करमाळा

सारंगकर डेन्टल क्लिनिक येथे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध असणारी डेन्टल /जबड्याचे CT स्कॅन               ( CBCT )ची सुविधा उपलब्ध 

शिवतंत्र न्यूज

सारंगकर डेन्टल क्लिनिक येथे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध असणारी डेन्टल /जबड्याचे CT स्कॅन               ( CBCT )ची सुविधा उपलब्ध 

 

शिवतंत्र न्यूज 

 

   सारंगकर डेन्टल क्लिनिक करमाळा येथे फक्त जिल्ह्याच्या ठिकाणीच उपलब्ध असणारी डेन्टल /जबड्याचे CT स्कॅन ( CBCT )ची सुविधा उपलब्ध केल्याची माहिती करमाळा येथील नामांकित डेंटल सर्जन डॉ चंद्रकांत सारंगकर यांनी दिली.

   याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, अमेरिकन कंपनी कोडॅक (KODAK ) चे जबड्याचे CT स्कॅन (CBCT )मशीन तब्बल 40 लाख रुपये खर्च करून आपण करमाळा येथील आपल्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध केले आहे. या मशिनच्या साह्याने फ्रॅक्चर जबड्याचे स्कॅन करून अचूक निदान व ट्रीटमेंट करता येते.

दंत रोपण किंवा implant पद्धतीने फिक्स दात बसवण्यासाठी उपयुक्त आहे.अडकलेल्या अक्कलदाढा किंवा हाडांमध्ये अडकलेले दात यांचे निदान व विना त्रासाचा उपचार देखील आपल्या हॉस्पिटलमध्ये करता येतात. जबड्यामध्ये वेग वेगळ्या बनणाऱ्या गाठी किंवा आजारांचे अचूक निदान व उपचार तसेच जबड्याच्या जॉईंट (TMJ ) चे आजाराचे निदान करता येते. फेसिअल पोकळी ( FACIAL SINUSES MAXILLARY, NASAL, FRONTAL ,ETHMOID, SPHENOID SINUSES ) च्या आजारांचे निदान व उपचारासाठी उपयुक्त अशी ही मशीन आहे. तोंडाचे किंवा जबड्याचे कॅन्सर चे निदान करता येते. वेडेवाकडे दातांच्या उपचारामध्ये उपयुक्त आहे. रूट कॅनॉल ट्रीटमेंट मधे दातांच्या आतील अचूक रचना पाहून विना त्रास व कायमस्वरूपी उपचारासाठी उपयुक्त आहे हिरड्यांचे आजारांचे निदान व उपचार करता येणार आहे. जबड्याचा आकार व नेमक्या मोजमापासाठी उपयुक्त आहे. नाक कान घसा (ENT ) च्या आजारांचे अचूक निदान व उपचार करता येणार आहेत. 

  दातांच्या कोणत्याही प्रकारच्या समस्यांसाठी तसेच उपचारांसाठी गेल्या 25 वर्षांपासून सारंगकर हॉस्पिटल कार्यरत आहे. या सुविधेचा करमाळा तालुका व परिसरातील नागरिकांनी फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close