करमाळा

हॉटेल बागायतदारने मिळवली ग्राहकांची अल्पावधीत पसंती  299 मध्ये अनलिमिटेड मच्छी चिकन हा फॉर्म्युला ठरला लोकप्रिय 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

हॉटेल बागायतदारने मिळवली ग्राहकांची अल्पावधीत पसंती

299 मध्ये अनलिमिटेड मच्छी चिकन हा फॉर्म्युला ठरला लोकप्रिय 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

 

 

     दोन महिन्यापूर्वी सुरु झालेल्या करमाळा येथील हॉटेल बागायतदार आणि अल्पावधीतच ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवले असून आप्पासाहेब झिंजाडे यांच्या या अनोख्या उपक्रमाला मिळाला ग्राहकांची पसंती मिळाली आहे. 

 

     हॉटेल बागायतदार चे संचालक असलेले अप्पासाहेब झिंजाडे हे गेल्या आठ वर्षा पासून कृषी व्यवसाय क्षेत्रात कार्यरत आहेत .करमाळा येथे त्यांचे शनैश्वर ऍग्रो सर्विसेस या नावाने ठिबक तुषार सिंचन तसेच कृषी साहित्य विक्रीचे दुकान आहे. 2017 मध्ये त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. याअगोदर ते दुसऱ्या व्यवसायिकाकडे ठिबक सिंचन फिटिंगचे काम करत होते. आप्पासाहेब लहानपणापासूनच हरहुन्नरी व्यक्तिमत्व होते. ठिबक फीटिंग चे काम करत असताना त्यांच्या मनात स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा निर्माण झाली.म्हणून अनंत अडचणींना तोंड देत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला. ग्राहक सेवेला प्राधान्य दिल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी नेत्रदीपक प्रगती साधली. आज रोजी त्यांच्याकडे ड्रीप इंडिया इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, कॅप्टन पोलिप्लास्ट राजकोट ,महिंद्रा एपीसी आदी कंपनीची डीलरशिप आहे. गेल्या आठ वर्षापासून अविरतपणे ग्राहकांना सेवा देत आहेत .

   हा व्यवसाय सुरू असताना नवीन काहीतरी करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महाराष्ट्रातील नामांकीत वक्ते , प्रा नामदेवराव जाधव यांचे प्रेरणादायी विचार त्यांना मनापासून भावले. एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर ‘आत्ता पिकवली आत्ता विकले ‘ अशी संकल्पना घेऊन जो काम करील तोच यशस्वी होऊ शकतो ही गोष्ट आप्पासाहेबांच्या मनात घर करून गेली. यातूनच नवीन व्यवसाय सुरू करण्याची मनीषा बळ धरू लागली. कोणता व्यवसाय करायचा याबाबत एकमत होत नव्हते. अशातच आप्पासाहेब यांची भेट त्यांचे नातलग असलेल्या कालिदास पाचपुते यांच्याशी झाली. त्यांचा पाचपुते स्पेशल मच्छी या लोकप्रिय ब्रँडच्या महाराष्ट्रभरात बऱ्याच शाखा आहेत. त्यांनी आप्पासाहेबांना हॉटेल सुरू करण्याची प्रेरणा दिली. यातूनच हॉटेल बागायतदार या संकल्पनेचा उदय झाला. करमाळा येथे संगोबा रोडवर 19/ 10 /2025 रोजी हॉटेल बागायतदार या व्यवसायाचा त्यांनी भव्य शुभारंभ केला. 299 रुपयात अनलिमिटेड मच्छी व चिकन थाळी ही हॉटेल बागायतदार ची विशेष ओळख आहे. दररोज किमान 100 ग्राहक या हॉटेलमध्ये जेवणासाठी येतात. आप्पासाहेब यांनी सुरुवातीपासून दर्जा सांभाळण्याला प्राधान्य दिले .यामुळेच ग्राहकांचा ओघ दिवसेंदिवस वाढतच आहे. महाराष्ट्रातील हॉटेल क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हॉटेल भाग्यश्रीचे संचालक दिनेश मडके यांना आप्पासाहेब आदर्श मानतात. आप्पासाहेबांना हॉटेल भाग्यश्री प्रमाणे लोकप्रियता मिळवायचे आहे. त्या दृष्टीने त्यांचा प्रवास सुरू आहे. लवकरच ढवारा जेवण हा नवीन उपक्रम ते सुरू करत आहेत. आप्पासाहेब झिंजाडे यांच्याकडे सात पुरुष व तीन महिला असा दहा जणांचा कर्मचारीवृंद ग्राहकांच्या सेवेत कार्यरत आहे. आप्पासाहेबांच्या सौभाग्यवती सौ स्वाती ताई , विलासराव झिंजाडे खांद्याला खांदा लावून त्यांना मदत करतात. सौ स्वातीताई किचन विभाग जातीने लक्ष देऊन गुणवत्ता राखण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांच्यामुळेच गुणवत्तापूर्ण जेवण ग्राहकांना मिळते. सर्वच कर्मचारी ग्राहकांच्या सेवेत कमतरता भासू देत नाहीत .सर्वांनी नेमून दिलेली कामे पार पडल्यामुळेच अल्पावधीत हॉटेल बागायतदारला ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचे आप्पासाहेब झिंजाडे यांनी सांगितले. आपल्या या यशाचे गुपित सांगताना ते म्हणतात की नियोजन, कठीण परिश्रम, गुणवत्ता, सातत्यामुळेच आमची यशस्वी वाटचाल सुरू आहे.

 

     हॉटेल बागायतदार च्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close