माढा

मातृछाया हॉस्पिटलच्या माध्यमातून माढ्यात गोडगे डॉक्टर दांपत्याची दहा वर्षे अविरत रुग्णसेवा 

शिवतंत्र न्यूज

मातृछाया हॉस्पिटलच्या माध्यमातून माढ्यात गोडगे डॉक्टर दांपत्याची दहा वर्षे अविरत रुग्णसेवा

शिवतंत्र न्यूज 

   माढा येथे गेल्या दहा वर्षापासून मातृछाया हॉस्पिटल व प्रसूतीतिगृह दर्जेदार रुग्णसेवा देत असून यामुळे माढा परिसरातील शेकडो रुग्णांना या आरोग्य सेवेचा लाभ मिळाला आहे. डॉ. सचिन गोडगे व डॉ. अनुराधा गोडगे यांनी हे रुग्णसेवेचे व्रत जोपासले आहे. 

      डॉ. सचिन गोडगे हे स्त्रिरोगतज्ञ आहेत. त्यांचे शिक्षण हडपसर पुणे येथे साने गुरुजी आरोग्य केंद्रात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण भागातच सेवा देण्याचे त्यांनी ठरवले. ग्रामीण भागात रुग्णांची विशेषता महिला रुग्णांची आरोग्य सेवे अभावी बरीच हेळसांड होते. त्यांना दर्जेदार सुविधा मिळत नाहीत. हे त्यांनी जवळून पाहिले होते. त्यामुळे त्यांनी ग्रामीण भागातच सेवा देण्याचे ठरवले. 2016 साली त्यांनी माढा शहरात मातृछाया हॉस्पिटलची सुरुवात केली. अतिशय सेवा भावनेने व अल्पदरात त्यांनी रुग्णांना सेवा दिल्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक तज्ञ स्त्रिरोगतज्ञ म्हणून ओळख निर्माण झाली. नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन तसेच विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांना सोबत मिळाली ती त्यांच्या सहचारीनी सौ अनुराधा यांची. त्याही डॉक्टर आहेत. दोघांनी मिळून ही रुग्णसेवा सुरू ठेवली.

 

       मेन रोड माडा येथे त्यांनी कालांतराने सुसज्ज हॉस्पिटल उभारले आहे. येथे रुग्णाला रक्ताची गरज पडल्यास रुग्णालयातच रक्त उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध आहे (ब्लड स्टोरेज सेंटर). स्त्रिया व पुरुषांचे वंध्यत्व चिकित्सा व उपचार येथे केले जातात. प्रसूतीपूर्व व प्रसूती पश्चात चिकित्सा व डिलिव्हरी सुविधा देखील येथे उपलब्ध आहे. स्त्रियांचे सर्व प्रकारचे ऑपरेशन तसेच टाके न पडता गर्भाशयाची पिशवी काढण्याची सोय देखील येथे उपलब्ध आहे. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर, सुसज्ज पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून रक्त लघवी तपासणी येथे केली जाते. अत्याधुनिक मशीनद्वारे प्रसूतीपूर्व तपासणी (एनएसटी मशीनद्वारे ) केली जाते. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा रुग्णांना कशा उपलब्ध होतील या दृष्टीने डॉक्टर प्रयत्न करतात. माढ्यामध्ये प्रथमच दुर्बिणीद्वारे होणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया डॉक्टर सचिन गोडगे यांच्या माध्यमातून मातृछाया हॉस्पिटल येथे होत आहेत. 

       महिलांना आहार मार्गदर्शन तसेच गरोदर मातांच्या सुदृढ आरोग्यासाठीही डॉक्टर दांपत्य विशेष प्रयत्न करतात. गेल्या दहा वर्षात प्रॅक्टिस करत असताना सेवा भावनेला अधिक महत्त्व दिल्यामुळे परिसरातील रुग्णांनी आपल्या हॉस्पिटलवर विश्वास टाकल्याची भावना डॉ सचिन गोडगे व डॉ सौ अनुराधा गोडगे यांनी व्यक्त केली. भविष्यकाळात सुद्धा मातृछाया हॉस्पिटल व प्रसूतीगृहाच्या माध्यमातून माढा शहर, परिसर व तालुक्यातील रुग्णांना अत्याधुनिक दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close