माढा

अविरत संघर्षाच्या जोरावर विनायक जाधव सरांनी साधली प्रगती बोअरवेल, विमा क्षेत्रात मिळवला नावलौकिक

शिवतंत्र न्यूज

अविरत संघर्षाच्या जोरावर विनायक जाधव सरांनी साधली प्रगती

बोअरवेल, विमा क्षेत्रात मिळवला नावलौकिक

शिवतंत्र न्यूज 

 

 

     सध्या बेरोजगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. मात्र त्यावर विचारपूर्वक निर्णय घेऊन कष्ट करण्याची तयारी दाखवली तर कितीही मोठी संकटे आली तरी मार्ग काढता येतो. त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करून यश कसे मिळवायचे याचा आदर्श घालून दिला आहे. प्रत्येक संकटकाकडे त्यांनी संधी म्हणून पाहिले,व कार्यमग्न राहिले. म्हणून ते काम करत असलेल्या प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश व समाधान मिळाले.

      अंजनगाव (खे) तालुका माढा येथील विनायक सुरेश जाधव सर एक उच्च विभूषित व्यक्तिमत्व. शिक्षण एम. ए. एम.एड. पर्यंत झाले. त्यानंतर त्यांना मंगळवेढा येथील पार्वती ताड अध्यापक विद्यालयात लेक्चरची नोकरी मिळाली. हे महाविद्यालय विना अनुदानित तत्त्वावर चालत होते. त्यामुळे अत्यंत कमी मानधनावर त्यांना काम करावे लागायचे. अशाच परिस्थितीत त्यांनी तब्बल चार वर्षे नोकरी केली. अध्यापनाचे कार्य करत असताना त्यांनी एल.आय.सी.ची परीक्षा दिली होती. त्यात ते उत्तीर्ण देखील झाले . 2013 मध्ये अध्यापक विद्यालयांना उतरती कळा लागली. राज्यातील बरीच अध्यापक महाविद्यालय बंद पडू लागली . सर काम करत असलेले महाविद्यालय देखील बंद पडले. आता काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला. एके दिवशी मोहोळ येथे सरांचा एक विद्यार्थी असलेल्या सिद्धेश्वर राऊत यांची भेट झाली. त्याचा बोरवेल्सचा व्यवसाय होता. सरांचे कॉलेज बंद असल्याने त्यानिमित्त सरांना बोरवेल व्यवसाय बद्दल माहिती दिली. कामाची गरज असल्यामुळे सरांनी या क्षेत्रात प्रवेश केला. अंजनगाव व परिसरात सरांचा जनसंपर्क असल्याने बोरवेल्स मध्ये बराच आर्थिक फायदा होऊ लागला. सरांचे एक मित्र नदाफ सर राहणार कुर्डूवाडी यांनी त्यांना मयूर टॅलेंट सर्च परीक्षा एम टी ई एस बद्दल माहिती दिली. या परीक्षेचे समन्वयक म्हणून त्यांना संधी मिळाली .तीन वर्षे माढा, मोहोळ व परांडा या तालुक्या मध्ये हे काम केले. ज्या ज्या छोट्या – छोट्या संधी मिळतील त्याकडे सरांनी सकारात्मक तेने पाहिले.तसेच बोरवेलगाड्यांसाठी रोड गाईड म्हणून देखील काम पाहिले. मोहोळ येथून मध्य प्रदेश मधील शेंधवा मध्ये बोरवेल्स गाडीला जाण्यासाठी सरांनी मार्ग दाखविण्याचे काम केले. त्यानंतर अंजनगाव येथे 2015 मध्ये सरांनी जाधव इन्शुरन्स अँण्ड सर्विसेस व हे ऑफिस सुरू केले. या ठिकाणी झेरॉक्स, पासपोर्ट फोटो काढणे, विविध ऑनलाईन फॉर्म भरणे, सातबारा उतारा काढणे आदी सेवा देण्याचे काम सरांनी सुरु केले. सुमारे तीन वर्ष हे काम अविरत सुरू होते. 2019 मध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत इपीपी लिपीक पदासाठी मुलाखत देण्यासाठी एम्प्लामेंन्ट ऑफिस सोलापूर येथून कॉल लेटर मिळाले. मुलाखतीमधे पास होऊन ते बँकेत नोकरी करित आहेत.अनेक वर्षांच्या कष्टाचे चीज झाले होते. बँकेतील कामामुळे गावातील हे ऑफिस बंद करावे लागले . एल आय सी मधील कामकाज त्यांनी सुरूच ठेवले. आज रोजी 125 नियमित ग्राहक त्यांच्याकडे आहेत. आयुर्विमा क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कार व पदकांनी गौरवण्यात आले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या गुणवत्तेमुळे त्यांना विविध शाळा महाविद्यालयात गेस्ट लेक्चर साठी बोलवण्यात येते. अनगर येथील महाविद्यालयात सुट्टीच्या दिवशी ते पाचवी ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बुद्धिमत्ता या विषयांचे मार्गदर्शन करतात. नोकरी, विमा व इतर कामे सांभाळत शेतीकडेही आवर्जून लक्ष देतात व उत्तम प्रकारे शेतीही करतात.शेतीमध्ये सिंचनासाठी एक बोअर आहे. त्यांच्याकडे एक एकर केळी, एक एकर बोर फळबाग आहे.

      समाज कार्यात देखील ते हिरीरीने भाग घेतात. अंजनगाव येथील तरुणांनी एकत्रित येत विनायक सरांच्या मार्गदर्शनाखाली युवा पुरुष बचत गट स्थापन केला आहे. या बचत गटात 99 सभासद आहेत. सध्या गटाकडे सुमारे 65 लाख रुपये खेळते भांडवल आहे. विनायक सर अत्यंत शिस्तीने तसेच जबाबदारीने या गटाचे कामकाज पाहतात. अजूनही नोकरी, विमा बोरवेल, शेती, सामाजिक कार्य, बचत गट एवढ्या जबाबदाऱ्या ते समर्थपणे पार पाडतात.

विनायक जाधव सरांचा हा प्रवास नक्कीच नवोदित  व्यावसायिकांना  प्रेरणा देत राहील.

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close