कुर्डूवाडी

बळीराजाच्या सेवेतून मिळाली ओळख रोपळे येथील धनाजी गोडगे यांची ट्रेडिंग क्षेत्रात दमदार कामगिरी

शिवतंत्र न्यूज 

बळीराजाच्या सेवेतून मिळाली ओळख

रोपळे येथील धनाजी गोडगे यांची ट्रेडिंग क्षेत्रात दमदार कामगिरी

 

शिवतंत्र न्यूज 

      ग्रामीण भागात देखील उद्योग व्यवसाय करण्यासाठी भरपूर व्यवसाय आहेत. फक्त मनापासून करण्याची जिद्द व महत्त्वाकांक्षा पाहिजे. रोपळे तालुका माढा येथील धनाजी गोडगे हे गेल्या नऊ वर्षांपासून किराणा, भुसार, व्यापार क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या कामाच्या माध्यमातून शेकडो शेतकरी तसेच ग्राहक वर्गात त्यांनी विश्वास संपादन केला आहे. रोपळे सारख्या ग्रामीण भागात आज व्यवसाय करणे ही गोष्ट सोपी नव्हती. मात्र त्यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाच्या जोरावर विविध व्यवसायात नऊ वर्षे पूर्ण केले आहेत.

     धनाजी विष्णू गोडगे हे करमाळा ते कुर्डवाडी मार्गावर असणाऱ्या रोपळे (कव्हे) येथील एक व्यवसायिक आहेत. 2017 मध्ये त्यांनी बळीराजा पशुखाद्य या नावाने पशुखाद्य व्यवसाय सुरू केला. विविध कंपन्यांची गोळी पेंड, शेंगदाणा पेंड, भुसा , सरकी असे पशुखाद्य विक्रीसाठी ठेवले. धनाजी यांचा स्वभाव पूर्वीपासूनच मनमिळावू होता. रोपळे गाव व परिसरात दूध व्यवसाय भरपूर प्रमाणात होतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच उत्पादकांनी त्यांच्याकडे गर्दी करण्यास सुरुवात केली. कमीत कमी नफ्यावर व्यवसाय करत असल्यामुळे धनाजी यांच्यावर दूध उत्पादकांचा विश्वास निर्माण झाला. हा व्यवसाय करत असताना शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संबंध आला. रोपळे परिसरात अडत दुकान नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना वीस ते तीस किलोमीटर पर्यंत शेतमाल घेऊन जावा लागत असे. व्यापारी शेतकऱ्यांना योग्य दर देत नसल्याने येथील शेतकऱ्यांनी धनाजी यांना भुसारमाल खरेदी करण्यासाठी प्रवृत्ती केले. 2019 मध्ये त्यांनी बळीराजा ट्रेडर्स या नावाने शेतमाल खरेदी विक्री सुरु केले.ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, तूर, उडीद, मका तसेच सर्व प्रकारचा शेतमाल ते खरेदी करू लागले. करमाळा तालुक्यातील नेरले, वरकुटे, साडे, सौंदे, सालसे, गौंडरे, केम , पांडे, हिसरे, फिसरे , करमाळा, मांगी, पोथरे , खडकेवाडी, देवळाली, सरपडोह, वरकटणे, कुंभेज, जेऊर, चिखलठाण, शेलगाव, सौंदे, अर्जुननगर, लोणी, मुंगशी, बिटरगाव, पिंपरी, ढवळस, शिंगेवाडी, बारलोणी, रोपळे, भोगेवाडी, जाखले अशा जवळजवळ 25 ते 30 गावांमधील तसेच माढा तालुक्यातील दहा ते पंधरा गावातील शेतकरी आपला शेतमाल घेऊन रोपळे येथे येऊ लागले. एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकरी येण्याचे कारण म्हणजे धनाजी देत असलेली सेवा, उत्तम दर तसेच शेतकऱ्याचे पेमेंट तिसऱ्याच दिवशी त्यांच्या खात्यावर जमा करण्याची सुविधा. त्यामुळेच परिसरातील लोक धनाजी गोडगे यांनाच प्राधान्य देऊ लागले . भुसार व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू असताना त्यांनी लोक आग्रहास्तव 2022 मध्ये किराणा व्यवसाय देखील सुरू केला. सर्व प्रकारचा किराणा माल, शालेय साहित्य, कोल्ड्रिंक्स, धान्य ते होलसेल दरात ग्राहकांना देतात. सकाळी सात वाजता दुकानाचे शटर उघडले ते रात्री दहा वाजेपर्यंत दुकानात ग्राहकांची बद्दल असते. भुसार मालाची ते बीड, धाराशिव , इंदापूर, बारामती, पुणे वाशी, येडशी आळेफाटा, नारायणगाव आदी ठिकाणी विक्री करतात . त्यांच्याकडे दोन मोठ्या गाड्या, एक पिकप अशी वाहने आहेत. त्या माध्यमातून मालवाहतूक होते. दहा कामगारांना या व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. या व्यवसायात यशस्वी होण्याची गमक सांगताना ते म्हणतात की, ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यावर मी भर दिला. शेतकऱ्यांना, ग्राहकांना योग्य तर दिला तसेच शेतमाल खरेदी विक्री मध्ये कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याचा विश्वास लोकांना दिला. म्हणूनच मी यशस्वी होऊ शकलो. नवोदित तरुणांना ते आवाहन करतात की ग्रामीण भागात उद्योगाच्या विविध संधी आहेत. त्याचा शोध घेऊन प्रामाणिकपणे व्यवसाय करा. शहरांमध्ये खूप मोठी स्पर्धा आहे. जागा भांडवल आदी अतिशय कमी दरात ग्रामीण भागात उपलब्ध होते. त्यामुळे प्राधान्याने ग्रामीण भागातच व्यवसाय करण्याचा सल्ला देतात.

     शेतीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून ग्रामीण भागात व्यवसायात यशस्वी झालेले धनाजी गोडगे यांचा हा प्रवास नक्कीच नवोदित युवकांना प्रेरणादायी ठरेल.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close