
बिगारी कामगार ते फरशी कारखानदार
देविदास बप्पा कन्हेरे यांची यशोगाथा
देविदास लहू कन्हेरे यांची ओळख आज बप्पा मिस्त्री म्हणून आहे. आज रोजी त्यांनी जे औद्योगिक यश मिळवले आहे आणि जे नाव कमावले आहे त्यापाठीमागे अतिशय मोठ्या प्रमाणातील कष्ट व संघर्ष दडलेला आहे. त्यांचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी असा आहे.
बप्पांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबातील असल्यामुळे कष्ट हे जन्मापासूनच सुरू झाले. छोट्याश्या वयातच वडिलांचे छत्र हरवले. तीन मोठ्या बहिणी आणि परिस्थिती अतिशय गरिबीची म्हणून मामांकडे राहून आठवे पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. परंतु पुढे शिकायचे तर पैसे काहीच नाही पण जबाबदाऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या. कारण बहिणीच्या लग्नाची जबाबदारी. त्यात काही पिढीच्या असलेल्या कोर्टकचेरी या सर्व बाजूंनी त्यात कधीही म्हणजेच न संपणारा दुःखाचा मोठा डोंगर तयार झाला. त्या परिस्थितीत अतिशय कमी वयामध्ये वयाच्या पंधराव्या वर्षी 1985 साली छोटीशी लोक वस्ती असलेले माढा तालुक्यातील वडशिंगे स्टेशन ते कुर्डूवाडी बारा किलोमीटर अंतर सायकल वरून पूर्ण करून बिगारी म्हणून घर बांधकाम करणाऱ्या गवंड्याच्या हाताखाली कामाला सुरुवात केली. जवळपास चार वर्षे बिगारी काम करून कामाचा अनुभव घेत 1989 साली बिगारी वरून एक गवंडी मिस्त्री झाले. बिगारी कामात त्यांना चार रुपये पगार मिळायचा परंतु गवंडी मिस्त्री झाले तेव्हा वीस रुपये पगार मिळायला सुरुवात झाली. मग त्यानंतर त्यांनी आणखी चांगल्या प्रकारे काम करायला सुरुवात केली. पुढील पाच ते सहा वर्षे उत्कृष्ट अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट मिस्त्री झाली म्हणून 150 रुपये असा चांगला पगार मिळू लागला. त्यातूनच तीन बहिणीचे लग्न स्वतःचे लग्न त्यांनी पार पाडले. त्यांचे लग्न 1994 साली झाले .लग्नानंतर सर्व साधारण पाच वर्ष त्यांनी मिस्त्री कामच केले. आणि 1999 साली स्वतः ठेकेदार झाले व बांधकाम घेण्यास त्यांनी सुरुवात केली. वयाच्या 29 व्या वर्षी एक मालक म्हणून निर्णय घेण्यास निवड करण्यास संधी मिळायला सुरुवात झाली. मग त्यांनी नवीन लेबर कामाला घेऊन बांधकाम करण्यास सुरुवात केली. त्याच सोबत बिगारी काम करणाऱ्या कामगारांना चांगल्या प्रकारचे काम करण्यास शिकवले. त्यांनाही लेबर चे मिस्री बनवले. सर्वांना सोबत घेऊन चांगला पगार मिळावा या दृष्टीने त्यांनी कामगारांनाही संधी देत गेले स्वतः काम घेत असल्याने जबाबदारी वाढली. त्याच मध्यंतरीच्या काळात एक मुलगी आणि दोन मुली झाली. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी वाढतच गेली. त्यांनी या सर्व जबाबदाऱ्या स्वीकारल्या . पुढे मोठ्या जबाबदाऱ्या स्वीकारण्याची एक प्रकारची आवडच होत गेली. म्हणून एक दोन लेबर पासून सुरुवात केलेली शेवटी शंभर ते 200 लेबर पर्यंत बप्पा मिस्त्री यांचा हा प्रवास वाढतच चालला होता. त्यात त्यांनी भविष्यातील संधी ओळखत एका ठिकाणी चार गुंठे जागा कर्ज काढून घेतली. ते कर्ज फेडण्यास चार वर्षे लागली. त्यातच 2017 मध्ये एक अनपेक्षित गोष्ट घडली. एका मोठ्या बिल्डिंगचे काम चालू असताना एक महत्त्वाचा मिस्त्री कारागीर एका फरशी दुकानदाराने मोठ्या चतुराईने आणि धूर्तपणे बाहेर पाडला आणि स्वतःच्या दुकानात ठेवला बरेच दिवस त्या मिस्त्रीला विनंती करूनही तो बप्पांच्या बांधकामावर गेला नाही. आणि शेवटी एक महिन्यानंतर त्या फरशी दुकानात कामाला गेला. पप्पांना हा खूप मोठा धक्का होता परंतु या धक्क्यातून सावरत त्यांनी विचार करत पुढील व्यूहरचना आखायचे ठरवले. त्यात फरशी दुकानदारासमोरील असणाऱ्या हॉटेलमध्ये बसून त्यांनी फरशी दुकानदाराचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. बरेच दिवस बाप्पा चहा पिण्याच्या बहाण्याने फरशी दुकानदाराच्या समोरील हॉटेलमध्ये बसून फरशी दुकानाचा अभ्यास करत होते. अभ्यासांती त्यांनी स्वतः फरशी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट 2007 ची आहे. त्यानंतर साधारण 2009 साली त्यांनी स्वतःच्या फरशी कारखान्याच्या बांधकामाची सुरुवात केली. 2018 पर्यंत बांधकाम पूर्ण झाले. परंतु 2011 ते 2013 यादरम्यानच्या काळात बऱ्याच लोकांनी धोके दिले. पैसे बुडवले . त्यात मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढलेला. त्यामुळे दोन वर्ष कारखाना नाही सुरू करता आला नाही.परंतु २००१३ साली एका ठिकाणी घेतलेली जागा ती नऊ लाखाला विकून तसेच पत्नीचे दागिने गहाण ठेवून दोन लाख मिळाले एकूण 11 ते 12 लाख रुपये गुंतवून माल खरेदी केला. परंतु 2013 ते 14 यादरम्यानच्या काळात भरपूर अडचणी व्यवसाय सुरू असूनही नसल्यासारखेच होता. एका वर्षात फक्त साडेतीन लाखाचा माल विकला. त्यात फरसा नफा झाला नाही. 2014 नंतर मोठ्या प्रमाणात व्यवसाय सुरू झाला. तीनच वर्षातून 2017 नवीन कारखाना चालू करण्यासाठी जमीन खरेदी केली. तीही कुर्डूवाडी पंढरपूर रोडवर. 2018 मध्ये तेथील बांधकामांची सुरुवात झाली आणि 2023 ला कारखान्याचे संपूर्ण काम होऊन फरशी कारखाना सुरू झाला . दोन्ही कारखान्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत गेले. पप्पांनी आजपर्यंत खूप तडजोडीत जीवन व्यतीत केले होते. बरेपैकी स्थिरस्थावर झाल्यानंतर एक सुंदर मोठे घर बांधकाम त्यांनी केले . दोन्ही कारखाने आज रोजी मोठ्या प्रमाणावर चालतात. मोठ्या प्रमाणात उत्पन्नही ते मिळवत आहेत. आणि लवकरच दोन शाखा काढण्याची तयारी करत आहेत. या सगळ्या प्रवासात त्यांना मौल्यवान साथ ही मेहुण्याची मिळाली. त्यांची मुले रोहित व रोहन ही बप्पा पेक्षाजास्त काम करत आहेत.



