tembhurni

टेंभुर्णी येथील धनलक्ष्मी ठिबकला राज्याबाहेरील शेतकऱ्यांची मागणी  किरण पराडे पाटील यांनी दहा वर्षांच्या प्रयत्नातून साधले यश

शिवतंत्र न्यूज

­टेंभुर्णी येथील धनलक्ष्मी ठिबकला राज्याबाहेरील शेतकऱ्यांची मागणी 

किरण पराडे पाटील यांनी दहा वर्षांच्या प्रयत्नातून साधले यश

शिवतंत्र न्यूज 

     टेभुर्णी येथे औद्योगिक वसाहत ही ठिबक सिंचन उद्योगाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. सर्वात जास्त ठिबक उद्योग या औद्योगिक वसाहतींमध्ये आहेत उद्योजक. किरण पराडे पाटील यांनी दहा वर्षापूर्वी सुरू केलेल्या धनलक्ष्मी ऍग्रो या कंपनीच्या धनलक्ष्मी ठिबक ने शेतकऱ्यांमध्ये विश्वास संपादन केला आहे. महाराष्ट्रात नाहीतर बाहेरील राज्यांमध्ये देखील हे ठिबक प्रसिद्ध आहे. 

   किरण आगतराव पराडे पाटील हे टेंभुर्णी येथील प्रसिद्ध व्यावसायिक. त्यांचे शिक्षण बारावीपर्यंत झाले असले तरी घरात व्यवसायिक पार्श्वभूमी होती. व्यवसायाचे बाळकडू त्यांना मिळाले होते. त्यामुळे त्यांचा रस उद्योग व्यवसायातच होता. त्यांचे टेंभुर्णी धनलक्ष्मी ज्वेलर्स हे सोन्या चांदीचे दुकान बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे. आपल्या उत्तम सेवेमुळे टेंभुर्णी परिसरात हे दुकान सुपरचीत आहे. किरण यांनी नवीन वाटेने जायचे ठरवले पूर्वी एमआयडीसीमध्ये ठिबक चे उद्योग फारसे नव्हते. माढा तालुक्यात तसेच शेजारील इंदापूर, माळशिरस, करमाळा, बार्शी आदी तालुक्यामध्ये बागायती क्षेत्र बरेच आहे. यासाठी ठिबक ची मागणी बरीच असते. त्यामुळे भविष्यात या उद्योगाला सोन्याचे दिवस येणार आहेत हे ओळखून त्यांनी 2016 मध्ये धनलक्ष्मी ऍग्रो या नावाने ठिबक निर्मिती उद्योग सुरू केला. सुरुवातीला एमआयडीसीमध्ये सहा गुंठे जागा त्यांनी भाड्याने घेतली. सुरुवातीपासूनच त्यांनी दर्जामध्ये तडजोड केली नाही.  कामगारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या सोबत सुसंवाद ठेवला. त्यामुळे कामगारांची अडचण आली नाही. मार्केटिंग कडेही त्यांनी विशेष लक्ष दिले त्यामुळे अल्पावधीतच या व्यवसायात मुसंडी मारली. टेंभुर्णी बरोबरच शेजारील तालुके तसेच जिल्हा बाहेरूनही धनलक्ष्मी ड्रीपला मागणी येऊ लागली. मागणी वाढतच मागणी वाढताच त्यांनी उत्पादनातही वाढ केली. नंतर तीस गुंठे जागा  विकत घेतली. ही जागा ही कमी पडू लागली. नंतर दोन एकर जागा एमआयडीसीमध्ये घेऊन त्या ठिकाणी धनलक्ष्मी ड्रिपचे उत्पादन त्यांनी सुरू केले. इतर ठिबकच्या तुलनेत धनलक्ष्मी ठिबक दर्जेदार आहे.टिकाऊ क्षमता तसेच पिकांना समदूर पाणी मिळते.  धनलक्ष्मी ऍग्रोने रेन पाईप सुद्धा तयार केले आहेत. त्याला सुद्धा शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.शेतकरी एकदा हे ड्रिप, रेन पाईप वापरले की दुसरे ड्रिप, रेन पाईप वापरत नाहीत. त्यामुळे दहा वर्षानंतरही मागणीमध्ये कधीही खंड पडला नाही असे पराडे पाटील सांगतात. 

 

   सध्या धनलक्ष्मी ड्रीप महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यात पोहोचले असून, महाराष्ट्राच्या बाहेर तामिळनाडू कर्नाटक या राज्यात देखील प्रचंड मागणी आहे. धनलक्ष्मी ऍग्रो च्या माध्यमातून प्लास्टिक ग्रॅन्युल्स , राऊंड ड्रीप, फ्लॅट ड्रीप , रेन पाईप 16 एम एम, 20 एम एम मध्ये बनवले जाते.धनलक्ष्मी ठिबक चे ड्रीपर्स हे आयएसआय दर्जाचे असल्याने ड्रीपचा दर्जा राखला गेला आहे. संपूर्ण ड्रीप आयएसआय मध्ये करण्याचा किरण पराडे पाटील यांचा प्रयत्न आहे. त्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. आयएसआय लॅब त्यांनी आणली आहे. तसेच अत्याधुनिक मशिनरी देखील त्यांनी आणले आहेत. लवकरच आयएसआय ड्रीपचे उत्पादन सुरू होत आहे. 

 

 यशाचे गमक काय असे विचारल्यानंतर ते सांगतात की, माझे वडील आगतराव निवृत्ती पराडे पाटील हे पहिल्यापासूनच व्यावसायिक दृष्टी असलेले व्यक्तिमत्व आहेत. ते नियमित कंपनीत येतात. सर्व स्टाफ, कंपनीतील कामगार, उत्पादन, मार्केटिंग या सर्व बाबींची माहिती घेतात. त्यांना आवश्यक असेल त्याबाबतीत मार्गदर्शन, सूचना करतात. वडिलांचे काटेकोर लक्ष असल्यामुळेच आम्ही या व्यवसायात यशस्वी झालो. सर्वांनी मन लावून काम केल्यामुळे सुरुवातीच्या काळात सहा कोटी पर्यंत असलेली उलाढाल आज रोजी 12 कोटीपर्यंत गेली आहे. 

 

   उद्योगात पदार्पण करणाऱ्या युवा वर्गाला आवाहन करताना ते म्हणतात, यशाला शर्ट कट नसतो. कष्ट, सातत्य, जिद्द मनात बाळगा. हार म्हणून नका. प्रामाणिकपणे प्रयत्न करा. उद्याचा दिवस तुमचाच असेल. आगामी काळात धनलक्ष्मी ठिबकचा प्रवास भारतभर व्हावा यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा..

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close