्रेरणा देणारा ठरेल.

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close