करमाळा
लक्झरीयस सोफा निर्मितीमध्ये मिळवला नावलौकिक माऊली मिटे या तरुणाने संघर्षातून उभारला उद्योग
शिवतंत्र न्यूज

लक्झरीयस सोफा निर्मितीमध्ये मिळवला नावलौकिक
माऊली मिटे या तरुणाने संघर्षातून उभारला उद्योग
शिवतंत्र न्यूज


राशीन परिसर फर्निचर हब बनला आहे. येथील सर्व प्रकारचे फर्निचर राज्यात सर्वत्र वितरित होते. ग्रामीण भागातील युवकांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फर्निचर क्षेत्रावर प्रभुत्व निर्माण केले आहे. माऊली मिटे या युवकाने राशीन येथील प्रसिद्ध फर्निचर व्यावसायिक असलेल्या दाजींच्या मदतीने फर्निचर मधील कुशन सोफा क्षेत्र निवडले. तसेच या क्षेत्रात दर्जेदार काम करत आपले नाव कोरले आहे. त्यांनी अतिशय दर्जेदार सोफा निर्मितीच्या जोरावर सर्वत्र नावलौकिक मिळवला आहे.
तसे पहिले तर फर्निचर मधील इतर वस्तू असतील तर त्यातील कोणत्या ना कोणत्या वस्तूला ग्राहकांची मागणी असते. जसे की कपाट, दिवाण , खुर्ची, टेबल.मात्र फक्त सोफा निर्मिती ही एकच वस्तू घेऊन व्यवसायात उतरणे हे मोठे अग्नी दिव्य आहे. मात्र त्यांचा स्वतःवर, आपल्या कामावर, कौशल्यावर विश्वास असल्याने आपण या क्षेत्रात यशस्वी होऊ शकतो याची त्यांना खात्री होती.

माऊली बाळासाहेब मिटे, झरे तालुका करमाळा येथील युवक आहे. वडील शेतकरी आहेत आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण असल्यामुळे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांचे दाजी असलेल्या भाऊसाहेब अहिरे यांच्या फर्निचर वर्कशॉप मध्ये बाहेरून शिक्षण घेत फर्निचर काम शिकण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला. दोन वर्षे त्यांनी तेथे काम करत सर्व फर्निचर तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. गावाकडे त्यांची अहिल्यानगर सोलापूर हायवेलगत शेती आहे. या स्वतःच्या जागेत त्यांनी 50 बाय 30 आकाराचे शेड उभा केले. . भांडवल व शेड उभारणी मिळून दहा लाख रुपये गुंतवणूक त्यांना करावी लागली नऊ जानेवारी 2024 रोजी माऊली मिटे यांनी शंभूराज फर्निचर या व्यवसायाचा शुभारंभ केला. सोफा निर्मितीमध्ये त्यांनी विशेष कौशल्य आत्मसात केले होते. व्यवसाय सुरू झाल्यानंतर सुरुवातीची सहा ते आठ महिने अतिशय खडतर गेले. ग्राहक शोधणे , आलेल्या ग्राहकाबरोबर व्यवहार जळवणे आदी बाबींमुळे व्यवसाय स्थिर होण्यासाठी बराच काळ गेला. या अगोदर त्यांनी फक्त फर्निचर निर्मिती केली होती. मार्केटिंग कला आत्मसात नसल्यामुळे बराच संघर्ष त्यांना करावा लागला. मात्र अनुभवाने ते या क्षेत्रामध्ये स्थिरावले. बऱ्यापैकी कामे त्यांना मिळू लागली. अमोल यांच्या ठिकाणी असलेल्या विशेष कौशल्यामुळे शहर व परिसरातून त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावर सोफ्यांची मागणी येऊ लागली.माऊली यांच्याकडे नऊ हजारापासून ते ग्राहकांना पाहिजे त्या दरात लक्झरीयस सोफे तयार होतात. तसेच ते ग्राहकांच्या मागणीनुसार कुशन सोफा, साधा सोपा तसेच विविध प्रकारचे सोफे तयार करतात. राशीन येथे काम करत असताना पुणे , यासारख्या अहिल्यानगर यासारख्या मोठ्या
शहरातील मॉल साठी लागणारे सोफे , फर्निचर त्यांनी तयार केले होते.याचा फायदा त्यांना झाला. ते स्वतः ग्राहकांच्या गरजेनुसार , तसेच आर्थिक कुवतीनुसार सोफे बनवतात. लक्झरीयस सोफे बनवण्यात हातखंडा असल्याने त्यांच्या सोप्यांना परंडा, कुर्डूवाडी, गेवराई, करमाळा शहर, करकंब, पंढरपूर आदी भागातील ग्राहक आवर्जून भेट देत आहेत. एका ग्राहकांने सोफा तयार केल्यानंतर त्याची गुणवत्ता, फिनिशिंग पाहून नवीन कामे मिळतात. त्यांनी सुरू केलेल्या या उद्योग प्रवासाला आज मीतिला दोन वर्ष पूर्ण झाली असून ते या प्रवासाबद्दल आनंदी आहेत.





