माढा

दूध संकलन पशुखाद्य क्षेत्रात माढा येथील नागनाथ कन्हेरे यांची 32 वर्षे वाटचाल विविध व्यवसायांच्या माध्यमातून साधली प्रगती

शिवतंत्र न्यूज

दूध संकलन पशुखाद्य क्षेत्रात माढा येथील नागनाथ कन्हेरे यांची 32 वर्षे वाटचाल

विविध व्यवसायांच्या माध्यमातून साधली प्रगती

शिवतंत्र न्यूज 

 

     मराठा बहुजन क्षेत्रात उद्योजकता आता रुजायला लागली आहे. वीस तीस वर्षे व्यवसायात व्यतीत केलेले उद्योजक – व्यावसायिक तुलनेने कमी आढळतात. माढा तालुक्यातील जाधववाडी येथील उद्योजक नागनाथ कन्हेरे हे गेल्या 32 वर्षांपासून दूध व्यवसायाशी संबंधित असून या क्षेत्रात त्यांनी अतुलनीय असे काम केले आहे. दूध संकलन , विक्री, पशुखाद्य, भुसारमाल खरेदी विक्री, किराणा दुकान अशा विविध क्षेत्रात त्यांनी जम बसवला आहे. आदित्य मिल्क या नावाने त्यांनी म्हशीच्या दुधाचा ब्रँड तयार केला आहे. माढा परिसरातील शेकडो ग्राहक या दुधाची खरेदी करतात.   

    नागनाथ श्रीरंग कन्हेरे हे जुन्या काळातील पदवीधर आहेत. त्यांचे शिक्षण बीएपर्यंत झाले. लहानपणापासूनच यांच्या मनात व्यवसायाची आवड होती. त्या काळात सरकारी नोकऱ्या सहज मिळत होत्या. परंतु त्यांनी नोकरीच्या मागे न लागता 1994 मध्ये आदित्य दूध संकलन या नावाने व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. विशेषता म्हशीच्या दुधाला त्यांनी प्राधान्य दिले. संकलित म्हशीचे दूध पुढे डेअरीला न घालता त्याचे पॅकेजिंग करून माढा शहरात विक्री करण्यास सुरुवात केली. दर्जेदार दूध अतिशय कमी नफ्यामध्ये ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे कन्हेरे यांच्या दुधाला मागणी वाढू लागली. त्यांच्या जाधववाडी या मूळ गावी त्यांनी किराणा दुकान देखील सुरू केले. येथे त्यांनी सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात उपलब्ध केला. ग्राहकांना सेवा देण्याचा प्रमाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे किराणा दुकान देखील चांगले चालत होते. दिवसागणिक व्यवसायामध्ये प्रगती होत होती.  

     सन 2015 मध्ये त्यांनी माढा शहरात व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सोलापूर रोडवर त्यांनी आदित्य पशुखाद्य या नावाने पशुखाद्य विक्री करण्यास सुरुवात केली. संकलन क्षेत्रात बरीच वर्षे काम केल्यामुळे गुणवत्ता पूर्ण पशु खाद्याची त्यांना माहिती होती. या ठिकाणी त्यांनी बारामती ऍग्रो चे सर्व प्रकारचे कॅटल फिड, पोल्ट्री फीड, हिंदुस्तान किड्सचे इंद्रनील, सोनाई चे एक्स्ट्रा मिल्क तसेच शेंगदाणा पेंड, भुसा, सरकी आदी त्यांनी गुणवत्तापूर्ण तसेच योग्य दरात उपलब्ध केल्यामुळे माढा परिसरातील दूध उत्पादकांना याचा फायदा झाला. दहा बाय वीस एवढी जागा त्यांनी विकत घेतली. स्वच्छ धान्य देखील उपलब्ध करण्याची ग्राहकांची मागणी होती. त्यानुसार त्यांनी गहू,ज्वारी,बाजरी, तांदूळ आधी गुणवत्तापूर्ण माल उपलब्ध केला. या सोबतच शेतकऱ्यांकडे धान्याची खरेदी देखील करण्यास सुरुवात केली. उडीद, मका, ज्वारी, बाजरी तसेच सर्व प्रकारच्या कृषी मालाची योग्य दरात ते खरेदी करतात. मार्केट यार्ड मध्ये 30 बाय 30 एवढे गोडाऊन देखील त्यांनी घेतले. आदित्य दूध संकलनच्या माध्यमातून सध्या सहाशे लिटर दूध संकलित होते. त्यापैकी 300 लिटर म्हशीच्या दुधाची ते विक्री पॅकेजिंग करून किरकोळ बाजारात ग्राहकांना विक्री करतात. गुणवत्तापूर्ण दूध खात्रीशीर मिळत असल्यामुळे डोळे झाकून ग्राहक या दुधाला प्राधान्य देतात. भविष्यात अधिकाधिक ग्राहकांना दूध पुरवठा करण्याचा त्यांचा मानस आहे.   

     नागनाथ यांना दोन मुले आहेत. दोघेही उच्चशिक्षित असूनही दोघेही व्यवसायात नागनाथ यांना मदत करतात. आपल्या व्यावसायिक यशाबद्दल बोलताना ते म्हणतात की ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा दिल्यामुळेच मी या क्षेत्रात 32 वर्ष एवढा प्रादुर्घ काळ टिकून राहू शकलो. व्यवसाय करताना विनम्रता हवीच. विनम्र भाव असेल, भाषा सोम्य असेल आणि गुणवत्तापूर्ण साहित्य असेल तर नक्कीच कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होऊ शकतो. आजच्या तरुणाई बद्दल बोलताना ते म्हणतात की व्यवसायामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. त्या संधीचा शोध घेतला पाहिजे. कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. मिळेल त्या व्यवसायात पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच समाजापुढे आ पासून उभा असलेला बेरोजगारीचा प्रश्न निकाली लागू शकेल. सातत्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.मला सुरुवातीच्या काळात भरपूर अडचणी आल्या परंतु त्यावर मात करत मी पुढे गेलो. म्हणूनच गेल्या 32 वर्षांपासून हा उद्योग प्रवास अविरतपणे सुरू आहे.   

   कन्हेरे परिवाराच्या या व्यवसायिक प्रवासातून खूप काही शिकण्यासारखे आहे. ग्रामीण भागातील उद्योजक – व्यावसायिक या परिवाराची प्रेरणा घेऊन नक्कीच व्यवसायात पदार्पण करतील.

Tags

मुख्य संपादक : श्री.अतुल वारे पाटील

शिवतंत्र न्यूज.. हे एक असे विचारपीठ आहे जे राष्ट्रमाता जिजाऊ, शिव - शंभू -शाहू -फुले - आंबेडकर विचारधारेशी सलग्न आहे. या थोर महापुरुषांच्या विचारातून प्रेरणा घेऊन एक सशक्त , संवेदनशील समाज घडवणे या भूमिकेतून आपण पुढे जाऊया.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close