कुर्डूवाडी

ज्वलंत इच्छाशक्तीच्या जोरावर हॉटेल व्यवसायात साधली प्रगती  कुर्डूवाडी च्या महेंद्र पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास 

ज्वलंत इच्छाशक्तीच्या जोरावर हॉटेल व्यवसायात साधली प्रगती 

कुर्डूवाडी च्या महेंद्र पाटील यांचा प्रेरणादायी प्रवास 

शिवतंत्र न्यूज 

 

     सर्वसाधारणपणे पारंपरिक व्यवसाय असेल तर व्यवसाय पिढ्यानपिढ्या चालवला जातो. मात्र शेतकरी परिवारामध्ये व्यवसायाला फारसे महत्त्व दिले जात नाही. साधन शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तसेच वडील सरकारी नोकरीला असतानाही व्यवसायाची कास धरून हॉटेल व्यवसायात उत्तुंग यश मिळवले आहे कुर्डूवाडी येथील महिंद्र मधुकर पाटील यांनी. कुर्डूवाडी बार्शी रोडवरील कुर्डूवाडी नजीकच असलेली हॉटेल वैशाली अनेक दशके ग्राहकांच्या पसंतीस उतरले आहे.

       महेंद्र यांचे वडील मधुकर पाटील यांचे शिक्षण एमए सायकॉलॉजी पर्यंत झालेले. महेंद्र यांना चार चुलते. कुटुंबात दोनशे एकर जमीन आहे. एवढे ऐश्वर्य असतानाही महेंद्र यांना बालपणापासूनच उद्योग व्यवसायाचे आकर्षण होते. त्यांचे चित्त शिक्षणात रमले नाही. त्यांनी बारावी उत्तीर्ण होताच व्यवसायात उतरण्याचा मनोदय व्यक्त केला. कुटुंबातील सर्वांनी त्यांच्या या निर्णयाला विरोध केला. कारण कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती. पाटील परिवाराला कुर्डूवाडी परिसरात मानाचे स्थान होते. त्यामुळेच त्यांचा विरोध होणे स्वाभाविकच होते. परंतु महेंद्र आपल्या निर्णयावर ठाम होते. खूप विचार करून त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. कुर्डूवाडी – बार्शी रोडवर शहरालगतच त्यांनी हॉटेल वैशाली या व्यवसायाचा प्रारंभ केला. महेंद्र पाटील यांना याअगोदर हॉटेल व्यवसायाचा कोणताही अनुभव नव्हता. फक्त जिद्द व महत्वाकांक्षेच्या जोरावर त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. सुरुवाती पासूनच त्यांनी चहा नाष्टा व जेवणाची सुविधा उपलब्ध केली होती. स्वच्छता व टापटीपप णाला त्यांनी प्राधान्य दिले. नाश्त्यामध्ये महाराष्ट्रीयन, साउथ इंडियन पदार्थ रुचकर कसे बनतील याकडे विशेष लक्ष दिले. कुर्डूवाडी बार्शी या रोडवर त्यावेळेस फारशी वर्दळ नसायची. तरीसुद्धा गुणवत्तेच्या जोरावर हॉटेल वैशालीला ग्राहकांच्या पसंतीस उतरवले. सुरुवातीला प्रतिसाद कमी मिळत होता. त्यामुळे परिवारातील तसेच मित्रमंडळी, हितचिंतक यांनी त्यांना हॉटेल बंद करण्याचा सल्ला दिला. मात्र महेंद्र पाटील हे त्यांच्या निर्णयावर ठाम होते. कोणत्याही परिस्थितीत मी हॉटेल चालवून दाखवणारच असा आत्मविश्वास त्यांच्यात होता. त्यांनी सर्व अपमान, कुचेष्टा यांना पचवून व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. चहा, नाष्टा, शाकाहारी व मांसाहारी जेवण अप्रतिम चवीमध्ये ग्राहकांना कसे देता येईल, आलेला प्रत्येक ग्राहक वारंवार कसा येईल या दृष्टीने कामकाज करण्यास सुरुवात केली. तरी सुद्धा सुरुवातीची 7-8 वर्षे पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नव्हता. नातेवाईक व हितचिंतक यांच्या मनासारखे झाले होते. मात्र तरी महेंद्र यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले. ग्राहकांना अधिक सेवा सुविधा कशा देता येतील, येणारा प्रत्येक ग्राहक याला त्यांची मनासारखी उत्तम चव कशी देता येईल याचा विचार महेंद्र करत असत. दरम्यानच्या काळात कुर्डूवाडी बार्शी रोडवर वाहनांची गर्दी वाढू लागली. दिवसेंदिवस ग्राहक संख्या वाढू लागली होती. महेंद्र यांना अत्यंत आनंद झाला . त्यांनी प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची नेमणूक केली. अनुभवी कूक यांना पाचारण केले. आणि बघता बघता हॉटेल वैशालीचा नावलौकिक वाढू लागला. आज रोजी 35 कर्मचारी वृंद सेवा देण्याचे काम करतात. संध्याकाळी तर गाडी लावायला देखील जागा नसते. धाराशिव, नांदेड, लातूर तसेच मराठवाड्याच्या सर्व भागातील लोक जे या रस्त्याने प्रवास करतात ते आवर्जून हॉटेल वैशाली मधील पदार्थाची चव चाखण्यासाठी येतात. ते या हॉटेलचे कायमस्वरूपी ग्राहक झाले. शुद्ध शाकाहारी जेवण हे हॉटेल वैशालीचे वैशिष्ट्य आहे. इथले इथल्या सर्व डिशेस ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. कुर्डूवाडी परिसर तसेच माढा तालुका शेजारील तालुक्यातील ग्राहक सुद्धा येथे गर्दी करतात. 

    अनंत अडचणींना सामोरे जात हॉटेल व्यवसायात यशस्वी झालेल्या महेंद्र पाटील यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी असाच आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close