करमाळा

मोटार रिवायडींग क्षेत्रात पवार परिवारांची चाळीस वर्षे सोलर क्षेत्रात टाकले दमदार पाऊल दोन पिढ्यांची यशस्वी वाटचाल

शिवतंत्र न्यूज

मोटार रिवायडींग क्षेत्रात पवार परिवारांची चाळीस वर्षे

सोलर क्षेत्रात टाकले दमदार पाऊल

दोन पिढ्यांची यशस्वी वाटचाल

करमाळा तालुक्यात बागायती क्षेत्र बरेच असल्यामुळे शेतीपूरक व्यवसाय उदा . मोटार रिवायडींग, मशिनरी यासारखे व्यवसाय गावोगावी मोठ्या प्रमाणात केले जातात. भोसे येथील रणजीत खंडेराव पवार हे गेली 40 वर्षे मोटर रिवायडींग क्षेत्रात काम करत असून त्यांचे शेतकऱ्यांमध्ये बरेच नाव आहे. आपल्या गुणवत्तापूर्ण कामाच्या जोरावर त्यांनी या क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. त्याची दुसरी पिढी सुद्धा या क्षेत्रात कार्यरत असून सौर ऊर्जा क्षेत्रात देखील पवार परिवाराने दमदार पाऊल टाकले आहे. श्रीकृष्ण सोलर व श्रीकृष्ण मोटार रिवायडींग अँड सेल्स या व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम करत आहेत.
रणजीत पवार यांचे मूळ गाव परंडा तालुक्यातील शिरसाव वाकडी 1972 च्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये पवार परिवार आणि करमाळा तालुक्यातील भोसे येथे रोजगाराच्या शोधात स्थलांतर केले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे काय करायचे हा प्रश्न उभा राहिला. रणजीत पवार यांनी मोटर रिवायडींग चे काम शिकून घेतले. करमाळा येथील किल्ला वेस येथे मोटार रिवायडींग कामास प्रारंभ केला. शेतकऱ्यांना मोटर पंप वेळेवर दुरुस्त करून दिल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी शेतकऱ्यांमध्ये विश्वास संपादित केला. तात्काळ रिवायडींग करून देण्यात त्यांचा हातखंडा आहे. 1 एचपी ते 50 एचपी पर्यंतचे पंप ते दोन तासात भरून देतात. त्यामुळे मोठ्या शेतकऱ्यांना याचा बराच फायदा होतो. वेळ. पिकांचे नुकसान वाचते. पवारांच्या सारखी सेवा इतर कोणीही देत नाही. त्यामुळे बारावी महिने त्यांच्याकडे ग्राहकांची वर्दळ असते. रिवायडींग बरोबर त्यांनी पंप विक्री ही सुरू केली आहे. त्यांच्याकडे डेक्कन कंपनीचे दर्जेदार पंप मिळतात. करमाळा तालुक्यातील डेक्कन कंपनीचे अधिकृत वितरक आहेत. डेक्कन पंप उच्च दर्जासाठी ओळखले जातात. या पंपासाठी ते दोन वर्षाची वॉरंटी देतात. पंप मध्ये एवढी वॉरंटी कुठेही मिळत नाही. या पंपास शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून महिन्याकाठी शेकडो पंप शेतकरी खरेदी करत आहेत . याचबरोबर पारस, पायोनियर कंपनीचे पाईप, एलटी कंपनीचे स्टार्टर ,कपॅसिटर, एनएसएम कंपनीचे अल्टरनेटर ,पीएमजी प्रोडक्ट आधी साहित्याची विक्री व दुरुस्तीचे काम ते करतात.

करमाळा शहरातील निलज रोड लगत त्यांनी 2022 पासून सेवा देण्यास सुरुवात केली. नुकतीच त्यांनी अहिल्यानगर सोलापूर हायवे लगत दगडे प्लॉट येथे दोन गाळे घेऊन व्यवसाय सुरुवात केला आहे. या ठिकाणी सोलर पंप क्षेत्रातील जोरदार सुरुवात केली आहे. संपूर्ण भारतात ते वारी, अदानी ,पॉलीकॅब युटीएल कंपनीचे सोलर, सोलरचे हेड, ए सी डी सी कंट्रोलर्स आदी सेवा देतात. रुफटॉप सोलर तसेच डेक्कन कंपनीचे सोलर पंप देखील येथे उपलब्ध आहेत.

   रणजीत पवार यांना साथ मिळाली ती त्यांच्या मुलांची. प्रमित (गणेश) हा पाचवीत असल्यापासून वडिलांना कामात मदत करत असे. बारावी झाल्यानंतर त्यांनी पूर्ण वेळ वडिलांसोबत राहून त्यांच्यासोबत काम करत आहेत. दुसरा मुलगा सुमित हा कॉम्प्युटर इंजिनिअर आहे. पुणे येथील नामांकित कंपनीत जॉब करत होता परंतु सध्या त्यांनी नोकरीला राजीनामा देऊन ते सुद्धा व्यवसायात उतरले आहेत. उद्योगात उज्वल भवितव्यं असल्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे सुमित सांगतात . आपल्या मुलांचा खूप अभिमान वाटतो तसे रणजीत पवार म्हणतात. पवार परिवाराने जिद्द व चिकाटीने काम करत 4 एकर बागायती जमीन घेतली, जेसीबी घेतला. घराचे स्वप्न देखील पूर्ण झाले .भविष्यात अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्याचे त्यांचे स्वप्न आहे युवकांनी व्यवसायाची लाज न बाळगता तन-मन धनाने वाहून घेतल्यास नक्कीच त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकतील.

    एक काळ होता जेव्हा रोजी रोटी साठी बाहेरच्या तालुक्यातून त्यांना स्थलांतर करावे लागले होते. व्यवसायाची कास धरल्याने सुवर्णकाळात ते जीवन व्यतीत करत आहेत. पवार परिवाराची प्रेरणा अनेक उद्योजकांना जन्माला घालील यात शंकाच नाही.

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close