करमाळाबिझनेस

प्रदीर्घ अनुभवातून गाढवे बंधूंचे फॅब्रिकेशन व्यवसाय पदार्पण  त्रिमूर्ती इंजिनिअरिंग च्या माध्यमातून केली दमदार सुरुवात 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क

प्रदीर्घ अनुभवातून गाढवे बंधूंचे फॅब्रिकेशन व्यवसाय पदार्पण 

 

त्रिमूर्ती इंजिनिअरिंग च्या माध्यमातून केली दमदार सुरुवात 

 

शिवतंत्र न्यूज नेटवर्क 

  कर्जत तालुक्यातील राशीन परिसर बऱ्याच दिवसापासून फॅब्रिकेशन व्यवसायाची माहेरघर बनला आहे . करमाळा तालुक्यातील गाढवे बंधूनी राशीने येथे 13 वर्षे प्रदीघ अनुभव घेत नव्याने सुरू केलेले त्रिमूर्ती या व्यवसायाने अल्पावधीत गरुडझेप घेतली आहे. आपल्या अनिल, सागर ,सुरेश या त्रिमूर्तींनी सुरू केलेले या व्यवसायाची फॅब्रिकेशन व्यवसायात चर्चा होत आहे. 

     याबाबत बोलताना अनिल गाढवे म्हणाले की तेरा वर्षांपूर्वी अतिशय खडतर परिस्थितीतून शिक्षण घेत होतो. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने मधूनच शिक्षण सोडावे लागलें. 2008 मध्ये शिक्षणाला रामराम घालत राशीने येथे ओंकार फॅब्रिकेशन या फर्ममध्ये फॅब्रिकेशन काम सुरू केले. सुरुवातीला कामाचा कोणताही अनुभव नव्हता. मात्र या फर्मचे संचालक गणेश कदम यांनी त्यांना फॅब्रिकेशन ची बाराखडी शिकवली. गाढवे परिवाराकडे फक्त सात एकर कोरडवाहू शेती होती. त्यामुळे परिस्थिती बदलायची असेल तर काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते . परिवारातील एक सदस्याला काम मिळाल्यामुळे रोजी रोटीचा प्रश्न मीटला होता अशातच त्यांचे दुसरे बंधू सागर यांनी कदम परिवारातीलच जय फेब्रिकेशन या ज्ञानेश्वर कदम यांच्या फर्ममध्ये नोकरी करण्यास सुरुवात करतो दोन्हीही बधूनी इमाने इतवारे काम करत कदम परिवाराच्या परिवाराकडे नोकरी केली. दर्जेदार काम कसे करायचे, ग्राहकांच्या हातांनी तसेच फेब्रिकेशन व्यवसायाच्या खाचा खोचा त्यांनी आत्मसात केल्या. नोकरी करत असताना त्यांनी एका एका पैशाची बचत करत सुमारे 8 एकर शेती विकत घेतली .शेततळे बांधले आणि सर्व 15 एकर शेत जमीन ओलिताखाली आणली. शेतीमध्ये केळी ऊस यासारखे नदी पिके लागवड केली. शेती तसेच कुटुंबाची आर्थिक घडी बसवल्यानंतर त्यांनी उद्योगात पदार्पण करण्याचे ठरवले. करमाळा राशीन रोडवर जागा विकत घेतली त्यामध्ये सुमारे 60 लाख रुपये खर्चून भव्य त्रिमूर्ती इंजिनिअरिंग व फॅब्रिकेशन शॉप उभे केले. याच वर्षी 4 सप्टेंबर रोजी या व्यवसायाची सुरुवात त्यांनी केली. तिथे दहा कामगार कार्यरत असून स्वतः अनिल व सागर हे दोन बंधू वर्कशॉप मध्ये जातीने कामगारांबरोबर काम करतात. सुरेश शेती व्यवसाय करत असले तरी त्यांना समान आर्थिक भागीदारी देऊन तिघा भावांमधील विण अधिक घट्ट झाली आहे . त्यामुळे परिसरामध्ये त्यांचे विशेष कौतुक होते. तेरा वर्षे या व्यवसायात असल्यामुळे त्यांचे विविध तालुके व जिल्ह्यांमध्ये संपर्क होते. त्यांच्या कामाची पद्धत ग्राहकांना माहीत असल्यामुळे या व्यवसायाची सुरुवात होताच जामखेड, करमाळा, कर्जत, परांडा, बार्शी, इंदापूर, मिरजगाव परिसरातील ग्राहक आवर्जून त्यांच्याकडे येऊ लागले.

   त्रिमूर्ती इंजिनिअरिंग व फॅब्रिकेशन येथे सर्व प्रकारच्या जेसीबी व पोकलेन मशीन बकेट हार्डिंग ,सर्व प्रकारची फॅब्रिकेशन कामे , ट्रेलर बांधणी, ट्रॅक्टर बांधणी, शेती अवजारे बांधणी आदी कामे काळजीपूर्वक केली जातात. गाढवे बंधूंनी स्वतः एक पोकलेन मशीन खरेदी केली असून या माध्यमातून शेती कामे शेततळे निर्मिती तसेच विविध कामे केली जातात फॅब्रिकेशन कामाबरोबर सर्व बंधू शेतीमध्ये देखील काम करतात. त्यांच्याकडे 30 संकरित गाई शेळ्या देखील आहेत . विशेष म्हणजे तिन्ही बंधू अजून एकत्र आहेत. सर्व बंधू विवाहित आहेत आई वडील बंधू व त्यांच्या पत्नी, मुले मुली असा मोठा परिवार परिसराचे भूषण बनला आहे. सर्वच्या सर्व गाढवे बंधूनी अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये जीवन व्यतीत केले आहे . 2008 मध्ये सुरेश यांनी हमाली मध्ये काम केले .2014 पर्यंत त्यांनी त्यामध्ये स्वतःला झोकून दिले. 2014 मध्ये त्यांनी बोअरवेल गाडीवर काम देखील केले .या बंधूंकडे खूप काही शिकण्या सारखे आहे. त्यांच्या कष्टातून व कर्तबगारी मुळे तिघांचीही लग्न वेळेवर झाली. मराठा समाजामध्ये मुलांच्या विवाहाचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. आपल्या बांधवांना मुलाचा संदेश देताना ते म्हणतात, आम्ही नेहमीच गुणवत्तेला प्राधान्य दिली व देत राहू. कधीच पैशासाठी काम केले नाही. दर्जाबाबत कधीही तडजोड केली नाही. त्यामुळेच नवीन व्यवसायास काहीही अडचण आली नाही. मराठा बांधवांनी प्रामाणिकपणे ज्या व्यवसायात आहात ते काळजीपूर्वक करावेत. जिद्द , चिकाटी व कष्टाच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतात. असा मोलाचा संदेश दिला आहे.

 

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close